प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं !!!

Submitted by Sujata Siddha on 27 September, 2019 - 08:16

“काल तू प्रॉन्झ खायला गेला होतास ?”
“ हो , तुला कसं कळलं ? “
“That is not important ..रिया बरोबर गेला होतास ? ”
“ ए नाही ए , काहीही काय , मी ताईकडे जेवायला गेलो होतो , तिचा फोन आलेला मला “
“हो ? ताईला काय अचानक स्वप्न पडलं होतं का ? तुला प्रॉन्झ खायचे आहेत म्हणून ? “
“अगं नाही , तिला माहितीये मला आवडतात .तुला खोटं वाटत असेल तर ताईला फोन लावून देतो हे बघ आत्ता लगेच बोल ”
“काही नको , तुला माहितीये मी ताईला अजुन भेटले नाहीये , आणि असलं काही मी चुकूनही विचारणार नाही , “
“अगं पण मी नाही गेलो रिया बरोबर “
“हे बघ सन्मित तू खोटं बोलू नको, मला आजिबात आवडत नाही खोटं बोललेलं . तू तिच्या बरोबर गेला होतास हे मला पक्क माहिती आहे , फक्त मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे . “
“ अगं नाही , मी गेलोच नाही तर का कबूल करू ?”
“पुन्हा तेच , कसला आतल्या गाठीचा आहेस ना तू ? काल माझा weekly off होता , आणि तुला ऑफिस होत म्हणून आपण संध्याकाळी भेटलो आणि तुझा वाढदिवस सेलिब्रेट केला , तेव्हा का काहीच बोलला नाहीस ? ”
“काय बोललो नाही ? “
“हेच की तु रिया बरोबर गेलेलास “
“अगं नव्हतो गेलो ..”
“ खोटं बोलू नकोस sssss , तुला माहितीये , तिचं लग्न झालंय तरी ,तुझ्याशी flirt करत असते म्हणून डोक्यात जाते ती माझ्या , तरी तू मुद्दाम करतोस . हेच मला आवडत नाही तुझं “
“ हे बघ तू दिलेल जॅकेट घातलंय , कसा दिसतोय “
“ तू subejct change करू नकोस , मला माझ्या प्रश्नाच उत्तर दे “
“ कसला प्रश्न ? “
“ अरे मी इतका वेळ काय विचारतेय तुला ? “तो दाद द्यायला तयार नाही म्हटल्यावर , टप टप टप ,हिच्या डोळ्यातून अश्रूचा पूर . हीला खात्री होती तो गेला होता ,कारण हीच्या एका मैत्रिणीने ऑफिस ला आल्या आल्या हिला सांगितलेल की काल रिया आणि सन्मित दोघे लन्च मध्ये बाहेर गेले प्रॉन्झ खायला सन्मितच्या वाढदिवसाची ट्रीट म्हणून . एवढी पक्की बातमी मिळाल्यावर हिचा संताप , आता हे त्याच्याकडून वदवून घ्यायचं होतं , तो जाम बधला नाही , ते दोघे भांड भांड भांडले , त्याचा एकच हेका मी रिया बरोबर गेलो नव्हतो , शेवटी थकून तिने माघार घेतली ,कारण तिला रिलेशन टिकवायचं होतं , खूप जीव होता तिचा त्याच्यावर , आणि हे अधून मधून असले उद्योग सोडले तर त्याचाही हीच्यावर खूप जीव होता . हीला कळायचंच नाही त्याचे हे उद्योग कसे बंद करायचे , नात्यात प्रामाणिक पणा आणि transperancy हवी हे हीचं ठाम मत , आणि नेमकं तिथेच तो चुकत असे , त्याला वाटायचं हिला प्रत्येक गोष्ट कशाला सांगायला हवी ,
“तुला माहितीये आपली सारखी भांडणं का होतात ? या तुझ्या flirt स्वभावामुळे , हिच्या मागे लाग तिच्या मागे लाग , आणि मुली तर काय वाटच बघत असतात तुझी , तरी बरं अख्य्ख्या ऑफिसला माहितीये we are enaged . “
