सोळा आण्याच्या गोष्टी - मुलगी पसंत आहे! - अज्ञातवासी

Submitted by अज्ञातवासी on 4 September, 2019 - 01:38

हिम्मतराव तसा रंगेल माणूस, पण आता वयोमानाने शरीर साथ देत नव्हतं...
"मला मुलगी पसंत आहे."
मुलीची पसंती झाली.
त्याच्या नातवासाठी... संग्रामसाठी...
हिम्मतरावाच्या तोंडून मुलीचंच कौतुक...
...आणि रात्री हिम्मतराव गेला...
सगळ्यांना दुःख झालं.
संग्राम तर गप्प गप्पच राहायला लागला. कुणाशीही जास्त बोलत नव्हता...
मात्र घरच्यांनी काळजावर दगड ठेवून, संग्रामचा विवाहसोहळा पार पडला.
विवाहाच्या पहिल्या रात्री...
"अशीच पोरगी पाहिजे होती...
पण तिच्याबरोबर रहायला जुनं खोड काय कामाच? म्हणून लगेच वठलेलं खोड सोडलं, आणि हिरवंगार झाड धरलं. आता आवाज लवकर बदलला पाहिजे, जमल तेही हळूहळू... आता शांत...
येईलच ती इतक्यात, सगळी तहान मिटेल..."
...संग्राम हिम्मतरावाच्या आवाजात पुटपुटत होता...
"शेवटी मलाच मुलगी पसंत आहे..."

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Horrible

हिम्मतरावलासुद्धा रंगेल आत्म्याने झपाटले होते का ? नंतर त्या आत्म्याने संग्रामाला धरले.

हिंदी सिनेमासारखी वाटली. सुपरहीट कथानक. पण तर्कसंगती लावण्यात अर्थ नसतो. कारण शरीराची भूक शरीर सुटले कि संपली ना?

Chhan

छान

सॉरी! पण मला नाही आवडली..
कारण मलाही माहिती नाही...
Submitted by पद्म on 4 September, 2019 - 01:53
>>> संयोजकाना नाही आवडली ..अरेरे ..

कोणतं महाभारत लिहायचयं.. नाय आवडली सांगण्यात २ शब्द घालणार तर त्यात अजून ९८ घालून हवी तशी करून घ्यायची:

हिम्मतराव रंगेल माणूस, पण आता वयोमानाने शरीर साथ देत नव्हतं...
"मला मुलगी पसंत आहे."
मुलीची पसंती झाली.
त्याच्या नातवासाठी... संग्रामसाठी...
हिम्मतरावाच्या तोंडून मुलीचंच कौतुक...
... रात्री हिम्मतराव गेला...
संग्राम गप्प गप्पच राहायला लागला. जास्त बोलत नव्हता...
घरच्यांनी काळजावर दगड ठेवून, संग्रामचा विवाहसोहळा पार पडला.
विवाहाच्या पहिल्या रात्री...
"अशीच पोरगी पाहिजे होती...
म्हणून लगेच वठलेलं खोड सोडलं, आणि हिरवंगार झाड धरलं. आता आवाज लवकर बदलला पाहिजे,...
येईलच ती इतक्यात, सगळी तहान मिटेल..."
...संग्राम हिम्मतरावाच्या आवाजात पुटपुटत होता...
"शेवटी मलाच मुलगी पसंत आहे..."
पोरगी येऊन थरथरत्या आवाजात म्हणाली ..
"चावटपणा कराल माहिती व्हतं म्हणून म्या बी हे झाड धरलं"..
माजघरात आजीच्या फोटोचा हार ओघळला...

(ही पण नाय आवडली तर दुसरी हवी ती लिहा :). का नाही आवडली ते सांगणे लेखकांना पुढील लेखनास उपयुक्त ठरते. नुसतेच नाही आवडली ह्या इंफर्मेशनचं काय करायचं इतरांनी.
मूळ कथा एकदम भयाण आहे. हिंमतराव सारखे असले लोक मेल्यावर पण इतरांना शांतपणे जगू देणार नाही. मला आवडली.)

छान प्रतिसाद सीमंतिनी!
पण मुळात संयोजक मंडळातील सदस्याने असे धाग्यावर जाऊन नाही आवडली सांगणं कितपत योग्य आहे? किती ती घाई?
Show some sign of maturity, निदान दाखवण्यासाठी तरी स्पर्धा घ्या Wink
आणि हो, आवडली नाही पण याच कारण मलाही माहिती नाही असं सांगून जर परीक्षण करणार असतील तर God save the competition!!!!

सीमंतिनी>>आवडला प्रतिसाद. Biggrin

कुणाकुणाला नाही आवडत, चौकटीबाहेरच्या कथा! ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न. त्याला कोण काय करणार?

सीमंतिनी, मस्त ट्विस्ट!!!
खरंच संयोजक मंडळातील काही मंडळी जरा जास्तच उत्साही आहेत, दुजाभाव दाखवण्यासाठी. Happy

सी Lol

माणसाने रोज काही ना काही लिहावे पण ते आपल्या स्वानंदा साठी. सोशल मिडियावरच्या ‘लाईक्स आणि ’कॉमेंट्स’ साठी नाही. काय म्हणता?

Pages