प्रलय-२१
काळोख होता . घन काळा कातळ काळोख . स्पर्श रूप रस गंध काहीच नव्हते . फक्त शब्द होते . तेही मनात . मन तरी होतं का...? काहीच जाणीव नव्हती. कोण होता तो ? काय होता तो ? फक्त शब्द होते . नि प्रश्न होते . बाकी काहीच नव्हतं . किती वेळ ..? वेळ तरी होती का..? असेल तर कशाला सापेक्ष धरून मोजणार..? निर्विकार अवस्था म्हणतात ती हीच का...? हळू हळू जाणीव आली . त्याला स्पर्श जाणवला . प्रकाशाला जणू त्याने स्पर्श केला होता . नंतर दिसू लागला तो दिव्य सोनेरी प्रकाश , आणि येऊ लागला सुमधुर सुगंध . त्याला त्याच्या शरीराची जाणीव झाली . नंतर सर्व आठवलं . तो आयुष्यमान होता . त्याला आश्चर्य वाटलं . आजूबाजूला फक्त प्रकाश होता . तो स्पर्शू शकत होता पाहू शकत होता . काय स्वर्गात आहोत की काय असा विचार त्याच्या मनात आला...
" नाही, पुन्हा एकदा जन्माच्या मार्गावरती आहेस तू . " चहुबाजूने आवाज आला . त्याने काही बोलायचे अगोदरच तो आवाज बोलू लागला
" होय तुझा मृत्यू झाला होता . पण तुझी निवड झाली आहे . तूच एक आहेस जो तिचा सामना करू शकतोस , तिला थांबवू शकतोस . तू जर फार उशीर केलास तर तुझी मोहिनी त्याच काळोखात असेल जिथे तू होतास . तेव्हा फार उशीर झाला असेल . तुझ्यासाठी , मोहिनी साठी किंबहुना संपूर्ण जगतासाठी ... उठ जागा हो आणि हा अनर्थ होण्याअगोदरच थांबव....
त्याच्या कानात आवाज घुमत गेला आणि त्याने हळुवारपणे डोळे उघडले . तो पुन्हा एकदा त्या म्हातार्याच्याच महालात होता . त्याने उठायचा प्रयत्न केला पण त्याच्या छातीत भयंकर वेदना झाल्या. त्याच्या छातीतुन सोनेरी प्रकाश बाहेर पडत होता . सुरकूच्या शेपटीला जो आकार होता , तो त्याच्या छातीत होता . त्यांने त्याला स्पर्शुन पाहिले . त्याच प्रकाशाची संवेदन होती जी त्याला अगोदर जाणवली होती .
" थोडक्यात वाचलास किंवा वाचवला गेलायस . तूर्तास तरी ... तो म्हातारा बोलत होता . " प्रलयकारीकिने स्वतः केलेल्या घावातून वाचणारा तू इतिहासात पहिला असशील . ......
" पण ती मोहिनी होती , अचानक तिच्या डोळ्यातील भाव बदलले...
" बहुदा आत्म बलिदानाचा विधी त्यांनी सुरू केला असेल , मग मात्र चिंतेची बाब आहे..." तो म्हातारा त्याच्या लांब पांढऱ्या दाढीवर बोटे फिरवत कपाळावर आठ्या आणित तो म्हणाला . आता त्याचा आवाज फारच गंभीर झाला होता ... " जर आपण तिला लवकरच वाचवलं नाही तर , तिच्यावरती किंबहुना संपूर्ण पृथ्वीवरती काळोखाचे साम्राज्य असेल..."
काळोख शब्द ऐकताच त्याच्या अंगावर शहरे आले . चेहऱ्यावरती भीती दाटून आली . त्याची अवस्था पाहून तो म्हातारा म्हणाला ... " तू अनुभवलाय काळोख , त्याच्या बोलण्यासाठी तो थांबलाच नाही.." तीच अवस्था असेल प्रत्येकाची , पण तीही सुरुवातीला नंतर जाणवेल , दिसेल । पण त्याचं काही चालणार नाही . जनु शरीरावरती दुसऱ्याचा नियंत्रण . त्यातही बर्याच पातळी आहेत . हे सर्वकाही थांबवायचं असेल तर तिला थांबवायलाच हवं . जर तिला तू परत आणू शकत नसशील तर प्रसंगी तिचे बलिदान द्यावे लागेल. हे इथेच संपलं नाही तर ....."
तो म्हातारा खरच घाबरला होता . भीती त्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती ...
" नाही नाही हे थांबायलाच पाहिजे . ...
तो बाहेर गेला काहीतरी आवाज येत राहिले . येताना त्याच्या हातात एक काचेची कुपी होती । त्यात सोनेरी कांतीचे कसलंतरी जल होतं . ते त्याने आयुष्यमानला पाजले.
त्याच्या संपूर्ण शरीरात वेदनेचा कल्लोळ माजला . रक्त हाडे जनु साऱ्याचा चुराडा होत होता. काही काळानंतर त्याला नव्याने जन्मलेल्या सारखं वाटू लागलं . तो सुरुकूच्या शेपटीचा भाग त्याच्या छातीत सामावला होता .
" जा गडबड कर . सांगितलेले लक्षात ठेव . वाचवणं शक्य नसेल तर ......
आयुष्यमान च्या संवेदना तीक्ष्ण झाल्या होत्या . सुरुकू बरोबर जणू मनातल्या मनात बोलू शकत होता . सुरुकूच्या आठवणी बरोबर सुरूकू तिथे हजर झाला। आयुष्यमान त्यावर ती स्वार झाला . त्याच्या मागे ते दोन बुटकेही स्वार झाले...
असाहय्यता अगतिकता या शब्दांचा गर्भित अर्थ त्याला कधी कळालाच नव्हता . आता मात्र त्याला या शब्दांची महती कळली होती . आयुष्मानसमोर प्रलयकारिक उभी होती . होय प्रलयकारिकाच मोहिनी नव्हे . काळेकुट्ट डोळे त्यात कोणताच भाव नव्हता . शरीर जरी तिचं असलं तरी दुसरंच कोणीतरी त्याच्यामध्ये वावरत होतं . जणू मोहिनीच शरीर पांघरून काहीतरी अघोरी या जगात अवतरलं होतं . त्याला उशीर झाला होता . मोहिनीला वाचवण्यासाठी , प्रलयकारीकेला रोखण्यासाठी , त्याच्या प्रेमाची जी छोटीशी जळती ज्योत होती , ती टिकवण्यासाठी उशीर झाला . नि आता अधिक उशीर न होऊ देता , त्या मोहिनीसदृश्य दिसणाऱ्या आकाराला संपवायला हवं होतं . अन्यथा फार मोठा अनर्थ होणार होता .
