आणखी काही तिरळे
गारव्याची टाप
शुभ्र धुक्यात वाजतीये
दव थरथरतंय
तुझी आठवण
तुझीच साठवण गात्री
अशा कितीतरी रात्री
उन्हाचा तुकडा
माझ्या चाहुलीने हलला
फुलावर जाऊन बसला.
(आधारित)
मी लहान की महान ?
नव्हे, मी चंदन
मीच सहाण.
चमचमत्या कातीव जेलीवर
आली हळूच एक चेरी...
विहिरीत डोकावलो तेव्हाची गोष्ट.
जमिनीवर पडले
काचेचे बिलोरी तुकडे
सूर्य निरखीत बसला रुपडे
पानांतून ठिबकत
चंद्रकिरणे यायची...
तिथे रोपटं उगवलंय.
रेखीव नदीकाठी
चित्रकार बसलाय
चित्र पूर्ण करत
वाहत्या रस्त्याकाठी खोपटात
तो चहा पितो एकटाच
रस्त्याकडे पाठ करून
धबधब्याच्या शेजारून
चोरल पाउलवाट जाते
नको नको करत भिजते.
ढगांआडून डोकावीत थोडं
पावसाला घातलं उन्हाने
एक सप्तरंगी कोडं
अर्धा रिकामा की अर्धा भरलेला
वाद कशाला घालायचा ?!
पूर्ण भरलेला मागवायचा
लपाछपी खेळताना त्याने
मला कधीच धप्पा दिला नाही ---
परवा त्याचं राज्य संपल्यावर आठवलं
छान.
छान.
स्लार्टी,
स्लार्टी, असं का नाव दिलंय? की मीच तिरळी आहे कुणास ठाऊक मला आधी वाटलं नादखुळा आणि डार्लिंग सारखं काहितरी असेल पण छान आहे.
फक्त --
चमचमत्या कातीव जेलीवर
आली हळूच एक चेरी...
विहिरीत डोकावलो तेव्हाची गोष्ट.
-- हे काय कळ्ळं नाही. जेली व चेरी एकत्र ठीक आहे पण विहिरीत कशाला डोकावलास? की चमचमती जेली म्हणजे विहिरीतलं पाणी आणि हळूच येणारी चेरी म्हणजे तुझ्या डोकावणार्या डोक्याचं पाण्यातलं प्रतिबिंब? तू चेरी????
************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |
उन्हाचा
उन्हाचा तुकडा
माझ्या चाहुलीने हलला
फुलावर जाऊन बसला.
जमिनीवर पडले
काचेचे बिलोरी तुकडे
सूर्य निरखीत बसला रुपडे
ढगांआडून डोकावीत थोडं
पावसाला घातलं उन्हाने
एक सप्तरंगी कोडं
>>> हे आवडले... बाकीचे पण छान आहेत पण हे जास्ती आवडले.
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा
मिल्या,
मिल्या, तुला कळलं आहे तर ते जेलीचं काय ते सांग ना
************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |
अश्विनी
अश्विनी मलाही नाही कळले तू म्हणतेस तसेच काहितरी वाटतेय.. स्लार्टीच सांगू शकेल नक्की काय ते...
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा
तसंच आहे
तसंच आहे ते.
विहीरीतलं पाणी चकाकत असणार उन्हाने. त्यात याच्या डोक्याचे प्रतिबिंब आले आणि ते चेरी सारखे दिसले त्याला (कोणाला आजकाल काय दिसेल काही सांगता येत नाही..उन्हाने झाले असावे असे )
धन्यवाद. अश
धन्यवाद.
अश्विनी, बरोबर ओळखलंस, फक्त एक तपशील राहिला होता तो मिलिंदाने सांगितला विहिरीतल्या पाण्यात प्रकाशाचे कवडसे पडले होते. हे पाणी मधूनच डचमळत होतं जशी जेली हलते तसेच. विहिरीत डोकावलो तेव्हा सूर्य वरच असल्याने माझं प्रतिबिंब म्हणजे फक्त बाह्याकृती दिसली. त्याचवेळी परावर्तित कवडसे डोळ्यांत गेल्यामुळे डोळे एकदम मिटले जाऊन उघडले गेले, डोळ्यांसमोर लाल वर्तुळे दिसली. ती वर्तुळे, माझ्या डोक्याची पाण्यातली सावली आणि ते चमकते डुचमळणारे पाणी असा एकत्रित परीणाम.
