२०१६ सालच्या सरकारी अध्यादेशात महाराष्ट्रातील किल्ले भाडेतत्त्वावर देणे, तिथे लग्न समारंभास परवानगी देणे याबद्दल उल्लेख आहे. आज तीन वर्षांनी भाजप सरकारने २५ किल्ल्यांवर सदर योजना राबविण्यासाठी निवड केली आहे अशी बातमी indian express आणि इतर वृत्तपत्रात आलेली आहे.
भारतीय जनता पक्षाने संपूर्ण तिजोरी जाहिरातबाजीवर रिकामी केली असल्याने असले निरनिराळे लज्जास्पद उपक्रम आता हाती घेत आहे. ज्या किल्ल्यांबद्दल मराठी जनतेच्या भावना नाजूक आहेत त्या किल्ल्यांचे व्यावसायिकरण करून, हॉटेलं उभारून, तिथे लग्नसमारंभ वगैरे करण्यास परवानगी देणे म्हणजे आमचं कुणी काहीच वाकडं करू शकत नाही या माजाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
टीप: आंधळ्या भक्तांना सूचना: जाधवगड हा किल्ला किंवा गड नसून एक जुना वाडा किंवा गढी आहे, आणि त्याची संपूर्ण मालकी जाधव घराण्याकडे आहे. त्या वाड्याचा, पवारांचा आणि या पोस्टचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
गडकिल्ल्यांचा व्यावसायिक वापर
Submitted by अजिंक्यराव पाटील on 7 September, 2019 - 13:56
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
होना. मायावती ने जिकडे तिकडे
होना. मायावती ने जिकडे तिकडे हत्तींचे पुतळे उभे केले.
बरे धरून चालू, गड किल्ले
बरे धरून चालू, गड किल्ले भाड्याने देणे हा चांगला निर्णय आहे,
पण मग ते गडावर मद्यपान, मांसाहार, प्रेमाचे चाळे केले म्हणून फटके घालणारे लोक इकडे पण येणार का?
की इकडे पैसे मोजून आलेल्या लोकांनी गडाचे पावित्र्य वगैरे भंग केले तर चालते आणि फुकट पिकनिक करायला आलेल्या लोकांनी मात्र ते संभाळलच पाहिजे अशी अपेक्षा आहे?
सिम्बा, इथेले फडण्२०/मोदी
सिम्बा, इथेले फडण्२०/मोदी भक्त सग्गळं सांभाळणारा आहेत..
दगडधोंडे पडलेत सगळे त्या
दगडधोंडे पडलेत सगळे त्या किंल्यांवर. ते साफ करुन रिसॉर्ट बांधायचा आतब्ट्याचा व्यवहार हय. ७ ८ किल्ले सोडले तर वरपर्यंत गाड्यापण जात नाय.
कसलं कपाळ रिसोर्ट बांधणारेत देव जाणे.
(अवांतर, अस्मीतांवर पोट भरलं असत तर म्हराटी पोरं गलेल्ट्ट असती असलं आम्च आजं म्हणाय्च.)
पण मग ते गडावर मद्यपान,
पण मग ते गडावर मद्यपान, मांसाहार, प्रेमाचे चाळे केले म्हणून फटके घालणारे लोक इकडे पण येणार का?
>>
हा एक कैच्या कै प्रकार आपलया पब्लिकण लावून ठेवलाय. फटके काय घालायचे, सार्वजनिक ठिकाणी हे प्रकार केलेतर सरळ गुन्हे नोंदवावेत, अन बाजूला व्हावं.
झुंडशाही सगळीकडेच आहे आपल्यात.
>>>>>>>पण मग ते गडावर मद्यपान
>>>>>>>पण मग ते गडावर मद्यपान, मांसाहार, प्रेमाचे चाळे केले म्हणून फटके घालणारे लोक इकडे पण येणार का?