तो त्या म्हाताऱ्याच्या घरातून निघाला नि तो मोहिनीच्या शोधार्थ विचारांच्या प्रवाहात बुडून गेला . एरवी विचारात इतर मळवटे यायची तसे ती आली नाहीत . विचार स्पष्ट होते . त्याला बऱ्याच गोष्टी दिसत होत्या , जाणवत होत्या ज्या त्याने कधी पहिल्याच नव्हत्या , अनुभवल्याचं नव्हत्या . त्याला आरुषी मोहिनी आणि जंगलातला तो प्रसंग दिसला . रुद्राचा लहान मुलगा मोहिनीच्या हाती मृत्यमुखी जाणं ,तिचं उदास होणं . नंतर झालेली त्यांची भेट . तो प्रणयाचा आवेग . त्याला सारे काही आठवले आणि नव्याने जाणवले . ज्यावेळी तिचा खंजीर त्याच्या हृदयाचा वेध घेत होता , त्यावेळी तिचे डोळे जणू पांढरेशुभ्रच झाले होते . जणू पाटी पुसून कोरी केली असावी . त्यावेळी त्याला पार्थव दिसला , ते लहान मूळ दिसलं आत्मबलिदानाचा विधी , मारुतांचे जुने मंदिर , त्यांचा मुख्य पुजारी आणि त्याठिकानी उभी असलेली मोहिनी . त्याचवेळी सुरुकु नि बुटक्यांसोबत तो मारुतांच्या जुन्या मंदिराकडे जायला वळला . तिथे पोहचला खरा पण त्याला उशीर झाला होता . मधोमध असलेल्या आगीच्या डोहात , त्या प्रज्वलित ज्वालामुखीत मोहिनी आता उडी मारत होती . त्याने ओरडत तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिच्या संवेदना जणू बधिर झाल्या होत्या . एखादा मृतदेह पडावा त्याप्रमाणे तिने आपला देह ज्वालामुखीच्या डोहात फेकून दिला . आयुषमानला राग अनावर झाला . तो त्वेषाने पार्थव आणि त्याच्या वडिलांवरती धावून गेला . दोघेही निष्णात तालवारबाज पण त्याच्यापुढे त्या दोघांचे काहीच चालले नाही . दोनचार डावपेचात त्यांना हरवत कड्यावरून खाली ढकलून दिले .
तोवर इकडे चित्रविचित्र आवाज येऊ लागले . ते लहान मूल कुठेच दिसत नव्हते . त्या ज्वालामुखीवरती लाल तुफान आले होते रक्ताचे. हळू हळू ते तुफान जमिनीवरती आकार घेत होते . पायापासून सुरु होत डोक्यापर्यंत तो मानवी आकार तयार झाला . ते शरीर मोहिनीचंच होतं पण ती मोहिनी नव्हती , ती प्रलयकारिका होती . डोळ्यात थंडपणा होता . मोहिनीला वाचवणे आता कधीच शक्य नव्हते . आयुष्यमानला आता प्रलयकारीकेला मारणे भाग होते . ती जरी प्रलयकारिक असली तरी आयुष्मान साठी अजूनही ती मोहिनीच होती . मोहिनीचा मृत्यू त्याला कधीच शक्य नव्हता . त्याला मोहिनी आठवत होती . तो जागीच स्तब्ध झाला . पण त्याच्याबरोबर आलेले ते बुटके सावध होते . ते दोन बुटके मोहिनीवरती धावून गेले . तिने क्षणभरासाठी डोळे मिटले नि पुन्हा उघडले . त्या काळ्याकुट्ट डोळ्याची कुणालाही भीती वाटली असती पण आयुष्यमान अजूनही तिथे मोहिनीलाच शोधत होता . प्रलकारिकेवरती धावत निघालेले बुटके उलटून आयुष्यमान वरतीच धावून आले . तिकडे प्रलयाकरिका पसार झाली नि इकडे आयुष्यमान त्या बुटक्यांसोबत लढत राहिला .
भीती फार परिणामकारक ठरू शकते , फक्त युक्तीने तिचा वापर व्यवस्थित करता हवा . एकदा भीती बसली सांगितलेल्या आज्ञा आपोआप पाळल्या जातात . त्याच भीतीचा अम्मल आता जंगलातील लोकांवरती होता . आरुषी व मोहिनी दोघीनी थोडे रक्त सांडले व विरोध करायला असमर्थ आहेत हे दाखवून दिले नि ते गपचूप त्यांच्या आज्ञा पाळू लागले . पण सर्वच घाबरत नव्हते . सर्व टोळ्यांच्या प्रमुखांना संदेश पाठवले होते . सर्व जंगली जमातीच्या प्रमुखाची निवड उद्या खुल्या मैदानात आव्हानाने केली जाणार होती . भीतीचा अंमल जरी असला असला तरी परंपरेला पूर्णपणे बाजूला सुरू शकत नव्हते कारण परंपरेविना असलेल्या पदाचा आदेश हे लोक फार काळ मानणारे नव्हते . आरुषीच्या बाजूने रुद्र लढणार होता . एकेक प्रमुख येत होता . प्रतेय्काला परस्तितीची जाणीव होती . इतकी वर्षे रुद्र त्या लोकात राहिला होता तो त्याच्याहून फार वेगळा नव्हता . जेव्हा त्याला त्याच्याच लोकांनी तडीपार केलं होत , मरणासन्न अवस्थेत तो जंगलात पडला होता . त्यावेळी याच लोकांनी त्याला स्वीकारलं होत . त्याला त्यांच्यात मिसळायला वेळ लागला होता पण मीरा सुरवातीपासून त्याच्यासोबत होती कणाकणाने काळ सरत गेला नि तो त्यांच्यातलाच एक झाला . प्रत्येक गोष्टीसाठी त्याला संघर्ष करावा लागला होता पण त्या संघर्षातही मिराचे प्रेम त्याच्यासोबत होते . त्या दोघांच्या प्रेमाला सुरवातीला साऱ्यांनी विरोध केला पण नंतर सारे काही सुरळीत झाले . दोघांचाही लाडका मुलगा राजकीय संघर्षासाठी हकनाक बळी गेला होता . इतकी वर्षे रुद्रा जिवंत आहे की मेलाय हेही ढुंकून न पाहणाऱ्या मारूतांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्याच्याशी संपर्क साधला . त्याच्याशी गोडीगुलाबीने चार शब्द बोलले आणि न जाने कशामुळे रूद्राही त्यांच्या त्या गोड शब्दाला भुलला आणि मदत करण्यासाठी तयार झाला . इतकी वर्षे या लोकांमध्ये राहून , ज्या लोकांनी त्याला घर दिली त्यांच्याशी गद्दारी करायला निघाला होता . त्याला वाटलं नव्हतं की गोष्टी इतक्या खालच्या थराला जातील . मात्र आता त्याला पश्चाताप होत होता . ज्या मारूतांनी त्याला हाकलून लावलं होतं , त त्यांची मदत करत ज्या जंगलातील लोकांनी त्याला स्विकारलं होतं त्यांच्या विरोधात उभा राहणं त्याला पटत नव्हतं . पश्चातापाने तो जळत होता . मीराने त्याच्याशी बोलणं टाळलं होतं त्याचे जे मित्र होते तेही त्याच्याशी बोलेनासे झाले होते . तो एक गद्दार झाला होता आणि प्रत्येकाच्या नजरेत त्याच्याबद्दल द्वेष होता . जे घर त्यानं मिळवलं होतं तेही आता हरवलं होतं . आव्हानाचा दिवस उजाडला होता महाराणी असल्याप्रमाणे आरुषी उच्चासनावरती बसली होती . मध्यभागीलढायची जागा आणि आजूबाजूला त्यांचे दंद्व बघण्यासाठी गर्दी जमली होती . रुद्रा उभा होता त्याच्यातर्फे आव्हान देण्यात आलं होतं . एक एक जण येत होता . त्याच्या सोबत लढत होता . प्रत्येकाची वेगवेगळी शास्त्रे आणि वेगवेगळ्या पद्धती . कितीतरी डाव-प्रतिडाव टाकले जात होते । घाम आणि रक्त मातीत पडत होतं . रुद्रा साऱ्यांना वरचढ ठरत होता . त्याने प्रत्येकाला हरवलं पण एकालाही जीवे मारले नाही त्यांच्यामध्ये पद्धत होती आव्हाना मध्ये एक तरी जिंकायचं किंवा मारायचं . पण रूद्रा प्रत्येक आव्हान जिंकत होता आणि हरलेल्या व्यक्तीला जीवनदान देत होता . ज्याचा स्वाभिमान खूप होता असा एखाद-दुसरा स्वतःहून मरत होता . जेव्हा शेवटचं आव्हान रुद्राने जिंकलं त्यावेळी तो विजयी म्हणून घोषित झाला . पण जल्लोष कोणीच केला नाही ना कोणी आनंद व्यक्त केला .
