आंबा/फणस/केळं/तवसं/भोपळा पातोळी(हळदीच्याच पानावरच वाफवलेली). :)

Submitted by देवीका on 5 August, 2019 - 23:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खरे तर ह्याची कसली आलीय कृती. पण काल नागलंचमीला बर्‍याच वर्षांनी आंब्या आणि फणसाच्या केल्या म्हणून लिहितेय.

111627B8-2C60-4D66-AB48-E4A118BFA4FF.jpeg

१ वाटी घरगुती केलेल्या तांदूळाची पीठी,
३/४ वाटी पाणी,
मीठ
१/४ घरगुती आंब्याचा मावा( आटीव रसाचा गोळा), हा जर नसेल तर तयार आंब्याचा रस जरासा आटून घ्या.
फणसाच्या पातोळी करणार असेल तर फणसाचा ताजा गर.

हळदीची पाने( नाही मिळाली तर ह्याच्याशिवाय करुच नका),

चवः नेहमीसारखाच ताजं खोवलेले खोबरे, गुळ, भाजलेली खसखस १ चमचा, भिजवलेल्या अक्रोडची खडाबडीत पूड, वेलची, केसर आवडीप्रमाणं, चवीला मीठ

क्रमवार पाककृती: 

-नेहमीप्रमाणेच उकड करायची पण पाणी ३/४ घ्यायचे एका वाटीला. जर आंब्याच्या करायच्या असतील तर शेवटच्या स्टेप्सला गॅस बंद करून आंबा मावा घालून उकड मउसूत करून घ्या. लगेच झाकून ठेवा.
-फणसाच्या करणार असाल तर गॅस अगदी कमी करून, फणसाचा गर घालून घोटून घ्या. पाणी आळले की, मळून लगेच झाकून घ्या. मी पाव भाजीचा मॅशर घेते जरासे तेल लावून. उकड एकजीव होते.
- हळदीची पाने धूवून घ्यावी. आधी पाण्याचा हात लावून उकड पानाच्या लांबट मध्य शीरेच्या वर थापून कडेकडेने पातळ करत एकाच जाडीची थापावी, चव आडवा भरावा. पान आडवे बंद करावे.
- सर्व पाने भरून झाली की, मोदक उकडतो तसेच मोजून १२ मिनिटे वाफवावे वाफेच्या जाळीला जरासे तेल लावून. पान काळसर झाले की समजायचे पातोळी शिजली. थंड झाले की पान आपोआप सुटते. घरच्या लोणच्या बरोबर खावे.
नोटः आम्ही पान आडवे बंद करतो व हि आमच्या घरची पद्धत आहे.
अतिशय सुंदर लागते पातोळी. आंबा, हळदीचा सुवास आणि खोबर्‍याचा चव अप्रतिम लागते.

आता हि कृती कशी सुचली:

बर्‍याच जणांनी विचारलेय की मला कसे सुचले. पण खरे तर ह्याचे श्रेय माझी सुगरण आई आहे , तिची क्रीयेटीवीटी आणि पारंपरीक गोवन कोंकणी रेसीपीमध्ये केलेले बदल आहे. ती बरेच प्रयोग करे मुळच्या रेसीपीत आम्हा मुलांना खुष करायला. खाण्याच्या बाबतीत.,अतिशय कटकटी अशी मुलगी मी आहे/होती.

पारंपारीक कोंकणी(गोव्याच्या) रेसीपीमध्ये, तवसं पातोळी अगदी अशीच करतात. त्यात एक कारण असे असते की, मुलांची सांडलवंड होत नाही सर्व एकत्र कालवून वाफवल्याने.
त्याची पद्धत अशी आहे.
तवसं पातोळी: पावसाळ्यात येणारी मोठी काकडी(तवसं) कीसून त्याच पाण्यात ओले खोबरं, तांदूळ पीठी, गुळ घालून केनवायचं(एकत्र करायचं). मग हळदीच्या पानात वाफवायचं.

ह्यावरून आंबा /फणस पातोळी करायची आई लहानपणी. मला एकेकाळी फणस अजिबातच आवडत नसे. मग आई असा फणस खायला घालायची. . आई भोपळ्याची पातोळी अशीच करते. भोपळा असाच उकडून तांदूळाच्या उकडमध्ये एकत्र कालवून, मग मध्ये चव भरून हळदीच्या पानात वाफवणे. अतिशय अप्रतिम अशी भोपळ्याची पातोळी लागते.
गावठी राजेळी केळ्याची सुद्धा अशीच पण एकत्र कालवून करतात. हि पण अप्रतिम लागतात. रव्याची सुद्धा करते तांदूळ पीठी नसेल तर. पावसाळ्यात अश्या निरनिराळ्या पदार्थांची रेलचेल असते कोकणी घरात. कराल तितके प्रयोग कोकणी स्त्री/आई करते/आहेत.
पुर्ण श्रावण, वेवेगळ्या चवी मिळायच्या जरी वरून तोच पदार्थ दिसला तरी. ह्यात दुमत नाहीच.

अधिक टिपा: 

खास टिपः शिर्षक बदलले आहे त्यावरून कळेल की, हळदीचे पान हे नायिका आहे व त्याला पर्याय नाही. Happy त्यामुळे, कर्दळीची पानं, सोनटक्काची पानं, आले पानं, वगैरे पानं चालतील का विचारू नये. हि सर्व पानं एकाच जातकुळीतील आहे पण वेगवेगळी चव आणि उपयोग आहे.:). आपल्या जबाबदारीवर करून पहा. ( ह. घ्या.)

माहितीचा स्रोत: 
अम्मा/आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे! इतके प्रतिसाद. इथे यायला वेळ मिळाला नाही. एकेक उत्तर देते वाचून. मी घाईत रेसीपी लिहिल्याने, लक्षात आले अर्धवट लिहिलीय.

मी अपडेट करतेय शेवटची पायरी.

थँक यु ऑल.

आई भोपळ्याची पातोळी अशीच करते. भोपळा असाच उकडून तांदूळाच्या उकडमध्ये एकत्र कालवून,
>> भोपळा म्हणजे तांबडा भोपळा ना?
Black cat हो परत वाफवायचं असेल. हळदीच्या पानाचा अंश त्यात उतरला पाहिजे.

मला तर हा प्रयोग अळूच्या पानांबरोबर करायची सुरसुरी आली आहे. करून बघतो. जमली नाही तर खाऊन टाकतो.

वाह मस्त रेसिपी देवीका.
@ BLACKCAT
पान बंद करावे,

मग ते उकडून घ्यायचे का ? म्हणजे आधी उकड , मग पुन्हा सारण भरून पुन्हा पान उकडायचे का ?

>>> हो आधी उकड काढून ती पानावर थापून त्यात सारण भरून पान बंद करायचं आणि पुन्हा उकडायचं.
आणि आमच्यासारखे आळशी असाल तर उकड न् काढता पीठ गरम पाण्याने मळून पानावर थापायचे आणि पुढे सेम प्रोसेस करायची. चव थोडी वेगळी लागेल, पण आमच्या कडे याच पद्धतीने करतो आम्ही.

माफ करा देवीका , मी तुमच्या धाग्यावर परस्पर उत्तर देतेय.

Pages