उपद्व्यापी मासोळी

Submitted by सामो on 19 November, 2019 - 09:12

एक होती मासोळी,
सुळसुळ पोहतसे जळी
चमचम मऊ पोट करी,
वर्ख मिरवे सोनेरी ||१||

आई तिची सांगे तिला,
जपून नेहमी रहायाला
जळात असे गळ टाकूनी,
दुष्ट माणूस किनार्‍यावरी ||२||

मासोळी होती उचापती,
भारी होती करामती
तमा आईच्या बोलांची,
नसे करीतसे कधीच ती ||३||

शिंपल्यातल्या मोत्यांशी,
इतर सुंदर माशांशीही
लव्हाळांशी अन बेडकांशी,
मस्ती करावी मनमुरादशी ||४||

सुळसुळ पळत सुटावे,
आईचे कोणी ऐकावे
आईने धपाटले तर,
मुळ्ळी फुगा करुन बसावे ||५||

मग एका काळ्या दिवशी,
जाळ्यात सापडे मासोळी
कोळी तिला पकडून न्याहाळी,
त्यालाही मग दया येई ||६||

इतकी सुंदर जलराणीसम,
मासोळी ही सोनेरी जर
दिला नजराणा मी राजाला,
मिळेल भरपूर द्रव्य मजला ||७||

राजा ठेवतसे संग्रही,
चमचमणारी बाळ मासोळी
मासोळी मात्र लागे झुरणी,
आईबाबा मैत्र आठवुनी ||८||

मासोळी बाळास उशीराने गोष्ट कळे,
आईचे नेहेमी ऐकावे
आई सांगे कळकळीने,
बाळासाठी तिचे हृदय तळमळे ||९||

मोठे सांगती गोष्ट हीताची,
ऐकावे त्यांचे ही रीत जगाची
म्हणून मुलांनो आईबाबांचे ऐका,
धोक्यापासून लांब रहा ||१०||

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे कविता.
पण मासोळ्या कुठे ऐकणारेत Happy त्यांचं तेच खरं. वयंच तसं आहे.

हाहाहा धन्स लोकहो!!
मीटरमध्ये न बसणारी, वेड्या बागड्या कवितेला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.
पण मीटरमध्ये बसवता येत नव्हती. प्रयत्न केलेला.

सामो
एकदमच भारी कविता लिहिलीये
मुलांना आवडेलशी पण थोडं समजावणारी
मस्त