स्कॉलरशिप-एक योगा-योग.

Submitted by 'सिद्धि' on 10 August, 2019 - 03:36

हदय-विकाराच्या झटक्याने मंत्री लोहिया यांचे रुग्णालयात निधन.
वृत्तपत्र खाली ठेवून मी चहाचा कप हातात घेतला. "माणूस आणि मंत्री म्हणून दोन्ही बाबतीत ते वाईटच होते. पण त्यांना माझ्या हाताने मरण आले नाही. हे माझ्यावर त्या परमेश्वरालचे फार उपकार आहेत. एखाद्याच्या मृत्यूस आपण जबाबदार असने हे फार वाईट. फार म्हणजे फारच वाईट. अपराधीपणाची भावना जगू देत नाही आणि पोलिस शोधात पकडले गेले तर जन्मठेपेची शिक्षा. यापासून कोणी ही वाचवू शकत नाही."
०००

४ मार्च २००० ची गोष्ट. मीसेस माने आणि त्यांची मुलगी रेवा केबिन मध्ये बसल्या होत्या. भल्या मोठ्या लाईन मध्ये ४ तास उभे.
गेले चार महिने रोज येऊन ही काही उपयोग झाला न्हवता, पण आज विशेष शिफारस मिळाली होती, म्हणून त्यांचा नंबर आज लवकर आला होता.
खुप महत्वाची गोष्ट . रेवा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार होती. शासनाची तशी स्कॉलरशिप मिळाली होती. मात्र शासनाने मंजूर केलेली आर्थिक मदत प्रत्यक्षात न मिळाल्याने घरचे सारे चिंताग्रस्त होते. सार्या ठिकाणी विचारपूस करून त्या इथवर पोहोचल्या होत्या.
०००

रेवा: आई काहीही झालं तरी तू त्या फॉर्म वरती सह्या करू नकोस. आपण काहीतरी दुसरा ऑप्शन पाहूया. मला परदेशी शिक्षणासाठी जायची संधी मिळणार नाही ना? हरकत नाही. पण तू माघार घेऊ नकोस.
मीसेस माने: रेवा मला कळत आहे गं सगळं. प्रत्येक्षात ६ लाखाची मदत आपल्यालाह मिळणार असली, तरीही ते आपल्यासाठी महत्वाचे आहे. कारण ही मदत १ महिन्याच्या आत मिळाली नाही तर तुझं जे नुकसान होईल, आणि ते मी पुढे कधीही भरून काढू शकणार नाही.
रेवा: अगं आई पण ६ लाख आपल्याला आणि ६ लाख तो मंत्री स्वतःच्या खिशात घालणार ना ! त्याला फुकटचे पैसे का द्यायचे?
मी.माने: हे बघ रेवा , आपल्या सारखे गरजू लोक खूप आहेत ग ! बहुतेकांच्या बाबतीत असंच होतं असतं. त्या मंत्राने सही नाही केली, तर मिळणारा निधी सुद्धा कॅन्सल होईल. आपल्याला मदत हवी आहे. आणि त्या बदल्यात त्याला मोबदला.
आता अजून प्रश्न विचारू नको. निघ झटपट. आजच सगळ्या फॉरम्यालीटीज पुर्ण करुन येऊया. मनाला पटत नसेल तरीही काही गोष्टी कराव्या लागतात.

शहरा पासून थोड दूर असणाऱ्या एका शासकीय कचेरीत मी.माने आणि रेवा बसल्या होत्या. तिथे तुरळकच लोक होते. कोणी आपले अडकलेले व्यवहार मार्गी लावण्यासाठी तर कोणी आपले खिसे भरण्यासाठी आले असावे, बाकी एवढ्या निर्जन ठिकाणी सहज कोण येणार. २-४ स्टाफ आणि २ शिपाई एवढाच काय तो लावाजमा.
सगळे कागदपत्रे रेडी होते, रेवा अन् माझ्या सह्या झाल्या होत्या. मंत्र्यांच्या सही साठी आम्ही वाट बघत होतो. आणि शिपायाने 'मी. माने' म्हणून आवाज दिला. एका वेळी फक्त एकाला केबीन मध्ये जाण्याची परवानगी होती. म्हणून मी आत गेले. माझी कागदपत्रे बघून लोहिया यांनी लगोलग सगळ्या सह्या केल्या. जणू काही माझ्यापेक्षा त्याला याची जास्त गरज असावी. मला तो एक नंबर हलकट माणूस वाटला. अगदी ऐकलेली किर्ती बरोबरच आहे अशी त्यांची मुर्ती होती.

