टिटवीची ललकारी

Submitted by Dr Raju Kasambe on 29 July, 2019 - 02:23

Red-wattled Lapwing (Vanellus indicus)Bharatpur (180).jpg
(Image credit: Dr. Raju Kasambe)

टिटवीची ललकारी

माळरान शेत मैदान, इमारतीवर थाटे संसार
तुरुतुरु धावे, नाकात नथ घालून लाल सुंदर

घरटे अंडी पिल्लं, अवघा संसार उघड्यावरी
कुणास न लागे त्याचा थांगपत्ता जरी

जमिनीवरीचा संसार तिचा जसा गुप्त
हवाई हल्ल्याने देते शत्रूला शिकस्त

करी सळो कि पळो, कुत्री मांजर सापाला
अदृश्य अंडी पिल्लं, ना सापडे कुणाला

घालून घिरट्या, देऊन ललकारी
शिकाऱ्यांच्या आगमनाची उद्घोषणा करी

वन्यप्राणी होतात तिच्या इशाऱ्याने सावध
वाचत आले नेहेमीच होण्यापासून पारध

लाकूडचोर, शिकारी बद्नामी करीती
‘अपशकुनी’ म्हणून गोळ्याही घालती

टिटविच खरी जंगलाची पहारेकरी
असते दिवसरात्र खड्या पहाऱ्यावरी

माळरानांवर, जंगलावर झाले शेतीचे आक्रमण
शेते, मैदाने, इमारती स्वीकारले घर म्हणून

किडे किटूक खाऊन करीते उदरभरण
शेतातील उभ्या पिकांचे करीते रक्षण

डॉ. राजू कसंबे
(दि. ११ जानेवारी २०१९)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं.
टिटवीची ललकारी असते की गर्जना /डरकाळी ?

ढिगानं कविता व लेखांच्या जीलब्या पाडण्यापेक्षा मोजक्या विषयांवर मुद्देसूद चर्चा व्हावी.

मायबोली ही वेबसाईट साहित्यासाठी आहे. ज्यांना साहित्य नको आहे त्यांनी येथे उगाच भजी तळू नयेत !!

मस्त

कसांबे सर मस्तच लेखन आहे.
तुमच्या लिखाणात वेगवेगळ्या विषयांवर माहिती मिळाते. मग लेख असो अथवा कविता. बर वाटलं वाचून.