मतदान
मतदानाचे कर्तव्य पवित्र
लोकशाहीला नमन करा
ठोकशाहीला टाळून तुम्ही
निर्भयतेने मतदान करा
असेल जर स्वाभिमान
तर करा तुम्ही मतदान
परीक्षा ही अजब कुणाची
मतदान करणाऱ्या मतदारांची
निवडणुकीस उभ्या उमेदवारांची
की शांत झोपल्या लोकशाहीची?
असेल जर स्वाभिमान
तर करा तुम्ही मतदान
परीक्षा ही मतदारांची ऐका
अभ्यासाविन प्रश्न सोडवू नका
इतिहास भूगोल बघा पक्षांचा
अभ्यास करा नीतीशास्त्राचा
असेल जर स्वाभिमान
तर करा तुम्ही मतदान
पास नापास पाच वर्षांचे
नाही चान्स फेरतपासांचे
गोड की कडू फळ खावे
समजून जरा म्हणून वागावे
असेल जर स्वाभिमान
तर करा तुम्ही मतदान
भावनांची धुंदी सोडून
वास्तवाचा अंदाज घ्यावा
पक्षांचा समजून कावा
नंतर मनाचा कौल द्यावा
असेल जर स्वाभिमान
तर करा तुम्ही मतदान
परसहिष्णुता व्यक्तिस्वातंत्र्य
लोकशाहीचे हे वेद खरे
माणुसकीचा धर्म पाळून
जय बोला उच्च स्वरे
असेल जर स्वाभिमान
तर करा तुम्ही मतदान
बटन दाबता मतपेटीवर
डोळे उघडून देश स्मरा
निष्पक्षपणे मतदान करा
मतदानाचा हक्क खरा
असेल जर स्वाभिमान
तर करा तुम्ही मतदान
- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita
छान.
छान.