“ आता आहे मी असा ,त्याला काय करू ? पण तू म्हणते त्याक्षणी मी सोडून देतो की नाही ? “
“अरे पण मुळात सुरूच कशाला करतोस तू , मी कमी पडते का कुठे ? का गरज वाटते तुला हे असलं करायची ? “
“ ईट ईज जस्ट अ टाइमपास bebs ,! आपलं लग्न झालं ना कि मी हे सगळं सोडून देईन , प्रॉमिस !.. “ तो तिचा गालगुच्चा घेऊन म्हणे .
प्रॉन्झ वरून त्यांचं भांडण तात्पुरतं थांबलं असलं तरी तिच्या मनात ते कुठेतरी खदखदत राहिलं , प्रतारणे पेक्षा तो आपल्याशी खोटं बोलला याचं दु:ख जास्त बोचत होतं , ती त्याच्याशी तुटक वागत राहिली ,त्याला मुलींवरून , प्रॉन्झ वरून टोमणे मारत राहिली आणि तो नेहेमीसारखाच दिलखुलास हसत राहिला , काही दिवस गेले आणि कंपनीने एका प्रोजेक्टवर सहा महिन्यांसाठी त्याला त्रिनिदाद ला पाठवायचं ठरवलं .केवढा आनंद झाला त्याला ,त्याच दरम्यान त्याच्या आईचा वाढदिवस आला , मग हिने तो लक्षात ठेऊन त्याच्या आईसाठी तिच्या आवडीच्या रंगाचा पंजाबी ड्रेस आणला , त्या दोघाना ही बाहेर घेऊन गेली जेवायला , तिथे हॉटेल मध्ये हिने आधीच प्लॅन करून ठेवल्याप्रमाणे , केक कापून त्याच्या आईचा वाढदिवस साजरा केला , तो खूष , आई म्हणजे त्याचं दैवत , असेच दिवस गेले आणि बघता बघता जायचा दिवस उजाडला ,हिला सोडून जाणं त्याच्या जिवावर आलेलं , हीच्या कुशीत शिरून लहान मुलासारखा रडला जाताना , पण हिच्या डोक्यात ‘प्रॉन्झ !, ‘ त्यामुळे जेवढ्यास तेवढं असं तिचं धोरण अजून continue .
असेच काही दिवस गेले आणि हळूहळू हिला त्यांची दंगामस्ती, त्याच्या सहवासात घालवलेले , धमाल केलेले क्षण , आठवायला लागले आणि ही अगदी सैरभैर झाली, बालपणी आपला सगळ्यात जास्त आवडता सवंगडी ज्याच्याबरोबर आपलं सर्वात जास्त पटतं आणि जो खेळात आपल्याबरोबर असेल तर आपण कायम जिंकतो , तो एकदम नाहीसा झाल्यावर जसा खेळण्याचा मूड आणि आनंद दोन्ही जातो , तसं हिला झालेलं ,रोजचा दिवस जड वाटायला लागला , माणसाचं मन तरी किती विचित्र असतं , प्रत्येक वेळी भूतकाळात नाहीतर भविष्यकाळात आंदोळत असतं , एखाद्या लोलकासारखं , कधी तरी जर ते स्थिर राहिलं आणि आहे त्या क्षणांची मजा घायला शिकलं तर काही बिघडेल का त्याचं ? पण नाही आता उसासे सोडत बसा , त्यावेळेला वाटलेलं कि ह्याला असं सैल सोडता कामा नये , पण आता मात्र हिला वाटायला लागलं कि का अशी बंधनं घालायचो आपण त्याच्यावर ? का हक्क दाखवायचो ? प्रेम करतो म्हणजे आपण विकत घेतलंय का त्याला ? का आपण इतकं tres passing करायचो ? त्याची personal space हि गिळंकृत करायचा आपल्याला अधिकार कोणी दिला ?