" तुमच्या नवीन प्रमुखाचा जय जय कार करणार नाही का....? आरुषी म्हणाली रुद्राच्या काना तप्त लाव्हा यासारखे हे वाक्य गेले . त्याच्या डोक्यात संतापाची आग पसरली . रागाच्या भरात त्यांनी तिथेच असलेला भाला घेतला आणि आरुषीच्या दिशेने फेकला . गेल्याने काही क्षणात आरुषीची प्राणज्योत मावळली . मीराचा वडील , ज्याने कधीच त्याला जंगली मानलं नाही त्यांनीच रुद्राच्या नावाचा जयजयकार सुरु केला....
प्रलय-२२
महाराज विश्वकर्मा जलधि राज्याकडून जी पाच हजारांची सैन्य तुकडी घेऊन आले होते त्या तुकडीच्या तळावरती स्मशान शांतता पसरली होती . काही वेळापूर्वी एक जळता तीर येऊन जमिनीत घुसला . त्याच्यावरती असलेल्या संदेशपत्रांमध्ये एक मजकूर लिहिला होता . " गपचूप , जिथून आला तिकडे माघारी जा , अन्यथा तुमच्या महाराज विश्वकर्मासहीत इतर सातही जणांच्या बलिदानासाठी तयार राहा..... "
विक्रमाने रितिरिवाज व परंपरा बाजूला सारत बोलण्यासाठी , संधी करण्यासाठी आलेल्यांवरती पाठीमागून वार केला होता . त्याच्यांबरोबर आलेले सैनिक मारून टाकत उरलेल्यांना कैद करून आणलं होतं . ज्या लोकांना त्याने कैद केलं होतं ते सामान्य सैनिक नव्हते . कसलेली योद्धे , राज्यसभेतील मंत्री , मुत्सद्दी होते . त्यांच्या मृत्यूमुळे जलधि राज्याची सैन्याला कधीच न भरून निघणारी हानी होणार होती . सारेजण विक्रमाच्या ताब्यात असल्याने सेनेची धुरा भगीरथाच्या खांद्यावर होती . त्या स्मशानात शांततेला तोडत तो बोलू लागला....
" जेव्हा जेव्हा शत्रू कूटनीती किंवा कपटकारस्थान करतो त्या त्या वेळी समजून जा कि समोरासमोर युद्ध करायला तो घाबरलेला आहे . याचाच अर्थ विक्रम आपल्या बरोबर युद्ध करायला घाबरत आहे . आपण जरी त्याला घाबरत नसलो तरी आपणही हे त्याच्याशी समोरासमोर युद्ध करू शकत नाही , कारण महाराज विश्वकर्मा सोबत इतर सात मंत्री व मुत्सद्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.... आपण युद्ध करणार हे तर नक्की पण जरा हुशारीने . विक्रमाला आपण दाखवून देऊ आपण जेव्हा कट-कारस्थान करतो त्यावेळी शत्रूची कशी नाकाबंदी होते . उद्या उगवत्या सूर्याबरोबर आपण आपला तळ उठवणार आणि जलधि राज्याच्या दिशेने निघणार , मात्र आपण अगदी मुंगीच्या गतीने हळूहळू निघणार . तेही रात्रीपर्यंत... एकदा का विक्रमाची खात्री पटली की आपण निघून चाललो आहोत , तेव्हा एक तुकडी विक्रमाच्या तळावर जाऊन विश्वकर्मा ना सोडवणार व परत आणणार . तोवर आपल्या लांब पल्ल्याच्या तोफा आपण तयार करून ठेवायच्या व आपले मंत्री आपल्या गोटात आले की तोफा डागायला सुरुवात करायची...." भगीरथाच्या या भाषणाने सेनेमध्ये जोश पसरला . पण या योजनेसाठी ते सात जण नक्की कोठे ठेवले आहेत हे माहीत असणे गरजेचे होते , आणि ते शोधून काढण्याची जबाबदारी भगिरथाने घेतली . " ज्या ठिकाणी त्यांना बंदिस्त ठेवले असेल त्या ठिकाणाहून मी काहीना काहीतरी खून करेन की जेणेकरून तुम्हाला ती अंधारातही दिसेल..." असं म्हणत भगीरथ त्याची हेरगिरी करायला तयार झाला...
विक्रमाच्या सैन्य तळापासून काही अंतरावरती एक नगर होतं . त्यांत भगीरथाने व्यापारी होत प्रवेश केला . मदिरेच्या दुकानातून त्याने मदिरा घेतली . नंतर वैद्याकडून काहीतरी औषधे व सुगंधी द्रव्ये घेतली . बराच वेळ तो सारकाही मिसळत होता . त्याने एक प्रकारची सुगंधित मदिरा तयार केली . त्याच्या व्यापारी मित्राला त्याने एक प्यायला दिला , तो जागीच जिंगल आणि बेशुद्ध झाला . ती मदिरा घेऊन तो विक्रमाच्या सैनिकी त्यावर जाण्यासाठी निघाला . रात्र होण्याची वाट पाहत तो बराच वेळ थांबला . इतके दिवस काही न करता बसून असलेल्या असलेल्या सैनिकांसाठी करमणूक म्हणून वेश्या घेऊन जाण्याचा त्याच्या डोक्यात विचार आला . त्याला विश्वकर्मा व इतर जणांना बंदिस्त केल्याचे ठिकाण तर माहीत झाले होते . त्याच ठिकाणी त्याने वेश्यालयातून काही वेश्या नाचण्याच्या कार्यक्रमासाठी आणल्या . नाचगाण्याच्या कार्यक्रमात गुंग झालेल्या सैनिकाला त्याने सुरुवातीला साध्या मदिरीचे वाटप केलं . नंतर जरा नशा चढल्यावरती , त्याने बनवलेली मदिरा सर्वांना वाटली . एकापाठोपाठ एक सर्व सैनिक बेशुद्ध झाले . आलेल्या वेश्या आल्या वाटेने निघून गेल्या . भगीरथाने एक मोठा टेंबा घेवून लांब बाबूवर बांधून हवेत उंचावला व वाट बघत राहिला.....
