Online दिवाळी अंक

Submitted by शब्दांश प्रकाशन on 27 October, 2019 - 13:21

दिवाळीच्या शुभेच्छा!
तुमच्या आनंदात भर टाकण्यासाठी साहित्याच्या पणत्या सिध्द केल्या आहेत मसअप प्रकाशित स्पंदन या दिवाळी अंकाने!!
जरूर वाचा! Happy

https://drive.google.com/file/d/1mSPhu94-6z5SdcQpU6IvcaGOCG_us94b/view?u...

___________________

स्पंदन दिवाळी अंक आता www.esahity.com वर उपलब्ध.
Happy

स्पंदन दिवाळी अंक

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/spandan_diwali_2019.pdf

ई साहित्य प्रतिष्ठानचे आभार. Happy

www.esahity.com
- एक प्रसन्न अनुभव

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रयत्न चांगला आहे. प्रचंड कष्ट घेतले असणार हे दिसतेय. फक्त तुम्ही उद्गारवाचक चिन्ह फारच वापरता बुवा!!! वरती पण आणि त्या दिवाळी अंकाच्या प्रस्तावनेत पण. तिथे तर प्रत्येक वाक्याच्या शेवटी उद्गार आहे. त्यामुळे मी अगदी साधी साधी वाक्ये पण नाट्यमय उद्गार काढीत वाचली.

मिसळ पावचा ऑनलाइन अंक छान आहे. वाचायला सुरुवात केली आहे. डे हाँग बुक परी क्षण , गन्स ऑफ नॅवरोन चित्रपट परीक्षण, द मा मिरासदार ह्यांच्यावर लेख इतके वाचले छान आहे क्वालिटी.

हरचंद पालव... आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद... पुढच्या वेळी लिहिताना आम्ही नक्की विचार करू... आणि अपर्ण पत्रिकेतील बरेचशे उद्धार वाचक चिन्ह गरजेचे आहेत... पण नक्की पुन्हा विचार करू

अमा, आपली प्रतिक्रिया वाचली... मिसळपाव चा अंक नक्की वाचू आम्ही... तुम्ही आमचा अंक वाचुन चांगली वाईट जी काही असेल ती प्रतिक्रिया द्यावी ही अपेक्षा

आणि अपर्ण पत्रिकेतील बरेचशे उद्धार वाचक चिन्ह गरजेचे आहेत.>> अर्पण पत्रिकेतील बरीचशी उद्गार वाचक चिन्हे गरजेची आहेत.

अमा Lol Lol Lol

_गुंजन_, तुम्ही कॅण्डी साहेबाचे मराठी विरामचिन्हांबाबत पुस्तक वाचणे जरूर आहे. असो, थोडक्यात सांगायचे तर 'उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापर होतो.' उदा. १. शाब्बास, असाच अभ्यास कर! २. छान, हीच खरी देशसेवा आहे!

अंक सुंदर झाला आहे.
अनुक्रमणिकेत लिंक्स हव्या होत्या तसेच डार्क बॅकग्राऊंडवर पांढरी अक्षरे वाचताना जरा त्रास होतोय.
लेख, कविता उत्तमच आहेत. पुर्ण वाचल्यावर पुन्हा प्रतिसाद देईनच.

धन्यवाद शालीजी.
तुम्ही दिलेल्या सुचनांची दखल आम्ही घेतली आहे. पुढचा अंक काढताना त्यातल्या अनुक्रमणिकेत दुवे नक्की देऊ.
Happy

अंकात संपादक मंडळाच्या सहा contributions आहेत. तुम्ही इतर दिवाळी अंकांमध्ये लिहिलेच असेल, इथे मोह टाळायला पाहिजे होता.
बॅकग्राऊंड भडक आहे. दिसायला आकर्षक असेल पण वाचायला नाही.