"हा तुमचा फॉर्म घ्या. पैसे मंजूर झाले आहेत". एका छोटुने आणून दिलेला चहा संपवत त्यांनी माझ्यापुढे एक कागद सरकवला. कुण्या मीसेस कानेंचा कागद होता तो. तीच्या शासकीय सेवेतील निवृत्त आईच्या मोठ्या मेडिकल सर्जरी साठी निधी मंजूर झालेला होता. काहीतरी गफलत होते म्हणून मी फॉर्म परत केला. " सर हा माझा फॉर्म नाही. मी मिसेस माने. आणि हा फॉर्म कनेंचा आहे. नाव आहे मिसेस मेधा काने." हे वाक्य माझ्या तोंडून बाहेर पडत नाही पडत तोच एक झुपकेदार दाढीवाला, उंचपुरा इसम लगबगीने दार उघडून तडक आत आला होता. मी त्याच्याकडे पाहते न पाहते तोच मिस्टर लोहिया बसल्या जागी खुर्ची वर कलंडले, त्यांचे डोळे अर्धवट उघडे पण मान थोडी वाकडी झाली होती. मला काय करावे ते सुचेना. लोहियांच्या हाताला चेक करत असताना मी पाहिले, त्या इसमाने चहाचा कप उचलून आपल्या जवळच्या प्लास्टिक पिशवी मध्ये टाकला. " म्हणजे तो चहा पिऊन मंत्री डेड झाले की काय ?" माझ्या तोंडून शब्द निघाले. आणि त्या इसमाने लगोलग छोटी गण काढून माझ्या डोक्याला लावली.
छोटी गन प्रत्येक भाग सुटा होतो ती. सेप्रेट केले तर तीचे ७-८ भाग होतात आणि ते गन चे तुकडे आहेत हे देखील कोणालाही सहज लक्षात येत नाही. सहज कॅरी करता येण्यासारखी गन होती. सिआयडी मध्ये अशी गन पाहिल्याने मला हे माहीत होत. ती प्रत्यक्षात असते हे आज समजल.

मला आता घाम फुटला होता, तरीही "कोण तू ? का मारलं यांना? मी सगळ पोलीसांना सांगेन." म्हणत मी आरडा ओरडा चालू केला. त्यांने गण अजून जवळ आणत दरडावले, " मिसेस काने ! न बोलता गुमान बसून र्हा. हा मंत्री अजून जित्ता हाय, चहा मंदी गुंगी आणणार औषध टाकल व्हतं. पण जर म्या सांगतो तसं तुमी केले न्हाई ना, तर आमच्या ताब्यात असलेली तुमची माय जीत्ती र्हायची न्हाई.
"माझी आई तर केव्हाच देवा घरी गेली होती. हा काय बोलतो ते मला कळेना ". कानशिला जवळ लावलेल्या बंदूकी च्या भीतीने मी शांत बसले होते. त्याने त्याच्या मोबाईल मधून एक व्हिडिओ दाखवला ! 'खरंच कोणी म्हातारी लागले दोराने बांधून ठेवले होते. आईच्या वयाची. अगदी माझी आई आता हयात असती तर अशीच दिसली असती. मला फार वाईट वाटले '.

