पेमा शॉदरॉन यांच्या "Start where you are" पुस्तकातील एक उत्तम प्रकरण "Be grateful to everyone" वाचनात आले. अतिशय आवडले कारण त्याच्याशी रिलेट होऊ शकले.
"Be grateful to everyone" या स्लोगनचा अर्थ असा नाही की गुंडांनी मारहाण केली तरी तुम्ही त्यांच्याशी कृतज्ञ रहा. तर या स्लोगनचा अर्थ आहे की कटु अथवा गोड, प्रत्येक प्रसंगातून काही शिकण्यासारखे मिळतेच. आपल्याला आवडणार्या व्यक्तींबद्दल आपली काहीच तक्रार नसते पण न आवडणार्या व्यक्ती देखील कदाचित आपल्या आयुष्यात काही एक मूल्य शिकवण्यासाठी, धडा शिकवण्यासाठी आलेल्या असतात. बरेचदा या व्यक्ती जवळच्या नात्यात असतात अन त्यांच्यापासून सुटका अशी नसते, Almost every day, all the time they push our buttons. मग तो कधी नवरा असेल, कधी बायको-बहीण-वडील-मुलगी-बॉस. बरं आपण काय भोगतो अन आपली कशी चिडचिड होते ते कोणाला सांगता येत नाहीच पण सांगीतलं तर कळतही नाही.
पेमाच्या मते जेव्हा अशी चिडचिड होते, तेव्हा तुम्हाला आरशात बघण्याची गरज असते. तुम्हाला, अंतर्मनात डोकावून हे जाणण्याची गरज असते की जो गुण-विशेष तुम्हाला इतका त्रास देतो आहे, तो तुम्ही स्वतःला नाकारत आला आहात. उदा- जेव्हा मला माझा नवरा अति गंभीर, उदास किंवा नेहमी मयत झाल्यासारखा चेहरा करुन वाटतो तेव्हा मला हे जाणून घेतले पाहीजे की मी स्वतः पुरेशी गंभीरतेने गोष्टी बघत नाही कारण मी तो एक दोष मानून त्या गुणविशेषाला नाकारते.
जेव्हा मला माझी बहीण अति भावनाप्रधान अन cry-baby वाटते तेव्हा माझ्या लक्षात हे येत नाही की मी स्वतः नीरस अन शुष्क आहे, रुक्ष आहे, मी भावनेला कःपदार्थ मानते अगदी हवे असते त्या ठीकाणीही भावनेचे योग्यसुद्धा प्रदर्शन टाळते. मी काहीतरी नाकारते अन तोच गुण इतर लोक माझ्यावर "कर्म" म्हणून प्रक्षेपित करतात.
आशिता नावाच्या एक बुद्धीस्ट टीचर सांगतात, की जर सगळच आलबेल असेल तर मनुष्याला खाचाखळगे दिसत नाहीत अन मग मनुष्य पडण्याचा अधिक धोका असतो तेव्हा हे उअबग आणणारे, चिडायला लावणरे लोक ही आयुष्यातील एक गरज आहे. आशिता या तिबेटला जाणार होत्या अन त्यांनी ऐकले की तिबेटीयन लोक हे अतिशय आतिथ्यशील, मनमिळाऊ व प्रेमळ आहेत अन त्यांना अज्जिबात कसलीही तोषिस पडणार नाही. त्यावर त्यांना वाटाले की हे काही बरोबर नाही कोणीतरी buttons push करणारं हवच म्हणून मग त्यांनी एका बंगाली, चहाच्या टपरीवरील कीरकीर्या, चिरचिर्या मुलास बरोबर घेतले. पण तिबेटला गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की अरे हे लोक तर सर्वसामान्यच आहेत अन इतकेही मनमिळाऊ वगैरे नाहीत तेव्हा त्या मुलाची काही गरज नव्हती .... पण असो, तो झाला वेगळा भाग.
