शेतातल्या पारावरुन विकांतघराच्या ओसरीतून.. (सुरुवात)
मुखपृष्ठ
मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांची शेतघरं (फार्म हाऊसेस)असतील आणि बर्याच जणांची विकांत घरं (विकेंड कॉटेजेस) पण असतील…
परंतु आपल्या ह्या मायबोलीवर अशासाठी एखादा कट्टा, ग्रुप, फोरम आधी कुणी काढलेला मला तरी अजून आढळलेला नाही..
म्हणूनच ह्या विषयावर सुसंवाद व्हावा, आपल्या काही गरजा असतील, अडचणी असतील, आनंद असेल, अगदी कटु आठवणीही असतील….
तर हे सगळं आपण इथे शेअर करावं, ते एकत्रित स्वरुपात एका ठिकाणी असावं यासाठी या ग्रूपचं,फोरमचं प्रयोजन…
आपण इकडे काय करू शकतो…..?
तर खरंतर बऱ्याच गोष्टी करू शकतो...
आपापल्या शेतघरात,विकांतघरात केलेली धमाल, मजा, मस्ती इथे देउ शकतो….
आपल्या शेतघराचे, शेताचे, विकांत घराचे, त्याच्या आजूबाजूच्या बागेचे फोटो शेअर करू शकतो…
आपण लावलेला भाजीपाला, आपण लावलेली झाडं, त्यांना आलेली फुलं फळं हे सगळं सगळं आपण इथे माहिती म्हणून किंवा फोटोतून देऊ शकतो…
आपल्या आवारात आलेले पक्षी, प्राणी, फुलपाखरं, किटक यांच इथे सगळ्यांना दर्शन घडवू शकतो..
जर कोणी सोलार हीटिंग, सोलार पॉवरचे, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे म्हणजेच पर्जन्य जलसंधारणाचे प्रयोग केले असतील, ते यशस्वी झाले असेल, कदाचित अयशस्वीही झाले असतील, हे सगळं सगळं इथे देऊ शकतो…
अयशस्वी गोष्टींवर उपाय मिळतीलच याची गॅरेंटी नाही पण कदाचित मिळूही शकतील, इतरांच्या अनुभवाचा फायदा होऊ शकेल, निदान जे कोणी नवीन प्रयोग करणार आहेत ते फसलेल्या प्रयोगातली तीच चूक पुन्हा करणार नाहीत तर त्या कृतीमध्ये सुरुवातीलाच सुधारणा करून एक नवीन सुधारित कृती आपापल्या शेतात, विकांत घराच्या आवारात राबवू शकतील.
आपले झाडांच्या लागवडीचे प्रयोग, भाजीपाला लागवडीचे प्रयोग, फळांबाबतचे, फुलांबाबतचे प्रयोग हेही आपण इकडे देऊ शकतो..
एखादा पध्दतशीर ऍप्रोच ठेवून एखादी विशिष्ट लागवड केलेली असेल तर त्याची माहिती देऊ शकतो..
कंपोस्टिंग असेल, गांडूळ खत असेल, शेततळे असेल, विहीर खणणे असेल, विहीर पुनर्भरण असेल, बोरवेल असेल, बोरवेल रिचार्ज असेल... अशा सगळ्या गोष्टी, यशस्वी, अयशस्वी अनुभव, त्यावर जाणकारांकडून कळलेले आणि त्यानुसार केलेले प्रयोग आणि त्यानंतर शेवटी मिळालेले यश किंवा पुन्हा आलेलं अपयश हे सगळ आपण येथे देऊ शकतो..
एखाद्या विशिष्ट परिसरात विशिष्ट झाडं, झुडपं, फळं, फुलं ही जर चांगल्या पद्धतीनी बहरली असतील आणि ते इथे सांगितलं तर त्याच्या आजूबाजूच्या परिसरातले या ग्रुपचे सभासद किंवा वाचक त्याप्रमाणे त्या हवामानात, त्या मातीमधे सहजपणे, स्वाभाविकपणे रुजणारी, बहरणारी योग्य ती लागवड करू शकतील..