“तो म्हणायचा मी मजा म्हणून करतो सगळं आणि डोक्यातून करतो म्हणूनच दिवसाच्या end ला मला एकही मुलगी लक्षात राहत नाही , तू कशी माझ्या हृदयात ठाण मांडून बसली आहेस ,तुला काही शेअर केल्याशिवाय , तुझ्याकडून लाड करून घेतल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही , आई , ताई आणि तु ह्या माझ्या आयुष्यातल्या खऱ्या स्त्रीया बाकी सगळ्या टाईमपास गं ! “ पण त्याची हि philosophy तिला पटायची नाही , लहान वयात अनेक देश फिरून आल्यामुळे त्याच्या विचारांचा परीघ खूप मोठा होता , हीचा मर्यादीत , तिला वाटायचं understanding लेव्हल highest असली आणि भरपूर प्रेम असेल एकमेकांत तर दुसरीकडे गंमत म्हणून सुद्धा बघायची ईच्छा होत नाही . मुळात जोडीदार दुसरीकडे जातो हा त्याचा नसून आपला probem आहे , आपण कुठेतरी कमी पडतो असं तिला वाटायचं .
त्याला जाऊन आता महिना होत आलेला , जाताना त्याने हीला सांगून ठेवलेलं आईकडे जात जा चौकशीला , त्याप्रमाणे एकदा अशीच ऑफीस सुटल्यावर हि चौकशीला गेलेली , त्याच्या आईशी गप्पा मारता मारता त्याच्या लॅपटॉप मधले फोटो बघत होती आणि अचानक एका फोटोपाशी थांबली , मागच्या महिन्यातला त्याचा फोटो होता तो , त्याच्या दोन भाच्यांबरोबर काढलेला ,अंगावर ऑफिसचा युनिफॉर्म आणि कपाळावर औक्षण करताना ताई !.. OMG तो खरंच ताईकडे गेला होता … तरी ही दुसऱ्या दिवशी लगबगीने ऑफिसला गेली , ज्या मैत्रिणीने सांगितलं होतं तिला परत स्टोरी रिपीट करायला लावली , त्यातून हीला कळलं कि रियाही  प्रॉन्झ खायला गेली होती पण स्वतःच्या नवऱ्याबरोबर ,ह्याच्या बरोबर नव्हे , तिचा नवरा आलेला त्यादिवशी लंच टाईममध्ये ऑफिसपाशी , प्रॉन्झ खायला चल असा तिने सन्मित ला आग्रह केलेला पण तो नाही म्हटला . मैत्रीणीने आधीची कहाणी तातडीने अगदी जीवन मरणाचा प्रश्न असल्यासारखी हीला सांगितलेली ,पण पूर्ण माहिती समजल्यावर ते मात्र हिच्या पर्यत convey करायला मैत्रीण विसरून गेली .
आणि ही ? ...... इतक्या दिवसांनी ह्या प्रसंगाची उकल झाल्यानंतर हीने सावित्रीची लहान बहीण असल्यासारखं स्वतः:लाच खूप दूषणं देऊन घेतली , आपण असे कसे त्याच्याशी वागलो , किती मानसिक छळ केला त्याचा , बिचारा गं माझा चिमणा ,शोना गं माझी ती , कित्ती गोड आहे गं ती , ईत्यादी ईत्यादी , पुन:श्च एकदा टप , टप टप आणि यावेळेस अति जोमाने कारण त्यात पश्चातापाची पण भर . !...

त्या रात्री व्हिडिओ कॉल वर बोलताना अचानक हिला एवढा उमाळा येऊन हिने आपल्यावर प्रेमाचा वर्षाव का सुरू केला हे मात्र न कळल्यामुळे तिचा तो भाबडा शोना खूपच बावरून गेला !!...

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इनु ऐसेइच मरेंगे. +२

> तिला वाटायचं understanding लेव्हल highest असली आणि भरपूर प्रेम असेल एकमेकांत तर दुसरीकडे गंमत म्हणून सुद्धा बघायची ईच्छा होत नाही . मुळात जोडीदार दुसरीकडे जातो हा त्याचा नसून आपला probem आहे , आपण कुठेतरी कमी पडतो असं तिला वाटायचं . > चूक!