सोळा आण्याच्या गोष्टी- "दाह" - निरु

Submitted by अ'निरु'द्ध on 5 September, 2019 - 05:22

काय सुखाने रहात होतो आम्ही.
उबदार वातावरण, अन्नाचा सुकाळ, अवतीभवती छान ओलावा, कायम सुखकारक संवेदना.
आणि छान छान जोडीदारिणी.
बागडणारी आमची बाळंही.

पण अचानक हे काय झालंय काहीच कळत नाही.
अंगाचा नुसता दाह होतोय.
होरपळून जातोय नुसता.
गुदमरायलाही होतंय.
अंगावरच्या रोमारोमात वेदना जाणवतेय, मरणप्राय.

खेचतंय कोणीतरी खाली खाली.
अजून खाली.

आता पडतोय कुठल्यातरी चकचकीत पांढर्या गुळगुळीत पृष्ठभागावर.
एकामागोमाग एक.
वेगळ्याच गलिच्छ घाणी बरोबर.
आणि त्यात आता हा भोवंड आणणारा पाण्याचा भोवरा.
कुठे घेऊन चाललाय कळतंच नाहीये.

संपलं आता सगळं.
हाच आपला सर्वांचा शेवट
----------------------------------------------------------
डाॅक्टर, चुकलंच आमचं.
तुमचं आधीच ऐकायला हवं होतं.
तुमचं जंताचं औषध घेतल्यावर रेणु आता एकदमच बरी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages