Submitted by Dr Raju Kasambe on 14 August, 2019 - 11:41
पाऊस असा पाऊस तसा
पाऊस कोसळधार
नुसताच धो धो कोसळणारा
चाकरमान्यांची तारांबळ उडवणारा !
पाऊस रिमझिम
ओलेचिंब भिजवणारा
सर्वांना रोमॅन्टिक बनवणारा !
पाऊस धमकावणारा
विजांच्या गडगडाटात
नुसतेच चार थेंब शिंपडणारा !
पाऊस रीप रीप
गरमागरम चहा भज्यांची
आठवण करून देणारा !
पाऊस ढगफुटीचा
नावानेच घाम फोडणारा
गावही गिळंकृत करणारा !
पाऊस मुसळधार
महापुराचे थैमान घालणारा
घर संसार उध्वस्त करणारा !
पाऊस न बरसणारा
दुष्काळ अवर्षण घडवणारा
अश्रूंच्या धारा बरसवणारा !
पाऊस सखा-सोयरा
अश्रूत मिसळून जाणारा
दुःखात सहभागी होणारा !!
पाऊस मृगसरींचा
मातीचा सुगंध दरवळवणारा
स्वप्नांचे अंकुर फुलविणारा !
पाऊस तहान भागवणारा
तृषार्त जमिनीला तृप्त करणारा
हिरवा शालू नेसवणारा !!
डॉ. राजू कसंबे
डोंबिवली (पूर्व)
जि. ठाणे
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाऊस आणि त्यांची वेगवेगळी रुप
पाऊस आणि त्यांची वेगवेगळी रुप.. आवडली!
आवडली
आवडली
आवडली
आवडली
सर्वांचे मन:पूर्वक आभार !!
सर्वांचे मन:पूर्वक आभार !!