जीवन (वैज्ञानिक शतशब्दकथा)

Submitted by अतुल. on 4 July, 2019 - 09:06

गुलाबी अचानक गेली. इतक्या वर्षांची साथ संपली. पांढरा हताश झाला. नाजूक केशरीकडे बघून आता दिवस काढायचे. त्याला सहज भूतकाळातले उतार चढाव आठवले. पिवळा त्याचा वर्गमित्र होता. त्याचा नंबर नेहमी वर असे. पांढऱ्याला असूया वाटायची. कारण तो स्वत: फारशा शार्प नव्हता. पण नंतर काळ बदलला. पांढऱ्याने खूप ताणतणाव सहन केले. पण बघता बघता त्याने सर्वांवर मात केली. वर आला.

प्रत्येकाची अशीच काही ना काही कथा होती. धागेच ते. मागचे सगळे टाके त्यांना आठवत होते. पुढचे कसे पडतील माहित नव्हते!

...आणि वेगळ्याच मिती मध्ये बसलेलं कुणीतरी सगळ्या धाग्यांनी एकत्र बनलेल्या त्या रंगीत कलाकृतीकडे वरखाली पाहून म्हणत होते,

“वा! विणकाम खूप सुंदर झालेय...”

- अतुल दि. पाटील
(४ जुलै २०१९)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वाना. धागे द्विमितीय जीव आहेत. त्यांना त्रिमितीय जग कळत नाही अशी कल्पना करून लिहिले आहे. पण त्रिमितीय जगात जगणारे आपण मात्र धाग्यांची विणकामातली पूर्ण आयुष्यरेखा एका दृष्टिक्षेपातच पाहू शकतो. त्याचवेळी, हेच तत्व आपल्याला (त्रिमितीय जीवांना) सुद्धा लागू पडते. सापेक्षतावादातली कालअवकाश मिती (Space-time dimension) लागू पडते. म्हणून कथा विज्ञान विभागात सुद्धा टाकत आहे.

>> टायटल बदलले तर जास्त मजा येईल
>> Submitted by च्रप्स on 5 July, 2019 - 05:06

नक्की. कोणते अजून समर्पक वाटेल ?

शशक मस्त ! कल्पना आवडली. छान लिहिलं आहे पण चर्प्स म्हणाले तसं शीर्षक वेगळं हवं होतं. कथा चालू होता होता वाचकांना शिर्षकामुळे हींट मिळते, त्याऐवजी थोडंस विचार करायला सोडून द्यायला हवं होतं

प्रतिसादांबद्दल धन्यवाद Happy शंभर शब्दांच्या नादात कथेतला गर्भितार्थ आणि व्याप्ती वाचकांपर्यंत पोहचवण्यात कथा कमीच पडली बहुतेक Uhoh

मस्त आहे , मिती शब्द वाचल्यावरच चटकन समजली ... टायटल परफेक्टच आहे .

छान