बाल्कनीत पक्षी आणि फुलपाखरे येण्यासाठी तुम्ही काय करता?

Submitted by Srd on 30 August, 2019 - 06:31

बाल्कनीत पक्षी, फुलपाखरे येण्यासाठी काय करता?

बाल्कनीत किंवा कुंड्यांतल्या झाडांवर पक्षी यावे यासाठी -
१) गोकर्णीचा वेल - या वेलास वर्षभर निळी छान फुले येतात, हिरवा पडदा तयार होतो आणि सनबर्ड मध खायला येतात. मध्यंतरी माझ्याकडचा वेल वाळला म्हणून दुहेरी मोठ्या फुलांचा वाढवला तर सनबर्ड फुलांना चोच लावायचे आणि लगेच उडून जायचे. त्या हाईब्रिड फुलांत मध नसावा. मग परत छोट्या फुलांचा आणला. आता येतात.
फोटो १

२) एका टांगून ठेवलेल्या प्लास्टिक ताटलीत केळ्याचे तुकडे ठेवतो. ते खायला बुलबुल जोडी येते. दर अर्ध्या तासाने फेरी मारतात. त्यांना आणि बऱ्याच पक्षांना शेव आवडते. पण कावळे फार त्रास देतात म्हणून शेव बंद केली. शिवाय मुंग्याही. केळ्याचे उरलेल्या नासक्या भागावर फुलपाखरे येतात.
३) पक्षी आवडत असले तरी कबुतरे नको. ती आली की सारखं घुटरघु ,भांडणं. फिश ट्यान्कात बसून पंख भिजवून पाणी नेतात. कुंडीत चार काड्यांचे मिनिमलिस्टिक घरटे. त्यांचा त्रास वाचवण्यासाठी जाळी लावावी लावली. वेलांना लोखंडी जाळी तापल्याने चालत नाही, खराट्याच्या काड्यांची बनवली आहे. टिकली आहे दोन वर्षे.
४) एका टबात भात आहे. त्याच्या लोंब्या खाण्यासाठी मुनिया येतात. पक्ष्यांची जी वरी मिळते ती उगवून झाडे येतात दोनतीन फुटी. त्याच्या लोंब्या खातातच शिवाय पाने काढुन नेतात घर बांधायला. सध्या रानात गवत माजलय ते आणून लावलं. पण त्याची पाने मुनियांना काढता येत नाहीत. पानाची मधली शिर चोचीने चावून पाहतात. घट्ट चिवट असल्याने पान तुटत नाही. परंतू एक प्रकारचा नैसर्गिकपणा आला आहे.
५) लाल माठ लावला आहे. चारपाच झाडे तीन फुटी झाली आहेत. पानांच्या बेचक्यांत गुच्छात माठाचे काळे बी धरतेय ते चिमण्या खातात.
फोटो २

६) घाणेरीचं झाड आणि फूल आपल्या कामाचं नाही पण फुलपाखरे खुश असतात.
७) कृष्णकमळाच्या फुलांवर फुलपाखरं येतात.हा वेल दणकट असतो.रोगबिग पडत नाहीत.
फोटो ३

फोटो ४

८)पुर्वी एक शेवग्याचं झाड होतं त्याच्या फुलांवर सनबर्ड फार यायचे.
९) दयाळ आणि पोपट येण्यासाठी काय करावे?
फोटो ५

१०) चिमण्यांसाठी बुट-चपलांचे खोके लावले पण चिमण्यांनी घर बांधले नाही. मग ते खिडक्यांना बांधल्यावर लगेच आल्या. पाच होती पाच बाजूला. पण सकाळी नवीन जोड्या येऊन घरासाठी भांडायच्या. कलकलाट. काढावे लागले खोके.
११) खूप झाडं वेली झाल्या की शिंपी येतोच कोळी शोधायला. ओरडतो छान.
तुमच्याकडे येतात का पक्षी? कोणती झाडे उपयोगाची?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

srd , छान धागा
तुमची बाग छान आहे
पानफुटी लावावी Red Pierrot फुलपाखरू हमखास येतेच.
कडीपत्ता, लिंबू नाहीतर बेल लावा. Lime फुलपाखरं येतात.
जमाईकन स्पाईक लावा फुलपाखरं येतात.
firecracker Ruellia लावली तर सनबर्ड येतात नक्की.
पाणी ठेवाच , कबुतर येतील पण चिम्या बुलबुल, सूर्यपक्षी पण येतात.

तुमची बाग आवडली.
दुहेरी फुले विशेषत: त्यांचा मधला भाग ( योग्य शब्द आठवेना) गच्च असतो ते सनबर्डसारख्या पक्ष्यांना / कीटकांना मध खाण्यासाठी गैरसोयीचे होते. याच कारणामुळे गुलाबाची फुले अशा पाखरांना उपयुक्त ठरत नाहीत.