त्या परिसरात न बहरणारी विसंगत झाडं लावा, त्यात अयशस्वी व्हा यामधे त्यांचा वेळ वाया जाणार नाही... पदरी निराशा पडणार नाही.
आपण एका विशिष्ट परिसरामध्ये विशिष्ट बाबतीत (उदाहरणार्थ विहिर खणणे, ठिबक सिंचन) मजुरांचे दर किंवा अशा बाबीही शेअर करू शकतो जेणेकरून जर कोणी आपल्याला जास्त दर सांगत असतील तर आपली फसगत होणार नाही आणि आपली अपेक्षा कमी दराची असेल आणि जर ती रास्त नसेल तर त्या अयोग्य अपेक्षेमुळे आपल्याला माणूस मिळत नाही, टिकत नाही असं होऊन आपण नसताना शेत घराचा, विकांत घराचा मेंटेनन्स दुर्लक्षित रहात असेल तर ते टाळलं जाईल…
हे करणारी माणसं, टीम हवी असेल आणि इतरांकडून ती इथे कळली तर अदरवाईज अशी माणसं, टीम न मिळाल्यामुळे आपलं अडलेलं, रखडलेलं एखादं कामही मार्गी लागू शकेल..
यात सगळ्यात मजेचा म्हणा, आनंदाचा म्हणा, सहयोगाचा म्हणा असा अजून एक भाग म्हणजे जर जवळपासच्या घरा-परिसरातील सभासद एखाद्या विशिष्ट वारी जाणारच असतील तर आधी ठरवून भेटले, एकत्रच गेले, एकमेकांकडे गेले तर त्याची मजा आगळीच…. (कार पुलिंगमुळे पर्यावरणाची बचत हा Added/Fringed Benefit)
एखाद्या वेळी आपल्या घरातील इतर सभासद एखाद्या दिवशी यायला मोकळे नसतील आणि म्हणून जायचा कंटाळा येणार असेल तर अन्य सभासदांबरोबर एकत्र जाऊन त्या कंटाळ्यावर मात तर होतेच पण एक वेगळा आनंद मिळतो आणि सोबत नसल्यामुळे आपलं जाणं जे टळणार असेल तर सोबत मिळाल्यामुळे ती फेरी होऊ शकते, तिथलं एखादं काम होऊ शकतं, खरंतर एकदम मजेदार, आनंददायक प्रवास होऊ शकतो....
एकमेकांच्या फार्मवरच्या वस्तूंच आदान प्रदान याच्यासारखी तर आनंददायी दुसरी गोष्ट नाही.
एखाद्या वेळी आपल्याकडे एखादं पीक, एखादं प्रोड्यूस हे जर क्वान्टिटी मधे कमी असेल आणि त्या कमीपणा मुळे त्याची विक्री वाहतूक हे जर फायदेशीर होत नसेल तर जवळपासच्या सभासदांच्या एकत्रित पिकामुळे प्रोड्युस मुळे हीच गोष्ट यशस्वी होऊ शकेल.
त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने निवृत्ती नंतर निसर्गात रमण्यासाठी म्हणजे वानप्रस्थासाठी घर बांधलं असेल किंवा बांधणार असेल किंवा एखाद्याला त्याची वाडी/फार्म "ब्रेड आणि ब्रेकफास्ट" साठी सुयोग्य बनवायची असेल तर इथल्या चर्चेचा कदाचित उपयोग होऊ शकेल...
किंवा हे ज्यांनी आधीच केलेलं आहे अशा व्यक्तीही इथे छान माहिती देऊ शकतील..
यातला बाकी सर्व भाग क्षणभर बाजूला ठेवला तरी तिथे घालवलेले मौजमजेचे क्षण इथे शेअर केले तर अन्य मायबोलीकरांनाही त्याचा आनंद घेता येईल..
तेव्हा मित्रांनो जे जे शेतघर मालक आहेत, विकांत घर मालक आहेत त्यांनी त्यांना हा फोरम आवडला तर इथे जरूर हजेरी लावा… लिहा.. व्यक्त व्हा… प्र.चि. द्या...
