रात्र.... पाऊस...... कशाची तमा न बाळगता ती चालत सुटली. गणपत चौकात येईपर्यंत तिचे कपडे भिजून अंगाला घट्ट चिकटले होते. तिच्या नकळत २ जणांची वखवखलेली नजर.... तिच्या कपड्यांच्या आरपार पाहण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या खांद्याला कसलासा स्पर्श झाला तसे दचकून तिने मागे पाहिले.
"कहॉ चली मोहतरमा?" तिच्या खांद्यावर हात घासत पहिला म्हणाला. तिला त्या स्पर्शाची जबरदस्त किळस वाटली. तिने हात झटकत घाबरून त्याच्याकडे पाहिलं. तितक्यात दुसऱ्याने तिला मागून पकडलं.
"वाचवा.... वाचवा..... हेल्प!" जीवाच्या आकांताने ती ओरडू लागली. प्रतिकार कमी झाल्याची संधी घेत पहिल्याने पुढून पकडलं.
"वाचवा...."
"का वाचवू?" थंड आवाज.
कोणती तरी आकृती अंधुक प्रकाशात तिला दिसली.
"हे.... हे.... मला...."
"अबे चूप कर छोकरी!" दुसरा ओरडला.
"वाचव मला plz.... वाचव...." तिने त्या आकृती कडे बघत याचना करणे सुरु ठेवले.
"आधी उत्तर दे. मी का वाचवू?"
"अरे हा काय प्रश्न आहे..... वाचव, कारण हे मला......" ती जवळ जवळ किंचाळत होती.
"ये फिर चिल्ला रही है." पहिला.
"मुह बंद कर इसका पेहेले." दुसरा.
"रेहेने दे.... कोई आने वाला नही यहाँ पर."
"वाचवा....." आकृतीकडे बघत तिने पुन्हा आर्त हाक मारली.
"नाही."
"अरे पण का?" ती काकुळतीला आली होती.
रस्त्यावरून एक कार येत होती. आशेचा किरण! तिने हाका मारायला सुरवात केली. पण कार जवळ आली तसा चालकाने वेग वाढवला. शेजारून कार भरधाव वेगाने गेली तसे तिचे डोळे पाण्याने भरले. डोळ्यांसमोर अंधार दाटू लागला. ते दोघे तिला खेचत रस्त्याच्या कडेला नेऊ लागले.
आकृती तशीच उभी.
"वाचव! plz help...."
"बरं.......तू केसांना काय बांधले आहेस?"
"काय?" ती गोंधळली.
"उत्तर दे."
"क्लिप."
"एकदम घट्ट असलेली कणिक मळू शकतेस?"
"अरे हे काय प्रश्न आहेत?"
"उत्तर दे..."
"हो."
"तुला माहिती आहे, शरीरावर मान, डोळे आणि काही नाजूक जागा असतात?"
"हो. हो. हो."
"मग काय तर.... निघतो मी." आकृती छोटी होऊ लागली.
"ए... थांब.... मदत कर मला." जागच्या जागी उड्या मारत तिने सुटण्याचा प्रयत्न केला.
"मी का करू?" प्रश्न विचारत आकृती निघून गेली.
आता ती एकटी होती. दोघे तिच्याकडे मादक नजरेने बघत तिच्या अंगाला स्पर्श करणार तितक्यात तिच्या काही लक्षात आलं.
सुटण्याचे प्रयत्न थांबवून तिने क्लिप काढली. पहिला क्षणभर नुसताच बघत उभा राहिला. वाऱ्याच्या वेगाने तिने पहिल्याच्या मानेवर टोकदार क्लिप आतपर्यंत खुपसली. विव्हळत त्याने तिच्या ओढणीवरची पकड सोडली.
दुसऱ्याला काही कळण्याच्या आत तिने हात डोक्यामागे नेऊन अंदाजे त्याच्या डोळ्यांत बोटे खुपसली. सगळं बळ एकटवून. नखेही रुतावीत याची खबरदारी घेत. शेजारी तिला भलामोठ्ठा दगड पडलेला दिसला. दुसऱ्याला धक्का देत तिने जमिनीवर पाडले आणि हातात दगड घेतला. दोघांनी तिच्या या आक्रमक उत्तराची अपेक्षाही केली नव्हती.
"निघून जा इकडून..... निघून जा."
दोघातल्या एकाने एक पाऊल तिच्याकडे टाकलं आणि तिने हातातला दगड जोरात त्याच्या पोटाच्या दिशेने भिरकावला. पहिला आघाताने बेशुद्ध होऊन जमिनीवर निपचित पडला. ते पाहून दुसरा घाबरला आणि आडमार्गाने पळून गेला..... ती अजूनही थरथरत होती.
बेशुद्ध पडलेल्याकडे पाहत तिने खाली पडलेली बॅग उचलली. आणि घराकडे जवळ जवळ धावत निघाली.
_______________
"तू मदत का नाही केलीस रे तिला?"
"मी का करू?" त्याने हसून विचारले.
"अरे? हे बघ, मी तुला परत सांगतो आहे.... निदान मला तरी सरळ सरळ उत्तर देत जा."
