उम्र जलवोमे बसर हो.
प्रख्यात गजल गायक स्व. जगजीतसिंग यांची १० आँक्टोबर रोजी पुण्यतिथी असल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा छोटासा लेख.
गजल या काव्य प्रकाराला भारतात लोकमान्यता आणि लोकप्रियता मिळाली जगजीतसिंग यांच्या अप्रतिम गायकीमुळेच. नाहीतर गजल फक्त उच्च वर्तुळातच सिमित होती. मेहदी हसन यांच्या " रंजीश ही सही " ने लोकांवर गारुड केले परंतु या गजला शास्त्रीय ढंगानी गायल्या जायच्या. जगजीतसिंग यांनी ती गुणगुणता येईल एवढी सोपी केली आणि आम जनतेच्या दिवाणखान्यात आणून ठेवली. वास्तविक पाहता त्यांनी शास्त्रीय संगीतात पद्धतशीर शिक्षण घेतले असले तरिही त्यांनी लांब ताना आणि फिरत टाळली. शास्त्रीय संगीत आपल्याला सामान्यापासून दूर ठेवेल या जाणिवेतूनच,कदाचित त्यांनी त्यांच्या गजला सहज सोप्या रचल्या आणि संगीतात पारंपारिक वाद्याचा उपयोग न करता गिटार, मेंडोलीन,पियानो आणि वायोलीन अशा पाश्चिमात्य वाद्याचा उपयोग करुन गजला कर्णमधुर केल्या. त्या नंतर त्यांची पद्धत उचलून अनेक गजल गायक उदयास आले पण जगजीतसिंग यां सर्वात वरच्या दर्जाचे होते. त्यांच्या बहुतांशी रचना रागदारीवरच आधारित असल्या तरिही चाली खूपच वेगवेगळ्या असायच्या. अत्यंत मुलायम आवाज तरिही गळा भारदस्त हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य. ते कळण्यासाठी " कल चौदहवी की रात थी " ऐकावी. या गाण्यात एक अंतरा संपल्यावर " कुचेको तेरे छोडकर जोगी ही बनजाए मगर" ह्यातील
" जोगी " या शब्दाची करामत केवळ जादूई आहे. अती खर्जावर येऊन जोगी या शब्दावर ते जो ठेहराव घेतात याला असामान्य हाच शब्द! त्यांचा लाईव्ह कार्यक्रमात सुरूवातीलाच " ठुकराओ अब के प्यार करो" असे म्हणत ते मैफिल ताब्यात घेत असत.
जगजीतसिंग आज आपल्यात नाहीत हा विचारच अस्वस्थ करतो. त्यांच्या अनेक अनमोल गजलांपैकी एक गजल जे माझ्या मनातून ओठांवर सहज येतं.
उम्र जलवों में बसर हो
उम्र जलवों में बसर हो ये ज़रूरी तो नहीं
हर शब-ऐ-ग़म की सहर हो ये ज़रूरी तो नहीं
( आयुष्यभर झगमगाट असावा असे कुणी सांगितले ? दुःख घेऊन येणाऱ्या प्रत्येक रात्री सूर्योदय बघतीलच हे जरुरी नाही)
चश्म-ऐ-साक़ी से पियो या लब-ऐ-सागर से पियो
बेखुदी आठों पहर हो ये ज़रूरी तो नहीं
(मद्य पिरसणारी साकी च्या नजरेनं वा सागराच्या(मद्य) ओठांनी मद्यपान केले तरिही नशा अष्टौप्रहर असेलच असे नाही)
नींद तो दर्द के बिस्तर पे भी आ सकती है
उनकी आगोश में सर हो ये ज़रूरी तो नहीं
(झोप काय वेदनेच्या अंथरूणावरही येऊ शकेल.त्या साठी कुणाच्या मिठीत असणं गरजेचं नाही).