ठरल्याप्रमाणे घोडेस्वारांची एक जलद तुकडे विक्रमाच्या सैनिकी तळापासून काही अंतरावर ती थांबली होती . ज्या वेळी हवेत तरंगता टेंबा दिसला त्या वेळी 50 सैनिकांची तुकडी हळूहळू पुढे सरकू लागली . टेहाळणी पथकाचे सैनिक अधून मधून येत होते . त्यांचा तिथेच निकाल लावला जात होता . शेवटी ते अपेक्षित ठिकाणी पोहोचले . सर्व सैनिक बेशुद्ध होते . ज्या ठिकाणी विश्वकर्मा व त्यात सात जणांना बंदिस्त करून ठेवले होतं ते भुयार होतं . " आत फार काही सैनिक नाहीत वरच्या सैनिकांचा तर निकाल लावलाच आहे . " भगीरथ त्यांना म्हणाला . ते सर्व कारागृहात पोचले . सर्वांना सोडून ते बाहेर पडू लागले. पण समोरच एक सैनिक चालत येताना दिसला . त्याला बेशुद्ध पडलेले सैनिक दिसले . त्याचा हात कमरेच्या शंखाला गेला . तोवरच त्याच्या गळ्याचा एका भाल्याने वेध घेतला . तळातून बाहेर पडण्याच्या मार्गावर असतानाच त्या रात्रीच्या शांततेत शंखाचा आवाज घुमला . बाहेर पडले खरे त्यांच्या मागे सैनिक लागले . भगीरथाने गडबडीत जळता तीर त्यांच्या स्वतःच्या तळावरती सोडला , आणि ठरल्याप्रमाणे विक्रमाच्या सैनिकांवर तोफा दहाडून बरसू लागल्या . आता युद्धाला सुरुवात झाली होती....
रुद्रा त्या जंगलातील जमातीचा प्रमुख झाला . त्याला त्याच्या पदावर ती बसवण्यासाठी विशेष कार्यक्रम ठेवलेला होता . नाचगाणे मदिरा स्वादिष्ट जेवण सारं काही होतं . पण रूद्राचे मन थाऱ्यावर ती नव्हतं . मीरा अजूनही त्याला टाळत होती । सारा प्रसंग झाल्यापासून त्यांचं बोलणं झालं नव्हतं. प्रमुखाच्या खोलीत तो समारंभासाठी तयार होत होता . मीरा काहीतरी ठेवण्यासाठी त्याठिकाणी आली . पण त्याला पाहताच ती गडबडीने निघुन जाऊ लागली .
" मीरा माझं म्हणणं ऐकून घे ..." तिला अडवत तो बोलला .
" काय ऐकून घ्यायचं आहे , ज्या लोकांनी तुला घर दिलं , परिवार दिला , प्रेम दिलं . त्यांचा कसा घात केला हे ऐकून घ्यायचं ; की स्वतःच्या फायद्यासाठी पोटच्या पोराचा ही बळी दिला हे ऐकून घ्यायचं ... "
रुद्राला काहीच बोलता आलं नाही .
" मला कळत नाही लोकांनी तुला का म्हणून प्रमुख केलं...? लोक फसतील तुझ्यात चालीला . आरुषीला मारलं म्हणून तुझी पापं धुतली जाणार नाहीत , आणि एक लक्षात ठेव कोणताही निर्णय घेताना विचार करून घे . नाहीतर तुझ्या मृत्यूची गुढ साक्षात देवालाही उघडता येणार नाही . "
त्याचा हात बाजूला सारत रागारागात मीरा निघून गेली . रुद्र अधिकच खचला . केलेल्या कृत्यांचा त्याला पश्चाताप होत होता . आता त्याला स्वतःचाच राग येऊ लागला . कोणत्या क्षणी त्यांना मदत करण्यासाठी तयार झालं असं त्याला वाटू लागलं . रागारागाने त्याने वस्तूंची तोडफोड सुरू केली . शेवटी वैतागून त्याच्या डोळ्यातून पाणी आले. त्याचा पश्चाताप खरा होता पण तो ते कसे सिद्ध करणार... मीराच्या प्रमाणे ते लहान मुल त्याचेही होतं . तो मुलगा त्याचाही होताच......
समारंभ सुरू झाला सुरुवातीला नाचगाण्याचे करामतिचे , आणि नंतर नंतर मोठ्या योद्ध्यांच्या द्वंद्वाचे कार्यक्रम झाले . नंतर त्याच्याकडून शपथ घेण्यात आली " हे जंगल , जंगलातील वृक्ष, वेली , पशुपक्षी , प्राणी , कीटक , माती , हवा ,पाणी या सार्यांची सुरक्षा करण्याची माझी जबाबदारी आहे ...."
त्यानंतर बराच वेळ कार्यक्रम चालत राहिले . रुद्राने भरपूर मदिरा घेतल्यामुळे तो धुंदीत होता . तो धुंदीतच त्याच्या खोलीत आला . त्याठिकाणी मीरा बसली होती.... " मीरा... मीरा ....
तो रडत रडत तिच्याकडे गेला . तो रडत रडतच बोलत होता . पण त्याला बोलू न देता तिने त्याला झोपवले . त्याचे कपडे काढून बाजूला टाकत स्वतः विवस्त्र झाली . रुद्र अजूनही धुंदीत होता . त्याच्या वरती आरुढ होत ती हालचाल करू लागली . काही वेळानंतर रुद्राचे बीज तिच्या गर्भाशयात जातात ती बाजूला झाली . कपडे घालत मागील दाराने निघून गेली . ती मीरा नव्हती . मात्र तेव्हाच पुढील दारा समोर उभी असलेली खरी मीरा रागारागाने तिथून निघून गेली ......
प्रलय-२३
" मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार , म्हणूनच हे बुटके पाठवली होते तुझ्यासोबत , त्यांनाही त्याचं काम पूर्ण करून दिलेलं नाहीस . अरे तुझ्या एकट्याच्या स्वार्थासाठी संपूर्ण जगाचा विनाश केलास की तू...." तो म्हातारा वैतागून आयुष्यमानला बोलत होता ...
" आता आत्मबलिदानाचा विधी पूर्ण झाला म्हटल्यावर , ती संपूर्ण शक्तिशाली झाली . तिला आडवणे आता सर्वथैव अशक्य आहे . ... आता तो म्हातारा पुढे आयुष्यमान आहे हेही विसरला व स्वतःशीच बडबडत सुटला....
" आता काही खरं नाही . तिला कोण थांबवणार...? विनाश कोण रोखणार ....? याचे उत्तर कोणाला माहित आहे.....? कोण ..? कोण ..? कोण...?
तो वेड्यासारखा पळत सुटला...
" हा सापडला..... तंत्रज्ञ मंदार रक्षक राज्यातील उत्तरेच्या जंगलात असलेल्या गुप्त तळावरती आहे तो...... चल लवकर आपल्याला तिथे जायचं आहे.... सुरुकुला बोलव..... लवकर ....प्रलयकारीका कुठे गेली काय माहित......
