Submitted by राजेंद्र देवी on 12 July, 2019 - 08:38
नशीब...
जागोजागी फाटले नशीब
किती ठिगळे लावू विरणावर
काय काय भोगले हे न आठवे
नाही विश्वास आता स्मरणावर
आयुष्यभर रडत होतो
कोण रडेल माझ्या मरणावर
आजवर जळत राहिलो
तरी टाकिती सरणावर
राजेंद्र देवी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मनाच्या यातना कवितेत उतरल्यात
मनाच्या यातना कवितेत उतरल्यात.
धन्यवाद
धन्यवाद