की इकडे पैसे मोजून आलेल्या लोकांनी गडाचे पावित्र्य वगैरे भंग केले तर चालते आणि फुकट पिकनिक करायला आलेल्या लोकांनी मात्र ते संभाळलच पाहिजे अशी अपेक्षा आहे?<<<<<
हे बरे आहे दोन्ही बाजुने बोलणे !! गेली ६५ वर्षे तुमचेच लाडके सरकार होते ना ? काय दिवे लावलेत ? गेल्या ६५ वर्षे कित्येक बुरुज ढासळेले किल्ल्याच्या भिंती पडल्या !!
मुरुड जंजिरा सारख्या जल दुर्गाच्या चिरांमधला सांधा शिश्याने जोडलेला आहे. त्यातल शिश सुद्धा चोरुन नेल !!
कोकणातुन जाणारा साधा बाॅंबे गोवा हायवे तुमच्याने चौपदरी करता आला नाही , नाही तुम्ही कोंकण रेल्वे आणु शकला !!
ह्याच महाराष्ट्राने काॅंग्रेसला जेष्ठ नेते दिले ज्यांनी देशाच भल केल पण त्या नकाश्यात महाराष्ट्र नव्हता ना मुंबई होती !! जे होते ते फक्त ओरबाडायला ! विकासाच्या नावाने तोंडाला पाने पुसायला !!
युनिसबाबा,
युनिसबाबा,
तुम्ही कुठली बाजू घेताय ते सांगा पाहू?
काही दिवसांपूर्वी ते आंग्रे आणि कम्पनी गडावर नॉनव्हेज खाणे कसे चूक वगैरे सांगत बसले होते.
कुठली तरी एक बाजू पकडून बोला बाबा, दुर्गसंवर्धन वाल्यांची राडा केला की गडाचे पावित्र्य, आणि फडन20 नि राडा केला की "गडावर आहे काय? दगड नि धोंडे" हा अप्रोच नको
गड किल्ले च भाड्याने कशासाठी
गड किल्ले च भाड्याने कशासाठी द्यायचे? हजारो टेकड्या, डोंगर, माळरानं ओसाड पडली आहेत. तिकडे जंगल, तलाव निर्माण करा. खाजगी प्राणीसंग्रहालय तयार करा. तिकडेच हॉटेल टाका, लॉज चालवा. अजून अनेक गोष्टी भांडवलदार तिकडे उभारू शकतात. तिकडे बंदिस्त वातावरणात काय नैतिक, अनैतिक करायचे ते करा म्हणावं.
अमर ,
अमर ,
आपण कितीही पर्याय सुचवले तरीही जे
पर्याय निवेश करणार्या उद्योजकांना बिझनेसच्या दृृृृृृष्टीने फायद्याचे ठरु शकतील, पर्यटकांना, ग्राहकांना आकर्षित करु शकतील तसेच पर्याय स्विकारले जातील !! अन्यथा तो आतबट्याचा व्यवहार ठरेल. उद्या समजा गडचीरोली जवळचा एखादा किल्ला शासनाने भाडे तत्वाने द्यायचा ठरवला तरी तो भाड्यावर घ्यायला पुढे कोण येणार ?
साल २००० च्या दरम्यान मुंबई ते गोव्या साठी कॅटामरान जलद बोटीची सेवा सुरु झाली होती. त्यावेळेला कोकण रेल्वे नव्हती. पण काही वर्षांत ही जलद बोटीची सेवा बंद झाली.
भारत, जगातील सर्वात मोठी आंतर देशीय विमान वहातुक बाजार पेठ आहे पण ह्याच बाजारात गेल्या २० वर्षांत ७-८ विमान कंपन्या बुडीत गेल्या. जेट एअरलाईनच काय झाल हे सर्वांच्या समोर आहे.
शासनाने फक्त मुलभुत पायाभुत सेवा निर्माण कराव्यात !! किल्ला भाड्याने घेण्यापेक्षा नव्याने तयार होणार्या महामार्गावर हाॅटेल टाकणे जास्त व्यवहार्य आहे.
आता सुद्धा गड किल्ल्यांची
आता सुद्धा गड किल्ल्यांची अवस्था चांगली आहे असे नाही .
खूप दुर्दशा झाली आहे .