भिल्लव सार्थक सरोज व उत्तरेच्या तळावरती असलेले सैनिक रक्षक राज्याच्या महाला वरती चालून निघाले होते . सर्व सैनिक काळी भिंत पाडण्यात व्यस्त असल्याने महालाच्या संरक्षणासाठी कमी सैनिक होते . त्याच संधीचा फायदा घेऊन सर्वांनी आक्रमण करण्याचे ठरवले होतं . महाराणी शकुंतलेला याबाबतीत सांगितलं होतं पण त्यांचं कुठेच लक्ष नव्हतं . त्यांचा मुलगा साऱ्यांच्या नजरेदेखत भरदिवसा पळवला होता व कोणीच काही करू शकलं नव्हतं . त्यात अधिक भर म्हणून तंत्रज्ञ मंदार यांनी आत्म बलिदानाचा विधी व त्यासाठी बळी म्हणून राजकुमाराना पळवलं असावं असं सांगितल्यावर तर महाराणी अधिकच निराश झाल्या . सर्व सैनिक दक्षिणेकडे कूच करायला तयार असतानाच आयुष्यमान तो म्हातारा व दोन बुटके त्याठिकाणी सुरुकु सोबत आले . त्यांना व सुरुकु ला पाहून सार्यांनी शस्त्रे उगारली . तंत्रज्ञ मंदारची तब्येत आता बऱ्यापैकी सुधारली होती . तोही घोड्यावरती स्वार झालेला होता . सुरुकुला पाहिल्यावर तो बोलला ...
" अरे हे आपल्या बाजूने आहेत . प्रलयकारिकेला थांबवायचं असेल तर सुरुकु आणि त्याचा मालक लागणारच ना....
" अरे मंदार अगदी तसाच दिसतोय , अजिबात फरक नाही ....." तो म्हातारा मंदारला म्हणाला
" मग तंत्रज्ञ उगाच म्हणतात का लोक मला .... तू मात्र दिवसेंदिवस अधिकच म्हातारा होत आहेस.....
" अरे हा आयुष्यमान , वारसदारांच्या सभेचा प्रमुख . प्रलयकारिकेचा प्रियकर . त्याला जमले नाही . आत्म बलिदानाचा विधी पूर्ण झालाय....
" वाटलं होतं आता त्या तिघींना शोधावे लागेल . मारुत आग्नेय आणि जलधि जरी एकत्र आले तरी फार काळ ती एकी टिकत नाही . त्यामुळे त्यांना एकत्र आणण्यासाठी त्या तिघी शिवाय आपल्याला पर्याय नाही....
" कोण तिघी ..? काय बोलताय तुम्ही ....? " आयुष्यमान म्हणाला .
" कळेल तुला .... मग येतोय ना तिघांना शोधायला... तुला माहिती असेल त्या कुठे आहेत ....." तो म्हातारा मंदारला बोलला
" चला मागच्यावेळी मी ज्यांना पाहिलं होतं त्यावेळी त्या उडत्या बेटावरती स्थायिक होत्या . सुरुवात तिथूनच करूया......" मंदार सुरुकु वरती चढत म्हणाला . पुन्हा एकदा सुरुकु आकाशात उडाला आणि सैन्य दक्षिणेकडे रवाना झाले......
रक्षक राज्यातील आणि जलधि राज्यातील सैनिकांमध्ये युद्ध सुरू झालं होतं . मध्यरात्रीच्या आसपास सुरू झालेले युद्ध अजूनही चालू होतं . तोफा धडाडत होत्या . धनुष्यातून बाण सुटत होते . तलवारी रक्ताने माखलेल्या होत्या . सूर्योदय झाला होता . रक्ताच्या चिखलात अजूनही युद्ध चालूच होतं . एका साध्या करण्यासाठी हजारो सैनिकांचे प्राण जात होते . हळूहळू सूर्य अधिकच तळपू लागला . दोन्ही बाजूकडून नव्या दमाचे सैनिक रणांगणात उतरले . पण अचानक विजेचा कडकडाट झाला . भरदिवसा सूर्यास्त होऊन अंधार पडला . वारे शांत झाले . वातावरण शांत झालं . अचानक झालेला बदल पाहून सैनिकही स्तब्ध झाले...
" पहिल्या प्रलय पाहिला आणि जिवंत राहिले अशा काही मोजक्या लोकांपैकी माझे वडील म्हणजेच तंत्रज्ञ मंदार ........
सर्वत्र आवाज घुमत होता तंत्रज्ञ मंदारचा मुलगा शौनक बोलत होता .
" प्रलय काही एका दिवसात येत नाही . एक-एक घटना त्याला कारणीभूत ठरते . प्रलय येणार हे तेव्हाच नक्की झालं ज्यावेळी महाराज सत्यवर्मानी त्यांच्या राजपुत्राला राजमहालात जाळून दिलं . पण महाराज विक्रमांनी काळ्या भिंतीला पाडण्याचा आदेश देऊन प्रलयकाळ फारच जवळ आणला . तुम्हाला पाहायचंय का प्रलयकाळ काय असेल ......? "
आणि आकाशात चित्रे उमटू लागली . सर्व सैनिक ती दृश्य पाहून घाबरून गेले....
" काळी भिंत पाडल्यानंतर या गोष्टी होणार आहेत त्यामुळे लक्षात घ्या ..... आणखी एक गोष्ट . आपल्या साऱ्यांना माहित आहे । महाराज विक्रम त्यांच्यासाठी खास बनवलेल्या सुवर्ण पात्रात त्यांच्यासाठी खास बनवलेली विशिष्ट अशी मदिरा घेत असतात . ते पात्र व ती मदिरा मारुतांच्या पुजाऱ्यांनी बनवलेली आहे . त्यामुळे महाराज विक्रमांवरती मारूतांचे नियंत्रण आहे . तुमच्या राज्याचे खरे महाराज विश्वकर्मा हेच आहेत...."
हे ऐकताच रक्षक राज्याच्या सैनिकांची तळपायाची आग मस्तकाला गेली . सारे सैनिक विक्रमावरती धावून गेले . काही क्षणातच विक्रमाचे निपचित पडलेले शरीर त्यांनी भिंतीपलीकडे फेकून दिले . महाराज विश्वकर्माच्या नावाचा जयजयकार सुरु केला . सैनिकांनी केलेल्या कृतीची महाराज विश्वकर्मा ना जरी गृना वाटत असली तरी आता मात्र आता ते बोलण्याची वेळ नव्हती....
" जलधी राज्याची सैनात त्रिशुळ सैनिकांसोबत लढण्यासाठी दक्षिणेकडे उभी आहे . हे त्रिशुळसैनिक दुसरे-तिसरे कुणी नसून जलधि राज्याचे नागरिकच आहेत . बाटी जमातीच्या काही टोळ्यांनी ते सैनिक बनवण्यासाठी मारूतांची मदत केली असावी . त्या टोळ्या मारतांच्या जुन्या महालाकडे जात आहेत . आपल्याला कसेही करून त्या टोळ्यांना पकडायलाच हवं . प्रलयकात्र थांबवायचा असल्यास हे करायलाच हवं... "
रक्षक व जलधि राज्याच्या सैनिकांना घेत महाराज विश्वकर्मा जुन्या महलाकडे निघाले . विक्रमाच्या वाधाची आणि इतर बातम्या घेऊन महाराज विश्वकर्मानी महाराज कैरव व महाराणी शकुंतले कडे दूत पाठवले....
