Submitted by अज्ञातवासी on 4 September, 2019 - 01:38
हिम्मतराव तसा रंगेल माणूस, पण आता वयोमानाने शरीर साथ देत नव्हतं...
"मला मुलगी पसंत आहे."
मुलीची पसंती झाली.
त्याच्या नातवासाठी... संग्रामसाठी...
हिम्मतरावाच्या तोंडून मुलीचंच कौतुक...
...आणि रात्री हिम्मतराव गेला...
सगळ्यांना दुःख झालं.
संग्राम तर गप्प गप्पच राहायला लागला. कुणाशीही जास्त बोलत नव्हता...
मात्र घरच्यांनी काळजावर दगड ठेवून, संग्रामचा विवाहसोहळा पार पडला.
विवाहाच्या पहिल्या रात्री...
"अशीच पोरगी पाहिजे होती...
पण तिच्याबरोबर रहायला जुनं खोड काय कामाच? म्हणून लगेच वठलेलं खोड सोडलं, आणि हिरवंगार झाड धरलं. आता आवाज लवकर बदलला पाहिजे, जमल तेही हळूहळू... आता शांत...
येईलच ती इतक्यात, सगळी तहान मिटेल..."
...संग्राम हिम्मतरावाच्या आवाजात पुटपुटत होता...
"शेवटी मलाच मुलगी पसंत आहे..."
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेहमीच अयशस्वी तमासगीर इथेही
नेहमीच अयशस्वी तमासगीर इथेही उलथला
नर्तकी जिथे तमासगीर तिथं. चल
नर्तकी जिथे तमासगीर तिथं. चल होऊन जाऊदे ढिन्च्याक ढिन्च्याक!!
खुप भयंकर
खुप भयंकर
किती लागलं ना काही लोकांना.
किती लागलं ना काही लोकांना. नाही आवडली तर नाही आवडली. एवढं काय त्यात.
Submitted by अमर ९९ on 10 September, 2019 - 03:48
माणसाने रोज काही ना काही लिहावे पण ते आपल्या स्वानंदा साठी. सोशल मिडियावरच्या ‘लाईक्स आणि ’कॉमेंट्स’ साठी नाही. काय म्हणता?
Submitted by अमर ९९ on 10 September, 2019 - 03:52
पुन्हा फालतुपणा सुरू झाला का ह्याचा?
यात काय फालतूपणा आहे शिवली?
यात काय फालतूपणा आहे शिवली?
Pages