"बर. मग नेमकं मदत म्हणजे अजून काय करायला हवे होते मी दाऊ?"
"त्या दोघांवर विजेचा मारा करायला हवा होतास."
"ते माझ्या हातात आहे?"
"मग सरळ चक्र फिरवायचेस मानेवरून... नाहीतर कोणाला मदतीला तरी पाठवायचेस."
"आणि हे किती वेळा करणार मी, दाऊ?"
"म्हणजे?"
"म्हणजे, सगळं मीच करू लागलो तर ज्यांना सबल शरीर दिलं, शक्ती दिली, हात-पाय दिले ते काय करणार?"
"पण आज ही मुलगी वाचली म्हणून प्रश्न संपतो का?"
"प्रत्येक वेळी मी मध्ये पडलो तर नारीला तिची ताकद कशी कळणार दाऊ?"
"नारीची ताकद? पुरुषांपुढे निभाव लागेल तिच्या शक्तीचा?"
"का नाही? तिच्यातही माझीच शक्ती आहे, दाऊ!"
"मग द्रौपदीला का नाही म्हणलास 'तूच चालव बाण' म्हणून? सीतेला अंगठी पाठवण्याऐवजी तलवार का नाही पाठवलीस?"
"वृत्ती, दाऊ. नारीची वृत्ती सृजनशील आहे. विनाश करणे त्यांच्याकरता क्रूरकर्म! पण म्हणून त्यांना ते जमतच नाही असे नाही ना?"
"मग हिला आज करायला लावलेस ते?"
"गरज! वेळेनुसार सर्व बदलते. बदलावे लागते."
"म्हणजे?"
"रामाची जागा कृष्ण आणि कृष्णाची जागा राम नाही घेऊ शकत, दाऊ. जर वैचारिक सारथ्य करून विजय मिळणार असेल तर बाण चालवायची काय गरज?"
"पण अनुज....."
"काळ बदललाय, दाऊ. पण आजही अर्जुनाला त्याची लढाई स्वतःच लढावी लागते!"
©मधुरा
आवडली.
आवडली.
पटली..
पटली..
खूप छान..
खूप छान..
आजही अर्जुनाला त्याची लढाई
आजही अर्जुनाला त्याची लढाई स्वतःच लढावी लागते>> भारी
छान
इथे सगळेच अर्जुन आहेत.
इथे सगळेच अर्जुन आहेत. स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागनार.
भारीये. मस्त.
भारीये. मस्त.
एस, मधुरा d, @Shraddha,
एस, मधुरा d, @Shraddha, किल्ली, अक्कु, मामी
सर्वांचे धन्यवाद!
__________
हो, अक्कु.
खरे आहे. कोणी वेळेला मदतीला
खरे आहे. कोणी वेळेला मदतीला येईलच असे नाही. स्वतःची ताकद स्वतःच ओळखावी लागते. छोटीशी मुंगी नाही का कडाडुन चावते जेव्हा तिच्या जीवावर बेतते.
फार छान
फार छान
खूपच मस्त
खूपच मस्त
ऊर्मिलास, आदू, रश्मी
ऊर्मिलास, आदू, रश्मी
धन्यवाद.
____________
खरं आहे रश्मी.
छान लिहिलीय, आवडली.
छान लिहिलीय, आवडली.
पटली आणी आवडली.
पटली आणी आवडली.
साधना, पलक धन्यवाद
साधना, पलक
धन्यवाद
मस्त! मधुरा
मस्त! मधुरा
कसल लिहलय.... एकदम पटली...
कसल लिहलय.... एकदम पटली... मस्त
पद्म, शिल्पा धन्यवाद
पद्म, धन्यवाद

धन्यवाद शिल्पा
छान कथा आवडली !
छान कथा
आवडली !
धन्यवाद अशोक
धन्यवाद अशोक
कथेतला आशय पटला आणि आवडला
कथेतला आशय पटला आणि आवडला.शेवटच्या पॅरा मध्ये खूप काही आहे.साधारण प्रिंट करून भिंतीवर चिकटवून रोज वाचावा असा आहे.
मस्त आहे! आवडली.
मस्त आहे! आवडली.
ते तेवढं 'माझी मदत' चं 'मला मदत' कराल का?
धन्यवाद mi_anu.
मनापासून धन्यवाद mi_anu.
धन्यवाद वावे, बदल करते.
Aavadli, patali..
Aavadli, patali..
"वाचव मला plz.... वाचव...."
"वाचव मला plz.... वाचव...." तिने त्या आकृती कडे बघत वल्गना करणे सुरु ठेवले. >>> इथे "वल्गना" हा शब्द चुकून वापरला गेला आहे असे वाटते?? गयावया किंवा तत्सम शब्द बसावा तिथे.
धन्यवाद Kally
धन्यवाद Kally
__________
maitreyee, बदल केला आहे.
छान. आवडली.
छान. आवडली.
मस्तच. आवडली.
मस्तच.
आवडली.
धन्यवाद भाग्यश्री , धन्यवाद
धन्यवाद भाग्यश्री , धन्यवाद सिद्धी
आवडली.
आवडली.
धन्यवाद नौटंकी.
धन्यवाद नौटंकी.
Pages