कडीपत्ता, लिंबू नाहीतर बेल लावा.
ही खाद्य झाडे नाहीत माझ्याकडे. बघतो.
जमाईकन स्पाईक हे फारच आवडते फुलझाड फुलपाखरांच्या फोटोत असतेच.
शेजारच्या इमारतीच्या आवारात अशोकाची झाडे आहेत. त्याच्या गर्द पानावळीत मुनियांचे घरटे होते. मागच्या आठवड्यात त्यांनी झाडांची छाटणी करून 'सुबक' केल्यावर ती मुनिया जोडी खिडकीत जागा शोधत होती.
पाण्याचा वाडगा कावळे उलटे करतात. आता ताटलीत पाणी ओतून त्यात केळी ठेवलेला आईस्क्रीम कप ठेवतो. मुंग्या येत नाहीत, बुलबुलला तेवढे पाणी पुरतेय. अजून पाऊस पूर्ण गेला नाही. तो गेला की पाणी लागेल.
अडुळसा लावलेला सनबर्डसाठी पण त्याला सतत फुले येत नाहीत.
धन्यवाद सर्वांना.

अरे वा गोकर्णीच्या फुलांवरही सनबर्ड येतात माहित नव्हते.
माझ्याकडे मी जमैकन ब्ल्यू स्पाइक लावली फुलपाखरांसाठी पण सनबर्डज जास्त प्रमाणात येऊ लागले फुलपाखरांपेक्षा.

घराच्या आजूबाजूला खूप पक्षी होते पण एवढं कधी बघितलं नव्हतं. या लॉकडाऊन मध्ये त्याचा आंनद घेतला. मग कठड्यावर खाऊ ठेवला. आता सकाळी पक्ष्यांची खाउगल्ली भरते . हे फोटो सुरवातीला उत्साहाने घेतले गेले. तीन महिने झाले आता साळुंख्या, भारद्वाज, मैना, टिटवी आणि 3 खारुताया , मोर, 6 ते 7 लांडोर आणि भरपूर कावळे कठड्यावर येऊन जातात. काल खाउगल्ली च्या धाग्यावर मी कडबू पोस्ट केले होते तेव्हा रुन्मेष ने गमतीत विचारलेले की कावळे उचलून नेत नाहीत का पटकन. तेव्हा म्हणलं आज इथे हे शेअर करूया. Happy :
20200726_115526.jpg20200726_115637.jpg

तांदूळ, भात टाकला की अशी सभा जमते. त्यांचं टाइमिंग पण ठरलेलं आहे. तेव्हा खायला काही टाकलं नसेल तर सरळ दाराच्या ऊंबरठ्यात येऊन ठाकतात.
IMG_20200709_082436-1606x1203.jpg

पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी एक पाण्याचं घमेलं भरून ठेवते.
सोबत बुलबुलची जोडी, ३ खारूताई पण असतात.

अरे वा! चिन्मयी, एकदम एवढे पक्षी कॅमेऱ्यात टिपता आले. मस्त. माझ्याकडे पण 3 खारूताया एकदम येतात, आणि मुंगूस पण 4 येतात. आईबाबा आणि 2 छोटी .बेरी खरवडून ठेवली की शांत वेळी येऊन सफाचट करतात.

कोणी पुण्या-मुंबईत रहात असेल तर चुकुनही बाल्कनीत काही खायला ठेऊ नये. कबुतर्ड्यांशिवाय इतर कोणीही ते खायला येणार नाही वर कबुतर्ड्यांची विष्ठा काढत बसण्याचे काम वाढते. हल्ली कोरोना सुरु असताना ह्या कबुतर्ड्यांना खायला घालुन आयते माजवुन ठेवले तर त्यांच्यामुळे दुप्पट वेगाने फुफुसाचे रोग पसरतील अशी बातमी कालच न्युज चॅनेल वर बघितली.

सांगली मध्ये.
वर्षा , नवीन रहायला आलो 10 वर्षांपुर्वी तेव्हा जरा लांब पडतंय असं वाटायचं पण मागे भरपूर पसरलेली शेती आणि मोकळे प्लॉटस यामुळे पक्षी ,प्राणी यांचा मुक्त वावर असतो. आणि वाहनांची वर्दळ नाही त्यामुळे प्रदुषण ही कमी. पावसाळ्यात, आणि उन्हाळ्यात जनावरे ही निघतात, म्हणून मुंगूसानी 4, 5 नर्सरीतून आणलेल्या झाडांची मुळे कुरतडून झाडे मेली तरी मुंगूसाना हाकलत नाही. एक फोटो काढलाय, पण भारी भित्री असतात मुंगूस.
खाऊ म्हणून काहीही ठेवते. पोळी, भात, उपिट, शिरा , सगळं खातात. पण एक बघितलंय यापेक्षा खरुताईला फरसाण, भाकरवडी, मक्याचा चिवडा फार आवडतं. पक्षी पण पोळी आणि फरसाण असेल तर चटकमटक च आधी संपवतात.
धान्य टाकलं की सहसा कोणी थांबत नाहीत.