तीन ओळींच्या कवितेसाठी माबोने (चारोळीवरून) तिरळा हा शब्द काढला हायकूंच्या तांत्रिक नियमांमध्ये वरील सर्वच तिरळे बसत नाहीत असा माझा अंदाज आहे, म्हणून मी तिरळा शब्द ठेवला आहे.
थोडेसे चित्रकाराच्या तिरळ्याविषयी -
बाहेरदेशी मला दिसले की बर्याच निसर्गरमणीय ठिकाणी चित्रकार चित्रे काढताना दिसतात. त्यामुळे कधीकधी एखाद्या सुंदर ठिकाणी माझ्या डोक्यात 'इथे चित्रकार कुठेत ?' असा विचार येतो... चित्रकाराची उपस्थिती माझ्या डोक्यातले चित्र पूर्ण करते.
***
दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)
स्लार्टी,
स्लार्टी, तुझ्यातला (नव)कवी माहीत नव्हता पण चांगलं लिहिलय्स.
आता प्रथेप्रमाणे एक पीजे सहन कर---
<<<त्याचवेळी परावर्तित कवडसे डोळ्यांत गेल्यामुळे डोळे एकदम मिटले जाऊन उघडले गेले, डोळ्यांसमोर लाल वर्तुळे दिसली. ती वर्तुळे, माझ्या डोक्याची पाण्यातली सावली आणि ते चमकते डुचमळणारे पाणी असा एकत्रित परीणाम.>>
---- आली रे बाबा तुझ्या कवीमनाची अनुभुती आणि डोळ्यापुढे काजवे चमकले (सिरियस नोटः नशिब हे असलं काही झाल्याने विहिरीत पडला नाहिस)
************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |
लपाछपी
लपाछपी खेळताना त्याने
मला कधीच धप्पा दिला नाही ---
परवा त्याचं राज्य संपल्यावर आठवलं
>> हे भारी . खळ्ळ्कन पाणी आलं डोळ्यात. असे 'ते' लाभायला खास भाग्य लागतं!
लपाछपी
लपाछपी खेळताना त्याने
मला कधीच धप्पा दिला नाही ---
परवा त्याचं राज्य संपल्यावर आठवलं >>> हे विशेष आवडलं.
उन्हाचा तुकडा
माझ्या चाहुलीने हलला
फुलावर जाऊन बसला >>> गोड कल्पना आहे एकदम. डोळ्यांसमोर चित्र आलं
ह्म हा प्रकार चांगला आहे. तीन ओळीत कितीतरी सांगुन जातोय. ते नादखुळा प्रकरण काही झेपलं नाही
मस्त..
मस्त..
लपाछपी खेळताना त्याने
मला कधीच धप्पा दिला नाही ---
परवा त्याचं राज्य संपल्यावर आठवलं >>> हे खास..
असं काही कळलं की बरं वाटतं ..
सुरेख रे
सुरेख रे !
>>धबधब्याच्या शेजारून
>>चोरल पाउलवाट जाते
>>नको नको करत भिजते
मस्तच!
स्लार्टी
स्लार्टी हे लपाछपीचे तू आधी लिहीले होतेस ना? (बहुदा पुण्याचा बाफवर).
(नसेल तर, मायबोलीवर पुढे काय लिहीले जाणारं हे माझ्या स्वप्नात आले बहुदा)
आवडले ... PK
आवडले ... PK नंतर बर्याच दिवसांनी असे भरघोस तिरळे वाचले.
जमिनीवर पडले
काचेचे बिलोरी तुकडे
सूर्य निरखीत बसला रुपडे
पानांतून ठिबकत
चंद्रकिरणे यायची...
तिथे रोपटं उगवलंय.
हे अपूर्ण वाटतात (Pk ने सुरू केलेल्या व्याख्येप्रमाणे)
सगळे तिरळे
सगळे तिरळे सहीच.
शेवटचे दोन तीन मलाही मायबोलीवर वाचल्यासारखे वाटतायेत. सिग्नेचर मध्ये होते का तुझ्या?
छान
छान लिहिलंयस स्लार्टी...