ज्या अद्वितीय राजाचे नाव घेवून महाराष्ट्राचा राज्यकारभार चालतो त्यांचे किल्ले वाईट परिस्थिती मध्ये आहेत .
सरकारनी त्याचे संगोपन मंडळ स्थापून केले गेले पाहिजेत .
पर्यटन वाढण्यासाठी त्यांचा वापर केला तर वाईट काहीच नाही .
सुविधा असल्या शिवाय लोक तिथे भेट देणार नाहीत हे सुध्दा सत्य आहे जगाला छत्रपतींचा इतिहास माहीत करून देणे सुद्धा गरजेचं आहे .
त्या मुळे उत्तम रस्ते किल्ल्यावर जाण्यासाठी असलेच पाहिजे .
आता चढण चढून जाणे सर्वांना जमत नाही .
स्वच्छता राखली पाहिजे .
लोकांना बसायला गार्डन असावी आणि राहण्याची सोय सुद्धा हवी तर पर्यटन वाढेल आणि किल्ले सुधा सुस्थित राहतील .
जी पडछड झाली आहे त्याची दुरुस्ती करायला हवी आणि ह्यात सरकार बरोबर लोकसहभाग सुद्धा हवा .
लोक नक्की सहभागी होतील .
पण हे सरकारनी स्वतःच करावे .
मुंबई मध्ये फूट पथ सुशोभीकरण करण्याचे नावा वर सोसायटी ना दिले आणि ते त्यांचा मालकीचे झाले .
गार्डन लोकांच्या संघटनेनं दिले आणि त्यांनी त्या जागेवर हक्क गाजवायला survat केली लोकांना त्याचा उपभोग घेण्यापासून रोखण्यात आले ही जिवंत उदाहरण आहेत .
तसेच गड किल्ले pvt कंपन्यांना दिले तर उद्या त्या जागेवर त्या कंपन्या हक्क सांगतील आणि लोकांच्या येण्यावर नियंत्रण thevtil.
किंवा सरकार आतून त्या जागा विकून टाकेल हे नाकारता येत नाही .
कारण अशी उदाहरण आहेत .
Ambi vally आणि लवासा ही ठळक उदाहरण आहेत .
म्हणून जे काही करायचे आहे ते सरकारनी च करावे
किल्ले गावात , रस्त्याकडेला
किल्ले गावात , रस्त्याकडेला असते तर त्याच्या वारसांनी ते त्यांनाच ठेवले असते , आपल्याला दिलेच नसते , ते जिथे आहेत , तिथे त्यांचा काहीही वापर नाही, हे त्यांनाही ठाऊक आहे. त्यामुळे उगाच इतिहास वगैरे गळे काढून जनतेने आपले नुकसान करून घेऊ नये.
आमचे मुसलमान शहाणे होते , उगाच डोंगरावर बांधण्यापेक्षा गावात वास्तू बांधल्या , त्याचा उपभोगही घेतला अन आता ते लोकशाहीच्या मालकीचे आहेत.
Black cat तू कधीच सुधरणार
Black cat तू कधीच सुधरणार नाही का? तूला क्षत्रिय इतके का टोचतात?
>>>>>>आमचे मुसलमान शहाणे होते
>>>>>>आमचे मुसलमान शहाणे होते , उगाच डोंगरावर बांधण्यापेक्षा गावात वास्तू बांधल्या , त्याचा उपभोगही घेतला अन आता ते लोकशाहीच्या मालकीचे आहेत.<<<<<<<
आमचे मुसलमान शहाणे होते , उगाच डोंगरावर बांधण्यापेक्षा गावात असलेल्या हिंदु वास्तू पाडुन त्याच मटेरीयने स्वःताच्या ईस्लामी ईमारती मस्जिदी बांधल्या, पुढे रोमिला थापर सारखे अति शहाणे प्रोफेसर आले, ज्यांनी शपथेवर सांगितल की बाबरी मस्जिदीच्या खाली राम मंदिर कधी नव्हतच ! केके महम्मद नावाच्या आर्कियोलाॅजिकल सर्वे अधिकार्यांल्याच मस्जिदीखाली राम मंदिराचे अवशेष सापडले जे कोर्टाला सादर केलेल आहे !!