ज्या लोकांनी नुसताच प्लाॅट घेतलाय पण घर बांधलं नाहीये आणि ज्यांनी काहीच घेतलं नाहीये पण घेण्याचा विचार आहे ते ही अर्थातच इथे सहभागी होऊ शकतात..
आणि जे नुसते वाचक आहेत त्यांचही इथे स्वागतच…!!!
दत्त मंदिराचा फोटो छान आहे.
दत्त मंदिराचा फोटो छान आहे. मी गेली आहे इथे. वरून नजारा छान दिसतो. मुरुडचा समुद्री किल्ला पण जरा जास्त साफसूफ केला तर मस्त आहे.
माझ्याकडे पण दोन प्लॉट आहेत. एका ठिकाणी मला लॉरी बेअर स्टाइलचे शेत घर बांधून बाग करायची आहे पण तसे करणा रा आर्किटेक्टच भेटत नाही आहे. मुख्य म्हन जे दोन्ही खूप लांब आहेत शहरा पासून. कोणी आर्किटेक्ट सुचवा.
>>>माझ्याकडे पण दोन प्लॉट
>>>माझ्याकडे पण दोन प्लॉट आहेत. एका ठिकाणी मला लॉरी बेकर स्टाइलचे शेत घर बांधून बाग करायची आहे पण तसे करणारा आर्किटेक्टच भेटत नाही आहे. मुख्य म्हणजे दोन्ही खूप लांब आहेत शहरा पासून. कोणी आर्किटेक्ट सुचवा.<<<
@ अमा, तुमच्या दोन प्लाॅटची ठिकाणं जर कळवलीत तर त्याप्रमाणे कदाचित आर्किटेक्ट सुचवता येईल..
कारण लाॅरी बेकरच्या संकल्पनेप्रमाणे काम करणारे आर्किटेक्ट्स खूप कमी आहेत..
आणि मुख्य म्हणजे इथे फक्त आर्किटेक्ट मिळून चालत नाही तर लाॅरी बेकर पद्धतीने बांधकाम करणारे कुशल कारागीरही त्यासोबतच मिळणं आवश्यक आहे.. (तसे वरकरणी लाॅरी बेकर यांच्या कामाप्रमाणे फक्त दिसणारं काम करणारे बरेच लोकं आहेत. पण ते Superficial होतं.. आणि तो तुमचा उद्देश नसावा.. And it Defeats the Original Purpose..)
अश्विनी के : आपलेही आभार...
आजकाल मातीची शेतघरं
आजकाल मातीची शेतघरं बांधण्याची कल्पना बरीच वाढलेली दिसते. सौर ऊर्जेचा वापर, विषमुक्त भाजीपाला पिकवणे, झालंच तर दुधासाठी देशी गाय पाळणे हे दिसत आहे.
Tnx निरुदा.
Tnx निरुदा.
दत्त मंदिराचा फोटो छान आहे. मी गेली आहे इथे. वरून नजारा छान दिसतो. मुरुडचा समुद्री किल्ला पण जरा जास्त साफसूफ केला तर मस्त आहे.
- अमा वरून काढलेले काही फोटो होते, पण आता सापडत नाहीत. खरंच सुंदर नजारा आहे तो.
- आणि तुमचे दोन प्लॉट कुठे आहेत समजू शकेल का?
One is way ahead of
One is way ahead of secunderabad. Another behind hyd airport.
कल्पना चांगली आहे.शेतघराशी
कल्पना चांगली आहे.शेतघराशी दूरदूरपर्यंत काही संबंध नाही पण इथे डोकवायला आवडेल.
मस्त धागा आहे. वाचायला डोकावत
मस्त धागा आहे. वाचायला डोकावत राहुच.
>>>One is way ahead of
>>>One is way ahead of secunderabad. Another behind hyd airport.<<<
@ अमा, काही माहिती मिळाली आहे. थोडीफार पडताळणी करुन देतो.
इथे ओपन फोरमवर अशी माहिती देणे मायबोलीच्या धोरणात बसते का..? याची कृपया जुन्याजाणित्यांनी कल्पना द्यावी..