कसले क्युट
कसले क्युट क्युट आहेत तिरळे..
कल्पना सहीच आहेत! विहीर चेरी जेली
धन्यवाद. या
धन्यवाद.
यातले काही सही म्हणून वापरले आहेत. असामी, पीकेची व्याख्या आठवत नाही. काय होती ?
***
दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)
आवडले
आवडले सगळेच तिरळे, हो पीकेची आठवण आली हा प्रकार दुसर कोणी लिहिल्याच आठवत नाही.
पानांतून ठिबकत
चंद्रकिरणे यायची...
तिथे रोपटं उगवलंय.>>>>गुलजार आठवला
परवा त्याचं राज्य संपल्यावर आठवलं >>>> कडेलोट....जबरदस्त पंच.
स्लार्ट्य
स्लार्ट्या जबरी रे.. एक अन् एक आवडला (आणि कळला हे जास्त महत्वाचे).. गुलजारच्या त्रिवेणीची आठवण आली (शांता शेळक्यानी केलेला अनुवाद). आता थांबु नकोस. पुढचे तिरळे टाक बरं..
________________________
अपने हाथोंकी ल़कीरोंपर इतना विश्वास मत करना,
जिनके हाथ नही होते उनकी भी तकदीर होती है
सही आहेत!
सही आहेत! जेली-चेरी तितकासा झेपला नाही, पण पटला. बाकीचे सगळे मस्तच.
स्लार्ट्य
स्लार्ट्या, तिरळे मस्त आहेत.
अवांतर: तो शेवटचा धप्पावाला तिरळा तूच अलक म्हणूनही टाकलायस ना? (बाकीच्यांचं सोडा, तुलाही आठवत नाहीये?)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.
तुझी
तुझी आठवण
तुझीच साठवण गात्री
अशा कितीतरी रात्री
मी लहान की महान ?
नव्हे, मी चंदन
मीच सहाण.
ढगांआडून डोकावीत थोडं
पावसाला घातलं उन्हाने
एक सप्तरंगी कोडं
>>>>
सुंदर!
जाताजाता, 'आणखी काही तिरळे' म्हणजे? आधीचे कुठेयत? लिंक देणार का? कृपया?
मला
मला आठवतंय.... तू म्हटल्यावर. कशी आहेस, माते?
सगळेच सही
सगळेच सही आहेत स्लार्टी...
--------------------------
फिर छिडी बात.. बात फूलोंकी...
अर्रे! हे
अर्रे! हे आज पाहिलं! छान आहेत!
सूर्य निरखीत बसला रुपडे, 'चित्रकार', आणि 'धप्पा' ग्रेट आहेत!
जाताजाता: 'धप्पा' राहून राहून कुठेतरी वाचल्या/पाहिल्यासारखा वाटत होता. आणि कुठे ते न आठवल्यानं चुटपुट कम डोक्याला ताण हे प्रकार चालू होते..
तेवढ्यात प्रतिसादात वाचलं, आणि एकदम साक्षात्कार झाला!
अजून काय
अजून काय सांगू? खूप खूप छाsssन वाटलं असं मोजकंच पण अर्थपूर्ण वाचून.
सूर्य, जेली, धप्पा, चंदन, धबधबा, चहा...प्रत्येक दाद घेऊन गेला माझी.
मी लहान की
मी लहान की महान ?
नव्हे, मी चंदन
मीच सहाण.
चमचमत्या कातीव जेलीवर
आली हळूच एक चेरी...
विहिरीत डोकावलो तेव्हाची गोष्ट.>>>
हे दोन आवडले. मस्तच. शेवटचा अप्रतिम. कळायला थोडा उशीर झाला.
>चमचमत्या
>चमचमत्या कातीव जेलीवर
आली हळूच एक चेरी...
विहिरीत डोकावलो तेव्हाची गोष्ट.
थोडासा बदल करून घेतला अन तिरळा कळला बघा. नेहेमी perspective स्पष्ट असला की सर्व कळतय:
चमचमत्या कातीव जेलीवर
आली हळूच एक चेरी...
बाटलीत डोकावलो तेव्हाची गोष्ट.
असाम्यास
असाम्यास अनुमोदक....
स्लार्टी तीरळे छान!
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
http://www.peshawai.blogspot.com
:::::::::::::::::::::::::
Pages