शेख करता तो है मस्जिद में खुदा को सजदे
उसके सजदे में असर हो ये ज़रूरी तो नहीं.
(शेख (पुजारी) मशिदीत (मंदिरात) नमाज (पुजा) अदा करत असेल परंतु त्याच्या भावनेत एवढे बळ असेल कि खुदा (परमेश्वर ) त्याचे ऐकेलच असे नाही).
ह्या ओळी म्हणताना जगजीतसिंग यांनी " सजदे" या शब्दावर अशी बांग दिली आहे कि खरेच कोणीतरी नमाज पढत आहे असे वाटते.
सब की नज़रों में हो साकी ये ज़रूरी है मगर
सब पे साकी की नज़र हो ये ज़रूरी तो नहीं
(इथे साकीची तुलना देवाशी केली आहे. सगळ्यांच्या डोळ्यांत देव असावाच पण देवाच्या दृष्टीत सगळे असतीलच असे नाही)
खामोष देहलवी यांची ही गजल उर्दू भाषेची नजाकत पेश करतो. त्यातील प्रत्येक शेर म्हणजे तत्त्वज्ञान आहे.
भारत सरकारने जगजीतसिंग यांना पद्मभूषण देऊन उचित गौरव केला आहे. शेवटी त्यांच्याच शब्दांत त्यांच्या गायकी बद्दल म्हणावंसं वाटतं कि " तुमसे मिलकर इमली मिठी लगती है, तुमसे बिछडकर शहद भी खारा लगता है."
छान जमलाय लेख! जरा त्रोटक
छान जमलाय लेख! जरा त्रोटक वाटला, अजून लिहिलं असतं तर जास्त मजा आली असती!
लेख आवडला.
लेख आवडला.
सुंदर लेख. आवडला.
सुंदर लेख. आवडला.
जगजीत सिंग यांचे 'ये कागझ की
जगजीत सिंग यांचे 'ये कागझ की कश्ती .....' तर अजरामरच आहे. 'बात निकलेगी', 'कल चौदहवी की रात थी' आणखीही बर्याच छानच आहे पण त्यांनी गायलेल्या सर्व गझलांत 'कागझ की कश्ती' सर्वाधिक आवडते.
@अज्ञातवासी, खूप खूप आभार.
@अज्ञातवासी, खूप खूप आभार.
@सोमा वाटाणे, सर आपले धन्यवाद
@सोमा वाटाणे, सर आपले धन्यवाद.
@सामो, merci beaucoup pour
@सामो, merci beaucoup pour votre réponse.
मस्त लेख ..
मस्त लेख ..
पण या गझलेचा मला सर्वात आवडलेला शेर .. ज्याला हासील-ए-गझल म्हणता येईल असा ... तो आलाच नाही ...
आग को खेल पतंगों ने समझ रखा है,
सबको अंजाम का डर हो, ये ज़रूरी तो नहीं
जगाजीत- चित्रा यांच्या गजल
जगाजीत- चित्रा यांच्या गजल आठवाव्या तरी किती ? माझया सारख्या कित्येक लोकांच्या भावनिक जीवनाचा एक सुगंधी कोपरा आहे त्यांच्या आवाजाने व्यापलेला.
सर्व रसिकाना फसवल त्यानी ....ते जेव्हा म्हणाले होते
मेहेरबां हो के बुला लो मुझे चाहो जिस वख्त
मै गया वख्त नहीं हूं के फिर आ भी ना साकू
@अमर विश्वास, व्वा छान..
@अमर विश्वास, व्वा छान.. जगजीत जी लाईव्ह कार्यक्रमात हा शेर म्हणत होते की नाही ठाऊक नाही पण तुम्ही केलेला उल्लेख आवडला सो नाइस ऑफ यू.
@पशुपत, खरंच... त्यांच्या
@पशुपत, खरंच... त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या त्यांच्या तोडीचा गझल गायक दूर दूर पर्यंत दिसत नाही. धन्यवाद.