वर्णिता, चिन्मयी कसले भन्नाट फोटो आहेत, फार गोड.

आमच्याकडे अनेक पक्षी आहेत वेगवेगळे पण कबुतरे अति प्रमाणात दिसत असल्याने, खायला ठेवलं की बाकी पक्षांना ते हुसकाऊन लावतात हे बघितलं आहे, वर DJ म्हणतात ते खरं आहे. तसं आमची टेरेस नाहीये, छोटी gallery आहे आणि ग्रील लावलंय, थोड्या कुंड्या आहेत. त्यामुळे मी नाही ठेवत काही.

धान्य टाकलं की सहसा कोणी थांबत नाहीत. >>> हे खरं आहे, मुलगा खातो ते वेफर्स, चकली खायला सगळे येतात, पण कबुतर दादागिरी करतात. पण असे तेलकट पदार्थ देऊ नयेत पक्षांना असं कुठेतरी वाचलं पण पक्षी हल्ली तेच खायला सोकावलेत.

वर्णिता, चिन्मयी कसले भन्नाट फोटो आहेत, फार गोड.>>>> =१.
केळी ठेवल्यास कबुतरं खात नाहीत.>>>>> हे आता केले पाहिजे.

माझ्या कडे ग्रीलमधेच कुंड्या आहेत.आता त्यांची संख्या रोडावली.पूर्वी फुलपाखरे असायची. एकदा तर जांभळा काळपट शिंजिर पाहिलाच्पूर्वीपासून पाणी फक्त ठेवायचे.मात्र कावळ्याने वात आणला पाणयात हाड किंवा गाठ्या आणून घालायचा.तरीही मी चालू ठेवले होते.चिमण्यांसाठी खास भाताच्या लोंब्या ग्रीलला टांगायची.चिमण्या ते खात अस्ताना पहाणे , माझ्यासाठी एक आनंदसोहळा होतास्लिंबाच्या झाडाची पाने साळुंक्या खायच्या की काय कळले नाही. पण नेहमी त्यांचा लिंबाच्या झाडाकडचा वावर आणि लिंबाची कातरलेली पाने दिसायची.नंतर एका उथळ वाटीत थोड्याशा तांदूळकण्या ठेवायला लागले तो काय! कावळा आपली चोच वाकडी करून कण्या खायचा.त्याच्यानंतर कबुतरे यायला लागली.तशी ती आधीपासून होतीच. पण आम्ही उडवायचो.नंतर मात्र नेट लावून घेतल्यामुळे पक्शी नाहीसे झाले.नंंतर ए.सीसाठी ग्रीलला थोडे एक्स्टेनशन केल्यामुळे त्याबाजूला वरतून नेट नाही.तिथून मुठीएवढी पाखरे एकदाच आली.या १०-१२ दिवसात साळुंक्यानी त्याबाजूने आत येऊन पहाणी केली.आमच्या ग्रीलमधे नाही, पण ग्रीलच्या जवळ घरटे बांधत आहेत.पक्षांसाठीच थोडे मूग पेरले होते.करटुलीच्या बिया केव्हा टाकल्या होत्या आठवत नाही.पण त्याचाही वेल पसरला आहे.

अरे खतरनाक धागा आहे
मस्त अनुभव आणि काय छान छान फोटो आहेत
प्रतिसादातही..
वर्णिता या तर पक्षी अभयारण्याच्या जवळ राहतात वाटते Happy

आमच्याकडे मुंबईला हे सुख नाही.
पण वाशीला मिनी सीशोअर जवळ राहत असल्याने बरेच पक्षी दिसतात ईथे. मला बघायला आवडतात पण मुद्दाम त्यांचे आवडीने फोटो फार टिपले नसतील.
शोधावे लागेल. धाग्यात माझ्यातर्फेही थोडा हातभार लावायला.

सध्या रोज टेरेसवर जातो तिथेही विविध पक्षी दिसतात. अगदी दिवस मावळला की वटवाघळंही छान डोक्यावरून उडतात.

असो,
हे आमच्या घरासमोरचे दोन पाहुणे Happy
खिडकीत बसून यांना बघत जेवणे आमचा टाईमपास