असाच पाऊस झिम्माड …
असाच पाऊस झिम्माड
वाहते रस्ते गळकी झाडं
पक्षी घरट्यात
माणसं बिऱ्हाडात
सगळं शांत निवांत ...
अंतरात.. आसमंतात
तू म्हणालास...
एक आठवण जगावी कोसळणाऱ्या पावसाची
चिमटीत धरून सोडावी तशीच बोट कागदाची
हातावर थेंब झेलत गोल गोल राणी म्हणावं
तसंच लहान होऊन गोधडी गुरफटून झोपावं
पाऊस तुझ्या मनात
पाऊस माझ्या डोळ्यात
झरत होता झरझर
उलगडत अंतर
अचानक तू थांबलास
ओल्या पापण्यांनी हसलास
म्हणालास....
संपला इथला सहवास
पुढचा पाऊस नसेल खास
बदलली चौकट कि बदलेल सगळं
मनाच्या पाटीवर चित्र असेल वेगळं
फुटतील ढग कोसळतील सरी
सगळं असेल तसंच तरी
सूर होतील बेसूर गातील राग अनवट
पावसाच्या चित्रातले रंग दिसतील फिक्कट
उखडलेली घरटी उजाडलेली घरं
येईल नजरेत सगळं खरंखरं
तू म्हणालास…तसंच झालंय रे !
सुरु झालाय अनवट राग
घेतोय कसला कसला माग
मी अस्वस्थ त्रयस्थ वैराग
सजीव चित्रातला निर्जीव भाग
दिसतंय सगळं उदास भकास फिक्कट
कारण....
मोडून गेलास तू चित्राची चौकट...
मोडून गेलास तू चित्राची चौकट!!!
. ..... मी मानसी
सुंदर कविता. आवडली.
सुंदर कविता. आवडली.
कविता आवडली.
कविता आवडली.
Dr, Raju Kasambe , बिपीन
Dr, Raju Kasambe , बिपीन सांगळे ... धन्यवाद !
क्या बात है....
क्या बात है....
कविता आवडली.
कविता आवडली.
अगदी मनाला स्पर्शून जाणारे
अगदी मनाला स्पर्शून जाणारे शब्द..... सुंदर.
पुरंदरे शशांक
पुरंदरे शशांक
मन्या
सिद्धी
धन्यवाद !
सुंदर
सुंदर
नित्सुश ,,,धन्यवाद!
नित्सुश ....धन्यवाद!
छानच
छानच
आवडली!
आवडली!
छान
छान