Submitted by पद्म on 11 September, 2019 - 07:56
उशिर झाला होता. जेवणंसुद्धा उरकत आली होती. आता आलोच होतो; म्हणून जेवायला बसलो!
वाढणार्याने सगळं वाढलं, पण बाजुच्या ताटात दिसणारी खीर मला वाढली नव्हती. बाजुच्याने मात्र चाटुन पुसून खीर संपवली होती.
तेवढ्यात त्याने आवाज दिला, "भाऊ, खीर!" ईथे मला एक वाटी मिळाली नव्हती, याला दुसरी वाटी पाहिजे होती.
"खीर संपलीये!"
तो थोडा नाराज झाला. त्याने दुसर्या कुणालातरी आवाज दिला, "दादा, खीर मिळेल का?" कित्ती हावरटपणा!
त्याने अजून तीन चार जणांना कामाला लावलं... शेवटी थोडीशी खीर सापडली. मला तर राग आला त्या हावरटपणाचा...
भाऊ खीर वाढणारच, तेवढ्यात तो म्हणाला, "मला नकोय! सरांना दे."
आणि माझ्याकडे वळून म्हणाला, "खाऊन बघा, मस्त झालीये!"
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अज्ञानी, आणि पद्म सोडून अजून
अज्ञानी, आणि पद्म सोडून अजून कोणी प्रतिसाद दिला सोळण्या वर. हा अजून एक बाई होती पण तिला हाकलले असे दिसतंय
मस्त आहे शशक..
मस्त आहे शशक..
धन्यवाद, स्वप्ना_राज, अक्कु,
धन्यवाद, स्वप्ना_राज, अक्कु, सिद्धी, अनघा!
छान आहे.
छान आहे.
कथा वाचताना तोंडाला पाणी
कथा वाचताना तोंडाला पाणी सुटलं
मला वाटलं आप्ल्यावाल्या हिरा
मला वाटलं आप्ल्यावाल्या हिरा ठाकुर ची खीर तर नव्हे हि
छान, सुटसुटित कथा
छान प्रसंग
छान प्रसंग
Pages