हे बघा एका कंपनीचे कर्मचाऱ्याना आलेली दिवाळी गिफ्ट चे इमेल. अडीचशे रुपये घ्या आणि दिवाळी एन्जोय करा म्हणतात.
अशी "गिफ्ट" कुणा कुणाला मिळाली आहेत? इथे भडास काढा.
अरे हे असले चिंधी उद्योग करण्यापेक्षा तुम्ही फक्त शुभेच्छा का देत नाही मी म्हणतो? काय मिळते यांना असे कर्मचार्यांचा अपमान करून? हि गिफ्ट नव्हे भिक आहे राव भीक. एका कंपनीने तर चक्क "जंबो पेढा", म्हणजे नेहमीच्या पेढ्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा पेढा दिला होता. ते सुद्धा प्रत्येकाची "गिफ्ट" मिळाल्याची सही करून! आणि हि कंपनी बारीकसारीक नव्हे तर भारतातल्या पहिल्या चार कि पाच मोठ्या जायंट आयटी कंपनीपैकी एक आहे बरं का. ह्यांची आर्थिक उलाढाल/रेव्हेन्यू चे आकडे मिलियन आणि अब्ज डॉलर मध्ये असतात.
इतके माजोरडे असतात हे म्यानेजमेंट काही काही कंपन्यांचे. प्रोजेक्ट चालवतात कर्मचाऱ्याच्या जीवावर. त्यांच्या तोंडाला पाने पुसायची. आणि स्वत:ला मातर भरघोस दिवाळी बोनस लाटणार हXमी
अहो अजय . सरांचे म्हणणे
अहो अजय . सरांचे म्हणणे सिरियसली का घेताव . त्यांचा चिडका स्वभाव आहे . तुम्ही बरोबरच केले .
त्यांनी पण तेच केले असते . तेच प्रॅक्टिकल आहे. इथं टायपायला काय जातंय .
लंपनशेठ, नेमका मुद्दा काय आहे
लंपनशेठ, नेमका मुद्दा काय आहे? आय्टी कंपन्या कर्मचार्यांना जाणुनबुजुन २१,००० पेक्षा कमी बेस देतात, आणि त्यांना बोनस सुद्धा देत नाहित? असं असेल तर तो कायदेभंग नाहि का? ती क्लास अॅक्शन केस हि होउ शकते. तुम्हाला वाटतं कि जायंट कंपन्या ती रिस्क घेतील?
>>सपोर्ट (ऑफिस) स्टाफ रेवेन्यु जनरेट करत नसल्याने बोनस करता सहसा पात्र ठरत नसतो. >> अत्यन्त चूक. हे कम्पनीचे कामगार असतील तर झकत द्यावा लागेल बोनस.<<
सध्याचा भारतातला अनुभव नाहि. मी ते जनरल ऑब्झरवेशन (अर्थात अमेरिकेतलं) नोंदवलेलं, ऋन्म्याच्या शंकेवर. कॉलिंग ऋन्म्या टु थ्रो लाइट ऑन थिस...
नानकंपिट हा वेगळा विषय आहे, जो इथे अस्थानी आहे...
लंपनशेठ, नेमका मुद्दा काय आहे
लंपनशेठ, नेमका मुद्दा काय आहे? आय्टी कंपन्या कर्मचार्यांना जाणुनबुजुन २१,००० पेक्षा कमी बेस देतात, आणि त्यांना बोनस सुद्धा देत नाहित? असं असेल तर तो कायदेभंग नाहि का? ती क्लास अॅक्शन केस हि होउ शकते. तुम्हाला वाटतं कि जायंट कंपन्या ती रिस्क घेतील?>> तुम्ही नीट वाचली नाही का पोस्ट. असो तुम्ही भारतात काम करत नाही बहुदा असे दिसते. हा असा इंडायरेकट कायदेभन्ग करतात म्हणून तर काही सरकारी कार्यालये मागे लागली आहेत जायंट च्या. हे कमी बेसिक ठेवणे अगदी सर्रास चालते. ही ग्राउंड लेव्हल वरची माहिती आहे.
सध्याचा भारतातला अनुभव नाहि. मी ते जनरल ऑब्झरवेशन (अर्थात अमेरिकेतलं) नोंदवलेलं, ऋन्म्याच्या शंकेवर. कॉलिंग ऋन्म्या टु थ्रो लाइट ऑन थिस>>नाही ना अनुभव मला आहे मी त्या क्षेत्रात काम करतो म्हणून लिहिलंय त्यात कोणतीही फेका फेकी नाहीये. आणि कुणी कशाला लाईट थ्रो करायला हवा , मागे ज्या कायद्याचं मी नाव लिहिलंय तो सहज उपलब्ध आहे वाचा की तो त्यात आहे सगळी माहिती.
नानकंपिट हा वेगळा विषय आहे, जो इथे अस्थानी आहे...>>नीट वाचणार का पुन्हा ? मी ते ऑलरेडी लिहिलंय की हे अवांतर आहे. त्याच्या पुढचं वाक्य पण वाचा.
अजून एक अवांतर ... ह्या जायंट चे जेंव्हा आय पी ओ येतात किंवा ह्याना कुठे परदेशी लिस्ट व्हायचं असतं किंवा कुठे merger/acquisition असेल तर जो ड्यु डी होतो त्यात हमखास ह्यांनी कामगार कायद्याचे कुठेतरी उल्लंघन केलेलं असतंच मग आधी ते शिवून पुढे जावं लागतं. Acquisition च्या डॉक्युमेंट्स मध्ये कामगार मुद्द्यांवर भलीमोठी इंडेमनिटी विकत घेणारी कम्पनी घेत असते ते ह्याच कारणांसाठी.
Pages