छान आहे हा धागा. शेतघर वगैरे
छान आहे हा धागा. शेतघर वगैरे नाहीये पण इथे डोकावत राहीन.
आमचा हा व्हरांडा गावच्या
आमचा हा व्हरांडा गावच्या घराचा आहे.
त्यामुळे बाहेरचा कोणीही पटकन तिथे येत जात असतो.
दुसरं म्हणजे ती पावसाची दिशा आहे म्हणून वर छप्पर असलं तरी पाऊसही थोडासा आत डोकावतो.
आणि दक्षिण दिशा असल्यामुळे सूर्याचाही उगवतीपासून मावळतीकडे जाताना दुपारचा प्रवास इथूनच होतो.
तेव्हा आडोसा, सावली, थोडीशी प्रायव्हसी यासाठी बिल्डींग कन्स्ट्रक्शनला वरुन विटा, वजनदार वस्तू पडू नये म्हणून आडवी वापरली जाणारी आणि तिच्या Purpose साठी आयुष्य संपलेली जाळी उभी करुन टांगली...
आता यावर बर्यापैकी फुलं येणारा आणि वर्षभर हिरवा रहाणारा वेल सोडला की वरचे उद्देश साध्य... फुलपाखरं फिरतील तो अतिरिक्त बोनस..
व्वा निरुदा, भारीच
व्वा निरुदा, भारीच
उपयुक्त धागा आहे. वाचक आहे पण
उपयुक्त धागा आहे. वाचक आहे पण एक दोन नातेवाईकांची घरं आहेत अशी आणि तिकडे जाणं होतं. इथे दिलेले प्रश्न त्यांनाही पडतात. झाडं कोणती असावी हा एक. कोकणात घर आणि आंबा नाही असं कसं होईल. पण कलम लावण्याचं टाळलय भावाने. अधूनमधून जाणार तर निगराणी कोण करणार? एक रायवळ झाड लावलं. याचे आंबे पडत राहतील खाली आणि जाऊ तेव्हा खाऊ. चोरीला जाणार नाहीत. हल्ली कारने जाणेयेणे वाढल्याने अंगणात दोनतीन कार राहतील एवढी जागा मोकळी ठेवली आहे.
grass cutter machine-
grass cutter machine- पावसाळ्यात गावी शेता मध्ये खुप गवत येते. घराच्या आजुबाजुचा परीसर गवताने भरलेला असतो. अश्या गवताचा आपल्याला तर त्रास होतोच, आणि त्या मधुन साप वगैरे येऊ शकतात. पण हेच गवत grass cutter ने व्यवस्थीतरित्या कट केले आणि झाडाच्या बुंध्यामध्ये घालुन वरती माती टाकली तर छान पैकी कंपोस्ट तयार होते. आमच्या एथे कोकमीच्या झाडाना या कंपोस्टचा खुप फायदा होतो.
तसेच घरी गाई वगैरे पाळलेले असतील तर त्यांनाही हे गवत चारा म्हणुन घालु शकता.
छोटेसे आहे आणि सहज गळ्यात अडकवुन गवत साफ करता येते.
(No subject)
छान माहिती आणी फोटोज सिद्धि..
छान माहिती आणी फोटोज सिद्धि..
हाय हाउ आर लकी पीपल.
हाय हाउ आर लकी पीपल. क्वारंटाइन च्या दिवसात असे वीकान्त घर अमुल्य आहे.
1.. 2.. 3..
1.. आमची विहिर मार्च महिन्याच्या शेवटी तळ गाठते म्हणून गेल्या वर्षी हा विहिर पुनर्भरणाचा प्रयोग केला..
हा गाळण खड्ड्यातून विहिरीत सोडलेला पाईप.. (साठवण खड्डा यात दिसत नाहीये...)
2.. हा पाईप माती टाकून झाकलांय.
3.. हे विहिरीतलं पाईपाचं टोक..
छान धागा. निरु, आपले शेत घर
छान धागा. निरु, आपले शेत घर कुठे आहे?
Pages