प्रलय-२४
ज्यावेळी भगीरथ जलधि राज्याच्या सैनिक तळावरती पोहोचला त्यावेळी सर्वत्र शांतता होती . कौशिका कडे जात त्याने महाराज व मंत्रीगणाला बोलण्याची विनंती केली . सारे जमल्यावरती तो बोलू लागल
" रक्षक राज्याच्या सैनिकांनी विक्रमाचा वध करून त्याला भिंतीपलीकडे फेकून दिले आहे . महाराज विश्वकर्माच्या नियंत्रणाखाली जलधि आणि रक्षक राज्याची सैना बाटी जमातीच्या टोळी मागे त्यांच्या जुन्या महालाकडे गेली आहे . तंत्रज्ञ मंदारचा मुलगा , शौनकचा या सार्यात फार मोठा वाटा आहे . त्यानेच उघड केले की विक्रम हा मारुतांच्या अंमलाखाली होता . आता भिंत तर पडणार नाही , त्यामुळे त्रिशुळ सैनिकांना माणसात आणण्यासाठी आपल्याला बराच वेळ मिळेल ....
हे ऐकल्यावर ती जरा तणावपूर्ण असलेलं वातावरण मोकळे झाले....
त्रिशूळ सैनिकांना माणसात आणण्यासाठी काळ्या भिंती पलीकडील असलेल्या काळ्या महालातील त्रिशूळ आणणं आवश्यक होतं . भिंत पडली असती तर ते शक्य नव्हतं . पण आता भिंत पडणार नव्हती , त्यामुळे राजकार राजकुमार देवव्रत या मोहिमेसाठी झटकन निघाला.....
आता केवळ महाराज कैरव , काही मंत्रीगण राजमहर्षी यांची बैठक जमली होती . भागिरथ बोलत होता ...
" तंत्रज्ञ मंदारचा मुलगा शौनक कडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार - प्रलय येणार हे तेव्हाच निश्चित झालेल्या वेळी महाराज सत्यवर्मांनी त्यांच्या राजकुमारासकट महाल पेटवून दिला . तो पुढे बोलला की ' प्रलयकारिकेचा जन्म झाला आहे . आत्म बलिदानाचा विधीही पूर्ण झालेला आहे . त्या विधीसाठी महाराणी शकुंतलेच्या तिसरा पुत्राचा बळी देण्यात आलेला आहे . प्रलयकारीकेला रोखण्यासाठी सुरूक ने वारसदारच्या सभेच्या प्रमुखाची निवड केली आहे . मात्र अजून त्याला यश आलेले नाही . प्रलयकारीकेला जर खरच थांबवायचं असेल तर जलधि मारुत आणि आग्नेय राजांना एकत्र यावे लागेल ...... "
एवढं बोलून भगिरथ थांबला . त्यानंतर राज महर्षी बोलू लागले....
" पहिल्या प्रलयाच्या वेळी जलधि अग्नेय आणि मारुत ही राज्ये वेगळी नव्हती , एकाच राज्याचे भाग होते . तरीही त्यांना एकत्रपणे लढता आले नाही . आता तरीही तीन राज्य आहेत . एकत्र लढायचे असेल तर काहीतरी समानता असायला हवी . शत्रू एक आहे म्हणून एकत्र येणे ऐवजी कोणत्या तरी चांगल्या करण्यासाठी एकत्र होणं केव्हाही चांगलं . त्यापैकी एक कारण म्हणजे जलधि मारुत आणि अग्नेय हे भाऊ भाऊ होते . एकमेकांचे सख्खे भाऊ होते . ....."
नंतर महाराज कैरवाकडे पाहत राजर्षी बोलले.... " महाराज आपण तिन्ही राज्यांची बैठक लवकरात लवकर बोलवायला हवी....."
त्याबरोबर महाराज कैरवांनी उडत्या बेटावरील आग्नेयांसाठी आणि लपून राहणार या मारुतांसाठी बैठकीचे निमंत्रण पाठवले...
उडत्या बेटावरती अग्नेय राज्यांचं राजांचं राज्य होतं . उडत्या बेटांना उडती बेटे हे नाव का पडलं कोणालाच माहित नव्हतं. फक्त ती समुद्रातील बेटे होती . फार छोटी नव्हती ना अती मोठी होती . आग्नेय राजांची सत्ता फक्त तिथेच होती . त्या बेटांचा बाहेरच्या जगाशी अजिबात संबंध नव्हता . त्या ठिकाणचे लोक बाहेर जायचे नाहीत . सारकाही त्यांना त्या ठिकाणीच उपलब्ध करून दिलं जात होतं . मात्र बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या बऱ्याच प्रमाणात होती . मात्र साऱ्यांनाच आत प्रवेश मिळेल अशातला भाग नव्हता . प्रवेशदार फारच वेगळं होतं . त्या ठिकाणी एकही सैनिक उपस्थित नसायचा . ते दार ओलांडून जाणे अशक्य होतं . लपूनछपून आत प्रवेश करणाऱ्याला जागीच मृत्यू दंड दिला जात असे . त्या ठिकाणी आत प्रवेश करण्यासाठी काही प्रश्न विचारले जायचे . खरी उत्तरे दिली तर ठरवलं जायचं की आत सोडायचं की बेटा बाहेर फेकून द्यायचं . खोटी उत्तरे दिली की आगीचा लोळ यायचा आणि त्या माणसाची जागेला राख व्हायची....
ज्यावेळी पहिला प्रलय आला त्यावेळी अग्नेय राजे सर्वांसोबत उभे राहिले . मात्र जलधि व मारूतांमध्ये असलेल्या भांडणामुळे प्रलयकारीकेला हरवणं अशक्य झाले . त्यामुळे प्रलयकारिकेपासून पासून दूर , बेटांवरती अग्नेय राजे त्यांच्या प्रजेसोबत स्थायिक झाले . उडत्या बैठण भोवती विशिष्ट प्रकारचं कवच होतं . प्रलयकारीकेला त्या ठिकाणी प्रवेश मिळणं सर्वथैव अशक्य होते . त्या ठिकाणी असलेली एक गोष्ट जर प्रलयकारिकेच्या हाती लागली तर प्रलय जागृत करण्यापासून कोणी थांबवु शकत नव्हतं . त्यासाठी अग्नेयांच्या पूर्वजांनी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन ते कवच निर्माण केलं होतं . आग्नेय बेटांवर वृद्ध अजिबातच नव्हते . ठराविक वयानंतर ते अग्नित सामील व्हायचे , आणि तो अग्नी म्हणजेच उडत्या बेटांचा कवच होता . तो अग्नी म्हणजेच उडत्या बेटांचे ज्ञान-विज्ञान युद्धनीती तज्ञ सारकाही होता . त्यां अग्नीकडून आग्नेय राजे सल्ला घ्यायचे . पूर्वजांचे ज्ञान त्यांच्या पाठीशी होतं . तोच अग्नि प्रश्न विचारायचा . तोच अग्नी ठरवायचा कुणाला प्रवेश द्यायचा व कोणाला नाही . न्यायनिवाडाही तोच अग्नि करायचा . कोणताही निर्णय अग्नीला न विचारता घेतला जायचा नाही.....
उडत्या बेटाच्या प्रवेशद्वारावर वरती सुरुकु सोबत आयुष्यमान तंत्रज्ञ मंदार म्हातारा आणि ते दोन बुटके उभे होते ...
" अरे तंत्रज्ञ मंदार नि म्हातारा मांत्रिक दोघेही एक साथ..... " असा आवाज आला आणि ते प्रवेश दार उघडलं गेलं . ते सारे आत निघाले त्याच वेळी आवाज आला....
" नसत्या करामती करू नका . जे करायला आला आहे ते करा व गुपचूप निघा .....
