जुळे नवरे, जुळ्या नवर्‍या

Submitted by पाषाणभेद on 13 October, 2019 - 13:22

एका पुरूषांच्या जुळ्यांच्या जोडीचे
स्त्री जुळ्यांच्या जोडीशी जुळले

(जोड्या स्त्री-पुरूषांच्या होत्या. आधीच खुलासा केला. कारण कुणी कलम ३७७ चा विचार करतील!)

जुळले ते जुळले
कुणा न कळले

ज्याच्यात्याच्या जोडीदाराचा हातात हात घालूनी
प्रत्येक जोडी हनिमूनास निघाली

एकत्र मजा करायचा विचार नेक
भटकायचे ठिकाण ठरवले एक

बूक केले छानसे सी फेसींग हॉटेल थ्री स्टार
रूम शेजारी शेजारी नंबर दोनशे तिन, दोनशे चार

दिवसभर फिरले डोंगरावर
खाल्ले पिल्ले पोटभर

सेल्फी काढल्या घालून गळ्यात गळे
व्हाट्सअ‍ॅप फेबूवर स्टेटस शेअर केले

हॉटेलातले जेवण त्यांनी एकत्र केले संध्याकाळी
हनिमून मात्र एकट्याने साजरा करण्याची रात्र झाली

दोन्ही नवर्‍या वॉशरूममध्ये गेल्या फ्रेश व्हायला
नवरे दोनही थांबले बाहेर, लागले वाट पहायला

एक नवरी आधी आली बाहेर, दुसरीला लागला वेळ
निरोप घेतला एकमेकींचा, हनिमूनचा खेळायचा होता खेळ

बाहेर येवून ती नवरी एका नवर्‍याबरोबर निघाली
निरोप घेवून दुसर्‍या नवर्‍याचा, ह्या जोडीने रूमकडे जाण्याची घाई केली

हॉटेलच्या गार एसी रूममध्ये गोष्ट वेगळी घडली
दोनशे तिनची नवरी दोनशे चारच्या नवर्‍या बरोबर गेली

- पाभे
१३/१०/२०१९

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म्म!!! कल्पना आहे विचित्र. पण नावं माहीत आहेत की. असं नाही होणार अन्लेस्स दोघी एकमेकींत किंवा दोघं एकमेकात किंवा चौघं एकमेकात ठरवत नाहीत.

ह्म्म्म!!! कल्पना आहे विचित्र. पण नावं माहीत आहेत की. असं नाही होणार अन्लेस्स दोघी एकमेकींत किंवा दोघं एकमेकात किंवा चौघं एकमेकात ठरवत नाहीत.