Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 30 July, 2019 - 09:07
ॐ नमो ज्ञानेश्वराय ।
दिव्य स्वयंप्रकाशाय।
महानंदस्वरुपाय।
चिद्घनमुर्ते॥
मी बालक तुझा नेणता ।
ना कळे मार्ग चालता।
धरुनिया तू हाता ।
ने ई गे माय॥
घोर या संसार वनी ।
पडलो मी येऊनी ।
कडेवर घेऊनी ।
नेई गे माये ॥
कर्म काही कळेना ।
स्वधर्म हाती येईना ।
अंधकार मिटेना ।
सांभाळ गे माय ॥
भक्तीचीया वाटा।
नेई मज आता ।
पांगुळ मी पडता ।
चालवी गे माये ॥
विक्रांत हा भ्रमाला।
मायेत या अडकला ।
तव प्रेमा आसावला।
धाव गे माये ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आर्त प्रार्थना...
आर्त प्रार्थना...
छान आहे.
छान आहे.
पुरंदरे शशांक ,कोहंसोहं१०
पुरंदरे शशांक ,कोहंसोहं१० धन्यवाद
कोहंसोहं१० नाव आवडले