तर हा जो बंगाली चहाविक्रेता असतो तो मनुष्य कसा असतो तर आपण मारे त्याला, घराचं पुढचं दार सताड उघडून आत घ्यावं, स्वागत करावं अन तो जातो थेट तळघरात किंवा माळ्यावर अन अडगळीच्या आपण दृष्टीआड केलेलली प्रत्येक वस्तू घेऊन येतो अन आपल्याला दाखवतो, विचारतो - ही वस्तू तुमचीच आहे ना? तर असे हे चिडीस आणणारे आपले नातेवाईक-बॉस-मित्र. जेव्हा सगळे तुमचं कौतुक करतायत, तुमच्याशी सहमत होतायत, सगळं कसं दृष्ट लागावी असं चाललं आहे तेव्हा हे लोक खुसपट काढतात, निंदा करतात, अडथळे आणतात.
२० व्या शतकात गुर्जिएफ नावाचे एक टीचर होऊन गेले. एक वेगळच अवलिया व्यक्तीमत्व होतं ते म्हणजे. He liked to tighten the screws of his students. म्हणजे जर शिष्य म्हणाला की त्याला महाविद्यालयातील प्राचार्य व्हायला आवडेल्/आवडले असते तर मुद्दाम त्या शिष्याला जुन्या कार विकायच्या कामावर ठेवणार असे होते गुर्जिएफ. तर पॅरिसला एका मॅनोर मध्ये ते शिकवत. त्या समाजात एकदम विचीत्र अन चिरचिरा एक माणूस होता. प्रत्येक लहान गोष्टीचा बाऊ करायची त्याला सवय होती. Throwing tantrums तर त्याच्या हाडामासी मुरलेले होते. तक्रारखोर अन एकदम कटकट्या स्वभाव असलेल्या त्याच्याशी सगळेजण जपूनच असत. कोणी फारसं त्याच्या नादी लागत नसे.
एकदा हिरवळीवर काही कागद म्हणा काहीतरी कापून दुसरीकडे ठेवायचे काम त्याला व काही लोकांना दिलेले होते. त्याच्याने ते होईना अन तो इतका वैतागला की last straw on camel's back न्यायाने तो, तो समाजच सोडून तिरमिरीत निघून गेला. हे ऐकून लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या, लोकांनी पार्टीच करायची बाकी ठेवली.पण जेव्हा गुर्जिएफ ना कळले की तो निघून गेला आहे तेव्हा ते इतकेच म्हणाले की "ओह नो!" अन ते स्वतः त्याला शोधायला बाहेर पडले.
३ दिवसांनंतर दोघे परतले.त्या रात्री गुर्जिएफ एकटे असताना, त्यांच्या वाढप्याने जेवण वाढत त्यांना विचारले, "गुर्जिएफ, तुम्ही त्या क्रॅक माणसाला परत का बोलावले?" यावर गुर्जिएफ एकदम हळू आवाजात म्हणाले, "हे बघ तू कोणाला सांगणार नसशील तर सांगतो, मी त्याला इथे रहाण्याचे पैसे देतो ;)"
सांगायचा मुद्दा हा की हे शत्रू नाही म्हणता येणार पण minor annoyance ने जीवन कठीण करणारे लोक, जीवनात आवश्यक असतात.
आवडला लेख.. पटला सुद्धा.
आवडला लेख.. पटला सुद्धा.
तुमचे लेख छान असतात. मला तुमची लेखनशैली आवडली.
लिहीत राहा..
श्रद्धा धन्यवाद.
श्रद्धा धन्यवाद.
लेख आहे कि आरसा??
लेख आहे कि आरसा??
स्वतः कसे वागतो याचा विचार करायला भाग पाडणारा लेख..
आवडला..
खरे आहे. पेमा शॉदरॉन माझ्या
खरे आहे. पेमा शॉदरॉन माझ्या आवडत्या बुद्धीस्ट लेखिका आहेत.
निंदकाचे घर असावे शेजारी का?
निंदकाचे घर असावे शेजारी का?
पण ते शेजारीच असावे ना, घरात नको. minor annoyance असेल तोपर्यंत एकवेळ ठिकंय, पण रोजच सतत त्यांच्यासोबत रहावं लागलं तर अवघड होईल.
(No subject)