नजर

Submitted by राजेंद्र देवी on 14 October, 2019 - 11:09

नजर...

तुझी पाणावलेली नजर
सारे काही सांगून गेली
माझ्या स्वप्नांना
ओली नजर लावून गेली

स्वप्नांनाही भिजविले
मी अनेक रात्री
आठवणीत वेचल्या
मी अनेक रात्री

आठवतो अजूनही
तुझी नजर ति ओली
अजूनही मोजतो आहे
मी माझ्या जखमांची खोली

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>> जखमांची खोली>>>>>>> वाह!! छान कल्पना आहे.

विशाल कुलकर्णी यांच्या कवितेतील (https://www.maayboli.com/node/29244) पुढील ओळी आठवल्या -

>>>>>आळ घ्यावा ज्यावरी, ना शस्त्र उरले
काळजावर मोगर्‍याचे वार झाले>>>>>