आणि ते दार बंद झाले
काळ्या महालातील शस्त्रागारात असणारा त्रिशूळ आणण्यासाठी देवव्रत निघाला . प्रवास खूप मोठा होता . काही दिवस पुरेल एवढेच अन्न पाणी त्याने घेतले होते . मात्र काही तासाच्या प्रवासानंतर त्याचा घोडा दमला . एक उत्तम प्रजातीचे जनावर कितीतरी दिवसाचा प्रवास न थकता करणारे , भिंतीच्या पलीकडे असल्याने काही तासाच्या प्रवासात फारच दमले . देवव्रत घोड्यावरून उतरला . त्याला तिथेच सोडला , आणि तो चालत पुढे निघाला . संपूर्ण जमीन उजाड होती . एकही हिरवे झुडूप नव्हते . उन्हाच्या झळा लागून त्यांची त्वचा जळत होती . काही तास चालल्यानंतर त्याला थकवा जाणवू लागला . त्याची पावले जड झाली . डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली . आणि तो बेशुद्ध झाला....
गार वार्याने त्याला जाग आली . थंडगार पाण्याने भरलेल्या तळ्याकाठी गार लुसलुशीत गवतावरती मखमली कापडावरती तो विवस्त्र पडला होता . दुरून एक अतिसुंदर नारी येताना दिसत होती . तिला पाहताच राजकुमार देवव्रत मोहित झाला , पण अन्विची आठवण होताच त्याला अपराधीपणा वाटला . महाराज विश्वकर्माची मुलगी अन्वी व राजकुमार देवव्रत यांचं निस्सिंम प्रेम होतं . त्याने त्या सुंदर नारीकडे बघायचे टाळले . ती जवळ आली....
" देवव्रत माझ्याकडे बघणार देखील नाहीस का....
तो अन्वीचा आवाज होता . त्याने तिच्याकडे पाहिलं . ती अन्वीच होती . त्याला वाटलं हे स्वप्न असावं . त्याने तिला त्याच्या बाहुपाशात घेतले . ओठला ओठ स्पर्श होताच दोघांचेही शरीरे थरथरुन निघाली . त्याचे हात तिच्या शरीराभोवती मुक्तपणे फिरू लागले . ती सुखाची उसासे टाकत होती. श्वासोच्छवास वाढत गेले . एकमेकांची शरीरे कितीही अनुभवली तरी त्यांची मने तृप्त होतच नव्हती . बराच वेळ त्यांची प्रणयक्रिडा चालू राहिली. त्या कोवळ्या उन्हातही ते घामाने नाहून निघाले . शेवटी एकमेकांच्या बाहुपाशात तिथेच झोपी गेले.
उन्हाच्या झळ्याने त्याला जाग आली . देवव्रत जागा झाला . संपूर्ण शरीर घामाने भिजले होते . त्याच्या शरीराला अत्तराचा वास येत होता . बाजूला तो सोनेरी त्रिशूळ पडला होता . ज्या ठिकाणी त्याने घोडा सोडला होता तिथेच त्याला जाग आली होती . घोडा अजूनही तिथेच होता . काय झालं हे त्यालाही माहीत नव्हतं . पण ज्या त्रिशुळासाठी तो आला होता ते त्रिशूळ मात्र त्याला मिळालं होतं . त्रिशुळ घेऊन घोड्यावरती बसत तो जलधि राज्याच्या सैन्यतळाकडे निघाला
प्रलय-२५
सुवर्णनगर , लोहगड , रत्नागिरी अग्नी आणि ज्वाला ही पाच संसाधनं राज्य होती . पाच राज्यात नावाप्रमाणेच विविध खनिजे व संपत्ती होती . त्या पाच राज्यांवर ती इतर सर्व राज्यांची मिळून सत्ता होती . स्थानिक लोकांना म्हणजेच मातील्या लोकांना तिथे बळजबरीने कामाला लावले जात होते . मात्र त्या लोकांनी उठाव करून पाचही राज्य ताब्यात घेतली होती . मातीतल्या लोकांचा नेता अंकित होता . पाच राज्यांमध्ये आता त्याच्या नेतृत्वाखाली बरेच बदल झाले होते . त्यांच्याकडून जनावरासारखे काम करून घेतले जायचे आणि पुरेसे अन्नही नाही दिले जायचे . पूर्वी इतर राज्यांची सत्ता असल्याने व्यापार नावाची गोष्टच नव्हती. जे ते राज्य लागेल त्या गोष्टी ज्यांच्या त्यांच्या हिश्यातून घेऊन जायचे. त्यामध्ये हाल व्हायचे तिथे स्थानिक लोकांचे. इतर लोक त्यांना मातीतले लोक म्हणायचे खरे मात्र ते स्वतःला पहिले मानव म्हणायचे . तसे पाहता आता संसाधन राज्ये पूर्णपणे प्रथम मानवांच्या ताब्यात होते . त्यांनी स्वतःच सैन्यही तयार केलं होतं . उपलब्ध खनिजांपासून वेगवेगळी शस्त्रेही तयार केली होती . जरी बाहेरून कोणी आक्रमण केलं तरी तरीही त्यांना सहजासहजी राज्य हस्तगत करता येणार नव्हतं .
पूर्वी पाच नामधारी राजे होते त्यांना दररोज आठ तास काम काम करायला लावलं जात होतं , आणि पूर्वी जे इतर लोकांना खायलख जे अन्न दिलं जात असे तेच त्यांनाही दिलं जात होतं . पूर्वी त्या लोकांना त्रास होत होता तो आता बंद झाला होता . अंकित पाच राज्याचा प्रमुख असला तरी प्रत्येक राज्यात पाच जणांचं विश्वस्त मंडळ असे 25 जण त्याने सर्व कारभार चालवण्यासाठी निवडले होते . त्याला वाटलं होतं सर्व राज्य आपल्या लोकांकडे आल्यावरती पहिल्यांदा विरोध होईल तो बाहेरील राज्यांचा , ज्यांनी त्यांच्यावरती गुलामगिरी लादली होती त्यांचा . मात्र ज्या विश्वस्त मंडळाच्या ताब्यात त्याने लोहगड हे राज्य सांभाळण्यासाठी दिलं होतं त्यांनी त्याच्या विरुद्ध उठाव केला . त्यांच्याशी हर प्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न करून पाहिल्यानंतर शेवटी सैनिक घेऊन स्वारी करण्याचे ठरवले . त्याची युद्धनीती भयानक होती . फार काही रक्त न सांडता लोहगड त्याच्या ताब्यात आले . त्या पाच गद्दार नेत्यांना व त्याच्या विश्वासू नि खास निवडक लोकांना त्याच्यापुढे उपस्थित केले होते ......
" पिढ्यानपिढ्या आपण आपलं जीवन गुलामगिरीत जगत होतो . आपण या पृथ्वीतलावरील प्रथम मानव , मुक्तपणे पृथ्वीतलावरती विहार करण्याऐवजी या खाणीत काम करण्याची गुलामी त्यांनी आपल्यावरती लादली . आपल्याला आपले सण-उत्सवही साजरे करता येत नव्हते . आपली परंपरा पुढे चालवता येत नव्हती . आपण फक्त जनावरासारखे काम करत होतो . आता उठावानंतर परिस्थिती बदललेली आहे . पाचही राज्यावरती आपली सत्ता आहे . आता आपण एकत्र यायचं सोडून याच्यांसारखे लोक आपल्या आपल्यात फूट पाडत आहेत . आता तर कधी नव्हे ते अधिक एकत्र येण्याची गरज आहे . या पृथ्वीतलावरील खनिज संपत्ती आपल्या ताब्यात आहे . आपण काहीही शक्य करू शकतो . फक्त गरज आहे ती एकत्र येण्याची . आपापसात मतभेद नकोत . कुणाला काही बोलायचे असेल तर त्यांनं समोर येऊन बोलावं , प्रत्येकाच्या मताचा आदर केला जाईल . पण पाठीमागे असले धंदे करू नयेत . ......."