ब्लॅक कॅट
ब्लॅक कॅट
किल्ले हे ऐश आराम करण्यासाठी बांधले नव्हते .
हे साधी गोष्ट तुला माहित नसेल तर कशाला इथे फालतू पोस्ट टाकत आहेस .
आमचे मुसलमान म्हणजे कोण ? तुम्ही अजुन सुधा स्वतः ल ह्या देशाचे नागरिक समजत नाही का? किंवा हा देश तुमचा सुद्धा आहे असे समजत नाही का ?
इथल्या माती वर प्रेम करायला शिका जी तुमचा देह पोसत आहे
क्षत्रिय काय अन मुसलमान काय ,
क्षत्रिय काय अन मुसलमान काय , सगळे भारतीयच होते
तूम वर्णव्यवस्थामे अटके पडे
तूम वर्णव्यवस्थामे अटके पडे हो. तुम्हारी सोच अच्छी तरह जानता हूं.
किंवा सरकार आतून त्या जागा
किंवा सरकार आतून त्या जागा विकून टाकेल हे नाकारता येत नाही .
कारण अशी उदाहरण आहेत .
Ambi vally आणि लवासा ही ठळक उदाहरण आहेत .
म्हणून जे काही करायचे आहे ते सरकारनी च करावे >>> हे भाऊ काय बोलतात ते त्यांना तरी कळंतय??
इथली माती म्हणजे ? लाल
इथली माती म्हणजे ? लाल किल्ल्याला रशियातून माती आणली होती का ?
इथल्या माती शी म्हणजे ह्या
इथल्या माती शी म्हणजे ह्या देशाची भूमी ह्या राज्याची भूमी आणि येथील संस्कृती ह्यांच्या शी प्रामाणिक रहा .
ह्या देशाची भूमी ह्या
ह्या देशाची भूमी ह्या राज्याची भूमी आणि येथील संस्कृती ह्यांच्या शी प्रामाणिक रहा . >> म्हण्जी काय वं?? इस्कटुन सांगा की
या चर्चेच्या अनुषंगाने
या चर्चेच्या अनुषंगाने सर्वांना एक विनंती याच विषयावर मी मायबोलीवर धागा लिहीला आहे. कृपया तो सर्वांनी एकदा वाचून घ्यावा. हि जाहिरात समजू नये हि विनंती. उद्देश फक्त इतकाच आहे कि त्यात दोन्ही बाजू मांडल्या आहेत.
मिपावर म्हणायचं आहे का?
मिपावर म्हणायचं आहे का?
मायबोलीवरच्या धाग्याची लिंकगड
मायबोलीवरच्या धाग्याची लिंक
गड, किल्ले विकणे आहे ?
मि.पा.वरच्या धाग्याची लिंक
गड, किल्ले विकणे आहे ?
आमचे मुसलमान शहाणे होते ,
आमचे मुसलमान शहाणे होते , उगाच डोंगरावर बांधण्यापेक्षा गावात वास्तू बांधल्या , त्याचा उपभोगही घेतला अन आता ते लोकशाहीच्या मालकीचे आहेत.
Submitted by BLACKCAT on 9 September, 2019 - 22:05. >>>
मुसलमानांची देवळे पाडून मशीद बांधणे, मुर्त्यांचे नुकसान करणे ही कामे शहाणपणा चीच होती. जिझिया कर लादून हिंदूंकडून पैसे उकळणे व ताजमहाल बांधणे, काशी विश्वेश्वर मंदिर पाडून तिथे ग्यांव्यापी मशीद उभारणे, अयोध्या, मथुरेच्या मंदिराची तीच अवस्था ! अशी कामे शहाणपणाची नाहीतर काय? बरं इतकी वर्षे सत्तेत असणार्या काँगिनी हिंदू अस्मितेची प्रतीके जपण्यासाठी नक्की काय केलं ते कुणी सांगू शकेल काय? कारण काळया मांजरीच्या मते ते खंडहर आहेत.
Pages