आता मला परिस्थितीचा अंदाज येऊ लागला. "माझ्या आईला काही करूं नका प्लीज. मी तुम्ही सांगाल ते करते" प्रसंगावधानाने मी सावरत म्हणाले. तर ऐका हा मंत्र बेसुद्ध हाये, पण भायर समदयांना सांगायचा की ह्याला ताबडतोब हास्पीटलात न्ह्यावा लागलं अन् ह्दयाच आप्रेशन करावं लागलं , अन् हो आपरेशना दरम्यान हा ढगात गेला पाहिजे. कस काय करायच ते तुमी बघून घेयाच. आलं का ध्यानात." तो दात विकत म्हणाला. "डायरेक्ट ढगात, पण मी असं नाही करु शकत. बाकी तुम्ही सांगाल ते करण्यासाठी मी तयार आहे " मी विनवणी केली. पण व्यर्थ त्यांने आधी पासून सगळं व्यवस्थित प्लानिंग केलं होतं. कोणी डॉक्टर काने बाई इथे मंत्र्यांच्या भेटीला येणार आहेत हे या लोकांना आधी पासून माहित होते. तिच्या आईला ओलीस ठेवुन सगळं काही मॅनेज केलं गेलं होत. मिस्टर लोहिया यांचा काटा काढण्यासाठी पद्धतशीर पणे रचलेला केलेला कट होता हा. 'मा' चा 'का' झाला होता. आणि मी यात डॉक्टर काने बाई म्हणुन नाहक अडकले होते. माझा मोबाईल वगैरे सर्व त्यांने काढून घेतले होते. तो इसम आधी पासुनच मिस्टर लोहियांच्या सिक्युरिटी मधे सामील असल्यानल, सर्व माहीती त्याने आधीच मिळवीली होती. मला दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही. काही सुतालाही खबर न लागता, 'हु' का 'चू' न करता माझ्या संकट मंत्रांची रवानगी दवाखान्या मध्ये झाली. कोणीही काही संशय देखील घेतला नाही आणि लोहियांचा एक फॅमिली डोक्टर, म्हणजे मी, ऑपरेशन थेटर मध्ये गेले. डॉक्टर काने म्हणून.

ऑपरेशन थेटर च्या बाहेर तो माणूस फोन वर बोलताना मी गुपचूप ऐकत होते. " आरररर गावली की लका ती काने बाई, सकाळ पासन लाईन मंदी लक्ष ठवून हूतो, पर कोण बी काने गावली न्हाई. मंग केबीन भाईर उभं र्हायलो, अन् आतन आवाज आला मिसेस मेधा काने. समद येळेवर झालं, च्या बी येळेवर आला आणि सायेब बी इतक्यात आडवा झालता. काय काळजी नगं . समद निटच व्हईल रं".

"म्हणजे काने बाई इथे आल्याचं न्हवत्या तर "..... माझा मलाच प्रश्न.
०००

लोहिया यांचे हितचिंतक आणि नातेवाईक हॉस्पिटल च्या बाहेर जमा व्हायला लागले होते. गर्दी वाढत होती. सगळी ओपचारीकता झाल्यावर, मी अर्ध्या एक तासाने बाहेर येऊन सगळ्यांना सांगितले की " मिस्टर लोहिया इज नो मोअर ".
०००

आज मी स्वस्थ बसले....अगदी निवांत. जवळपास महिना उलटला. या घटनेनंतर रोज मी ४ मार्च चा पेपर उघडुन बसते.... तीच ती पानं चाळत.....काही विशेष मिळत का ते शोधते.
काय योगा-योग असतो ना !
" त्या दिवशी नावात गडबड झाली.... 'का' चां 'मा' झाला आणि मी केबीन मध्ये गेले.... फॉर्म पाहिल्यावर, तो 'काने' चां आहे म्हणून परत केला. माझ्या तोंडून बाहेर पडलेले 'मिसेस मेधा काने' एवढेच शेवटचे शब्द ऐकून, मलाच काने समजून, तो इसम लगबगीने आत आला.... चहा पिऊन लोहिया बेशुद्ध झाले.... हे बघून पुढच्या घटना घडल्या. रेवा त्याच वेळेस फोन वर बोलत त्या सरकारी कचेरी पासुन थोड लांब बाहेर गेली होती, आणि मी लोहियांच्या सिक्युरिटी स्टाफ बरोबर दवाखान्यात रवाना झाले. तिने मला पाहिले असतें, तर कदाचित काही तरी वेगळाच प्रसंग उद्भवला असता. देव जाणे पण हा निव्वळ योगायोग जुळून आला.
त्यानंतर ४ दिवस मी कुठेही बाहेर पडले नाही, घडल्या प्रकाराचा मला जाम धक्का बसला होता. त्याच दरम्यान मला 'तुमच्या आईला सुखरुप घरी सोडले आहे' म्हणून एक निनावी फोन येऊन गेला.
मी रेवाला ही त्या दिवशी काय झालं? मी कुठे गायब झाले होते ? हे वरवर काहीतरी सांगून शांत केले.
मुख्य म्हणजे पाचव्याच दिवशी शासना कडून रेवासाठी पुर्ण रकमेच्या स्कॉलरशिप मंजुरी चा फोर्म आला होता. आणि सोबत पहिली चेक ही होता. उशीरा का होईना पण आम्हाला हवी असणारी गोष्ट घडली होती. म्हणजे स्कॉलरशिप ठरल्या प्रमाणे मिळणार होती पण थोडा उशीर झाला होता एवढंच. तो लोहिया आम्हाला विनाकारण फसवणार होता, हे आता उघड झाले होते.