असं म्हणत त्याने त्याची तलवार काढली व पाच जणांचा प्रमुख ज्यानं सर्वांच्या डोक्यात विश पेरलं होतं त्याचं शीर धडावेगळे केले....
" हा आपलाच माणूस होता , पण या एका माणसामुळे आपली १७ माणसे मृत्युमुखी पडली . त्यामुळे त्याला शिक्षा होणं आवश्यक होतं.......
अंकितच्या अशा धडाडीच्या निर्णयामुळे प्रथम मानवांचा प्रमुख झाला होता त्याच्या प्रत्येक निर्णयाला सामान्य जनतेचा पाठिंबा असायचा.....
मारूतांच्या जुन्या महालात मुख्य पुजारी भैरव त्याचा मुलगा पार्थव आणि प्रलयकारिका उभे होते . तो महाल मारूतांच्या गतवैभवाची साक्ष देत होता . मात्र आता त्याची अवस्था दयनीय झाली होती .
" आपल्याला जर सार्या पृथ्वीवरती साम्राज्य पसरवायचं असेल तर पहिल्यांदा संसाधन राज्य ताब्यात घ्यावी लागतील एकदा का संसाधन राज्यांवर की सत्ता आली की बाकीच्या राज्यांवर ती सत्ता मिळविण्याचा मार्ग मोकळा होतो ......" भैरव बोलत होता .
संपूर्ण पृथ्वीवरती साम्राज्य प्रस्थापित करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती . प्रलयकारी केला जागृत करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरून तो आगीशी खेळत होता . त्याने प्रत्येक विधीमध्ये थोडाफार बदल केला होता जेणेकरून प्रलयकारीका त्याच्या ताब्यात राहील .
" पण उडत्या बेटांवरती असलेलं प्रलयाला जागृत करण्यासाठी लागणारे........
प्रलयकारी का भैरवाला तोडत मध्येच बोलू लागली । पण तिचं वाक्य पूर्ण होण्याअगोदर ही भैरवाने त्याच्या हाताची मूठ वळताच ती तडफडून खाली पडली व भयंकर वेदनांमुळे विव्हळू लागली.....
" मी सांगतो तेच करायचं बाकीचं बोलायचं नाही.....
भैरव बोलला . भैरवने केलेल्या विधींमुळे तिची शक्ती भैरव आणि त्याचा मुलगा पार्थव या दोघांवरतीही चालत नव्हती....
" संसाधन राज्यात मध्यंतरी उठाव होऊन नवीन राजा उदयाला आला आहे . मला त्याचं मस्तक हवं आहे . आणि सार्यांना कामाला लाव . खनिज तेल , कोळसा लोखंड आता भरपूर लागणार आहे . त्याने प्रलयकारिकेला आदेश दिला . ती गपचूप तिथून निघून गेली .
" पार्थ तुला तू विश्वनाथ माहित आहे ना रे .....
भैरव तो मुख्य पुजारी त्याच्या मुलाला म्हणाला
" हो माहित आहे ....
" तो कुठे आहे हे जरा माहिती कर.... त्याची भेट घ्यायची आहे . आपल्या नियोजनाप्रमाणे काळी भिंत पडायला हवी होती . मात्र त्या तंत्रज्ञ मंदारच्या मुलाने मध्येच घोळ घातला . आपल्याला लवकरात लवकर भिंतीपलीकडील सम्राटाची गरज आहे . कारण मारुत आग्नेय आणि जलधि राजे एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत . त्यांच्यासोबत तंत्रज्ञ मंदारही आहे . त्यामुळे निव्वळ प्रलयकारीका असून भागणार नाही....
त्याचा आज्ञाकारी पुत्र पाठव लगेच निघून गेला. मारुतांचा मुख्य पुजारी म्हणजेच भैरव कितीतरी वर्षांपासून नियोजन करून , प्रत्येक घटना त्यावर ती येणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया यांचा अभ्यास करून त्याने अतिशय कलाकुसरीने विजयासाठी असणारा हा सारा साचा तयार केला होता . लहानपणी तो मारूतांच्या आश्रयाला होता . त्यावेळी त्यांच्याकडे ना कोणतं राज्य होतं ना कसाची सत्ता होती तरीही त्यांच्याकडे किती गर्व असायचा . भैरवाची लहानपणी फार हुडतूड व्हायची . त्यामुळे त्याच्या मनात त्यांच्याविरुद्ध द्वेष भरला होता . अकराव्या मारूत राजाच्या पत्नीला जेव्हा प्रसुती वेदना चालू झाल्या त्यावेळी दुसऱ्या एका दासीलाही प्रसूतिवेदना सुरू होत्या . भैरव हा बऱ्याच शास्त्रांमध्ये निपुण होता. वैद्यकीय शिक्षणातही त्याचा कोणी हात धरू शकत नसे . अकरावा राजा मारुत कितीतरी वर्षापासून मुलासाठी प्रयत्न करत होता . मात्र अजूनही त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले नव्हते . मात्र यावेळी राणी गरोदर राहिली होती आणि मुलही सुदृढ जन्माला आले. पण भैरवाने राणीचा मुलगा दासीच्या मुलीबरोबर बदलला . ती मुलगी म्हणजे आरुषी होती व तो मुलगा म्हणजे रुद्र होता . भैरवाच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. जर रुद्राचा मृत्यु झाला तर तीन राजे एकत्र येणारच नाहीत आणि प्रलयकरिकेला कोणीच अडवू शकणार नाही .
व्वा शुभम खुप दिवसांनी प्रलय
व्वा शुभम खुप दिवसांनी प्रलय चां नवा भाग आला.... मला वाटलं विसरलास की काय..... अजुन वाचला नाही.... आधीचे सगळे भाग वाचले आहेत..... सुरेख कथा आहे.
५ भाग एकत्र आहेत ना... वाचुन कळवते.
नक्कीच .......
नक्कीच .......
बिनधास्त सांगा......
बरीचशी सरमिसळ वाटतेय!
बरीचशी सरमिसळ वाटतेय!
पुभाप्र!
___/\___धन्यवाद ___/\___
___/\___धन्यवाद ___/\___
सरमिसळ .....?
वाचताना गोंधळ होतोय का....?
Itkya divsanni link lagan
Itkya divsanni link lagan kathin ahe.
हे मात्र खराय ......
हे मात्र खराय ......
Sorry br ka....
झालं वाचुन... छान लिहिलंय
झालं वाचुन... छान लिहिलंय नेहमीप्रमाणे !
Dhanywad
Dhanywad
Mastt Jhalay ha bhag...pan
Mastt Jhalay ha bhag...pan pudhil bhag lavkar taka. visarayala hotay
Ho nakkich .....
Ho nakkich .....
Dhanyawad......