Submitted by दत्तात्रय साळुंके on 11 July, 2019 - 13:17
पंढरीच्या गवळणी
मेघ सावळा अंतरी
आली वारी आषाढाची
ओढ जीवाला लागता
वीणा वाजे हृदयीची
हरी नामाच्या घागरी
गवळणी डोईवरी
नटखट हरी साठी
वाहताती पंढरपुरी
लोणी शुभ्र मऊ मऊ
घुसळोनी अंतकरण
स्वाद चाखताच हरी
गेले की विरघळून
रंगी रंगला केशव
सेवीतो गोपाळकाला
नामा तुका भजनात
चढे रंग किर्तनाला
© दत्तात्रय साळुंके
११-७-२०१९
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह! छानच!
वाह! छानच!
छानपेक्षाही काहीतरी सुंदर आहे
छानपेक्षाही काहीतरी सुंदर आहे पण शब्दच सापडेनात पहा आता.
अतिशय सुंदर रचना!! खुप आवडली.
अतिशय सुंदर रचना!! खुप आवडली.
मस्तच लिहिलय.
मस्तच लिहिलय.
एकदम तो सावळा दिसल्यासारखं
एकदम तो सावळा दिसल्यासारखं झालं वाचून. छान.
छानपेक्षाही काहीतरी सुंदर आहे
छानपेक्षाही काहीतरी सुंदर आहे पण शब्दच सापडेनात पहा आता. >> +१
मस्तच ! आवडली !
मस्तच ! आवडली !
छानपेक्षाही काहीतरी सुंदर आहे
छानपेक्षाही काहीतरी सुंदर आहे पण शब्दच सापडेनात पहा आता. >>+ १
विठ्ठल, विठ्ठल...
विठ्ठल, विठ्ठल...
सुरेख रचना...
खूप धन्यवाद मंडळी...
खूप धन्यवाद मंडळी...
पांडुरंग चरणी समर्पित....
खूप छान दत्तात्रय जी
खूप छान दत्तात्रय जी