या सगळ्या मध्ये एक गोष्ट महत्वाची की लोहियांच्या मृत्यू साठी मी अजीबात जबाबदार न्हवते. जबाबदार न्हवते ? अस मी म्हणते कारण 'लोहिया खुर्ची मध्ये कलंडले तेव्हाच डेड झाले होते'.
खरंच त्यांना ॲटाक आला होता. हि गोष्ट मला क्षणार्धात समजली कारण मी ही एक नर्स आहे. मी त्या इसमाला हि गोष्ट ओरडून ओरडून सांगितली पण त्यांने ऐकलं नाही. उलट मी खोटं बोलते असं समजून अजुन दरडवायला सुरूवात केली. यात काही अघटीत घडू नये म्हणून मी शांत बसले. दवाखान्यात ईतर डॉक्टर आणि नर्स सोबत अर्धा एक तास असाच वाया घालवून, मी जेव्हा पद्धतशीरपणे सगळ्यांच्या समोर येउन लोहिया गेल्याच जाहीर केल, तेव्हा तो इसम पसार झाला होता. पुढच काहीही त्याने ऐकुण घेतल नाही. लोहियाचा मृत्यु हार्ट अ‍ॅटॉकने आधीच झाला होता, ह्रदय शस्त्रक्रियेने नाही.
त्या कानें बाईंच्या आईला वाचवण्यासाठी मला हे नाटक करावे लागले. आणि त्याने माझं काहीच नुकसान न होता फायदाच झाला. माझ्या लेकिला तिच्या हक्काची स्कॉलरशिप मीळाली होती. आणि त्या लोहियाला त्यांच्या नशिबाची जागा.

( काही गोष्टी गृहीत धरून रचलेली आणि पुर्णपणे काल्पनिक अशी ही कथा आहे. कोणतीही व्यक्ती, ठिकाण, वस्तू यांच्याशी काहीही संबंध नाही. याची कृपया नोंद घ्यावी.)
-मा.बो. वरिल माझे कथा या विभागातील पहिले लेखन आहे. त्यामुळे अपेक्षित लेखन दुरुस्ती नक्की सुचवा.

(सिद्धि चव्हाण )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त कथा. शॉर्ट फिल्मसुद्धा होऊ शकते असं वेगवान कथानक.
फक्त ट्विस्ट आणि टर्न नीट टाकले असतेस तर अजून मजा आली असती.

महाश्वेता धन्यवाद.
पुढच्या वेळी अजून चांगला प्रयत्न करते. कथेची लांबी वाढते होती. शक्यतो दुसरा भाग टाळण्यासाठी थोडी कंजूसी झाली...;) Wink

छान!

अनघा,मधूरा, रश्मी tnx

अजय चव्हाण - tnx, सस्पेन्स च बघते पुढच्या कथेमध्ये.

चांगला प्रयत्न. लिहित रहा.
थोड्याफार शुद्धलेखनाच्या चूक आहेत. परत एकदा वाचून पाहिलंस तर तुझ्यादेखील लगेच लक्षात येतील अशा...

शाली, ननि, ॲमी धन्यवाद.

- सहज लक्षात आल्या काही अशा लेखन दुरुस्ती केल्या आहेत. अजुन कुणाच्या काही निदर्शनास आले तर सांगू शकता.