Submitted by Dr Raju Kasambe on 29 July, 2019 - 02:32
चिऊची वेदना (हायकू)
झाडं कापली
इमारतींची गर्दी
निवारा गेला !
धान्य बाजार
मॉल मध्ये गायब
दाणे मिळेना !
किडेही गेले
फवारले जहर
खाऊ विषाक्त
काँक्रीट वन
साधा कोनाडा नाही
घरट्यासाठी !
गेल्या चिमण्या
कावळ्या पारव्यांचा
झाला सुकाळ !
चिऊचा खाऊ
घर घरटे वास
नेले लुटून !
उरला आता
चिऊ-काऊचा घास
पुस्तकामध्ये !
जाग मानवा
थांबव आता तरी
सृष्टी विनाश !
डॉ. राजू कसंबे
(दि. २० मार्च २०१९, जागतिक चिमणी दिवस)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान!
छान!