आणखी काही तिरळे
गारव्याची टाप
शुभ्र धुक्यात वाजतीये
दव थरथरतंय
तुझी आठवण
तुझीच साठवण गात्री
अशा कितीतरी रात्री
उन्हाचा तुकडा
माझ्या चाहुलीने हलला
फुलावर जाऊन बसला.
(आधारित)
मी लहान की महान ?
नव्हे, मी चंदन
मीच सहाण.
चमचमत्या कातीव जेलीवर
आली हळूच एक चेरी...
विहिरीत डोकावलो तेव्हाची गोष्ट.
जमिनीवर पडले
काचेचे बिलोरी तुकडे
सूर्य निरखीत बसला रुपडे
पानांतून ठिबकत
चंद्रकिरणे यायची...
तिथे रोपटं उगवलंय.
रेखीव नदीकाठी
चित्रकार बसलाय
चित्र पूर्ण करत
वाहत्या रस्त्याकाठी खोपटात
तो चहा पितो एकटाच
रस्त्याकडे पाठ करून
धबधब्याच्या शेजारून
चोरल पाउलवाट जाते
नको नको करत भिजते.
ढगांआडून डोकावीत थोडं
पावसाला घातलं उन्हाने
एक सप्तरंगी कोडं
अर्धा रिकामा की अर्धा भरलेला
वाद कशाला घालायचा ?!
पूर्ण भरलेला मागवायचा
लपाछपी खेळताना त्याने
मला कधीच धप्पा दिला नाही ---
परवा त्याचं राज्य संपल्यावर आठवलं
सही आहेत
सही आहेत .सगळे आवडले
थोडक्यात खूप काही.
~ प्रकाश ~
वार्याची
वार्याची बात !
वार्यावरची नाही !! ---
"छान रे, स्लार्टी. "
गुलजारसाहेबांच्या त्रिवेणीची
गुलजारसाहेबांच्या त्रिवेणीची आठवण झाली. काव्यप्रकार उत्कट आहे,मग नाव का असे तिरळे ठेवले?
<< लपाछपी खेळताना त्याने मला
<< लपाछपी खेळताना त्याने
मला कधीच धप्पा दिला नाही ---
परवा त्याचं राज्य संपल्यावर आठवलं >>
फार सुंदर! आवडलं....
ढगांच्या गर्दीत लपून बसलाय
ढगांच्या गर्दीत
लपून बसलाय चोर,
पळून जाण्यासाठी....
कपारीतला झरा,
म्हणतोय कसा आता,
मी होणार धबधबा कोसळणारा..
काळ्या भुईतलां अंकूर,
नव्या जन्मासाठी,
दुभंगला दोन बाजूत...
सर्वच 'तिरळ्या' छान आहेत. हे
सर्वच 'तिरळ्या' छान आहेत. हे हायकू नाहीत काय? शांता शेळके यांच एक पुस्तकच आहे अशा हायकूंचं!!
मी अशा कवितांना अशीच नावे ठेवली होती:
१ ओळ = अकेली
२ ओळी = दुरळी
३ ओळी = तिरळी
४ ओळी = चारोळी
५ ओळी = पांचाळी
६ ओळी = सावळी
७ ओळी = सुतळी
८ ओळी = आरोळी
९ ओळी = नवरी
१० ओळी = ढवळी
<<<मी लहान की महान ? नव्हे,
<<<मी लहान की महान ?
नव्हे, मी चंदन
मीच सहाण.
लपाछपी खेळताना त्याने
मला कधीच धप्पा दिला नाही ---
परवा त्याचं राज्य संपल्यावर आठवलं<<<
जबरीच !
शरद >>>८ ओळी = आरोळी<<< आठोळी ?
Pages