Submitted by राजेंद्र देवी on 10 July, 2019 - 18:31
श्वास...
जीर्ण झाली सारी पाने
आता हवा एक देठ नवा
तिच फुले अन तेच वारे
आता हवा गंध नवा
सावल्यांनी घेरले आहे
आता हवा एक सूर्य नवा
ओशटलेली सारी नाती
आता हवा एक बंध नवा
जुने झाले श्वास सारे
आता हवा एक श्वास... नवा
राजेंद्र देवी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा! खुप सुंदर! आणि आशादायी..
वा! खुप सुंदर! आणि आशादायी..
धन्यवाद
धन्यवाद