Submitted by आकाशगंगा on 26 June, 2019 - 13:19
मी शाळेत असताना आम्हाला एक प्रार्थना होती परिपाठच्यावेळी म्हणण्यासाठी. त्या प्रार्थनेचे मला सध्या फक्त एक कडवं आठवतंय.ती प्रार्थना मी खूप शोधली पण नाही मिळाली.मला ती प्रार्थना पूर्ण हवी आहे .जर कोणी ऐकली असेल किंवा वाचली असेल तर कृपया सांगा. ते कडवे असे होते....
'निराकार निर्गुण संपूर्ण ब्रह्म
जग हे असे पूर्ण ब्रह्मकृती
पूर्णा तल्या पूर्ण तत्वांमधूनी
पूर्णा मध्ये जन्मली प्रकृती
कैवल्य मी सर्व मांगल्य मी
कल्याणकारी चिदानंद मी'
धन्यवाद
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
या प्रार्थनेबद्दल माहिते नाही
या प्रार्थनेबद्दल माहिते नाही मात्र, मधल्या दोन ओळी या खालील इसावास्योपनिषदातील श्लोकावरून बेतलेल्या दिसतात.
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
आमच्या प्राथमिक शाळेत म्हणजे
अवांतराबद्दल माफी असावी.
आमच्या प्राथमिक शाळेत म्हणजे मी लहान असताना पुढील प्रार्थना होती.
उपेक्षू नको गुणवंता अनंता
तुझे कारणे देह माझा पडावा.......
अशी काहीशी होती नीट आठवत नाही पण,
शेवटची ओळ व्हावे कल्याण सर्वांचे इथे दप्तर आपोआप हातात घेतले जाई व मोठ्यानं दु:खी कोणी असू नये ही
ओळ दरवाजातून बाहेर पडताना म्हणत असू इतकी घरी पळायची घाई होत असे.
पुढे दोन वर्षे एका ख्रिश्चन मिशनरी कॉलेज मध्ये असताना त्यांची प्रार्थना कम बाय हिअर ओ लॉर्ड असे फादर पुढे म्हणत तेव्हा मी गो बाय देअर ओ लॉर्ड असं विरूद्ध म्हणलं की मैदानावर पोरांना फार हसू येई. पुर्ण प्रार्थना रांगेतील मुलं हसत असत. पण मी ठराविक जणांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणत असायचो तेव्हा मार बिर पडला नाही.
अवांतर कमेंट बद्दल माफ करा,
अवांतर कमेंट बद्दल माफ करा,
पण >>>>
निराकार निर्गुण संपूर्ण ब्रह्म
जग हे असे पूर्ण ब्रह्मकृती
पूर्णा तल्या पूर्ण तत्वांमधूनी
पूर्णा मध्ये जन्मली प्रकृती>>>
इतकी सोप्पी शाळेची प्रार्थना ठेवण्यामागचा विचार काय असेल?
ईशावास्योपनिषदाशी संबंधित
ईशावास्योपनिषदाशी संबंधित असल्यामुळे विनोबांनी लिहिलेली असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शोधून पहा.
मी शाळेत असताना आम्हाला एक
मी शाळेत असताना आम्हाला एक प्रार्थना होती परिपाठच्यावेळी म्हणण्यासाठी. त्या प्रार्थनेचे मला सध्या फक्त एक कडवं आठवतंय.ती प्रार्थना मी खूप शोधली पण नाही मिळाली.मला ती प्रार्थना पूर्ण हवी आहे }}}}} तुम्ही ज्या शाळेत शिकला तिकडच्या व्यवस्थापनाच्या ईमेलवर संपर्क करून किंवा त्यांच्या वेबसाइट वर सहजरित्या मिळू शकेल ना ?
उपेक्षू नको गुणवंता अनंता
उपेक्षू नको गुणवंता अनंता
तुझे कारणे देह माझा पडावा.... >>>>. समर्थांची आहे का , गणपतीत आरती संपते वेळी म्हणतात बहुदा.
नक्कीच. आता शोधलं तर
नक्कीच. आता शोधलं तर सदासर्वदा योग तुझा घडावा अशी सुरुवात आहे.
उपेक्षू नको गुणवंता अनंता
उपेक्षू नको गुणवंता अनंता
तुझे कारणे देह माझा पडावा.....>>>>>> Vacation मध्ये आजीकडे गेल्यावर रोज संध्याकाळी श्लोक आणि प्रार्थना म्हणायचो त्यात ही प्रार्थना होती. तेव्हा अर्थ कळत नव्हता त्यामुळे देह माझा पडावा म्हटलं की साष्टांग नमस्कार पोज मध्ये पडलेली मी आणि कझीन्स डोळ्यासमोर यायचे आणि हसू यायचं. ती श्लोक असा होता -
सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझे करणी देह माझा पडावा
उपेक्षु नको गुणवंता अनंता
तुझे पायी मागणे हेचि आता
जय जय रघुविर समर्थ ( म्हणजे नक्कीच रामदास रचित असावा)
हो तो श्लोक समर्थ रामदास रचित
हो तो श्लोक समर्थ रामदास रचित आहे.
@अज्ञानी
@अज्ञानी
धन्यवाद हा पर्याय सुचवल्याबद्दल. मी नक्की try करून बघेल.
@सिम्बा
@सिम्बा
विचार काय होता ते तर नाही माहीत पण ही प्रार्थना म्हणताना आणि ऐकताना छान वाटायचं. सगळे जेव्हा सोबत म्हणायचे तेव्हा संपूर्ण वातावरण अस भारल्यासारखं वाटायचं.
@वावे
@वावे
धन्यवाद.प्रयत्न बघते करून शोधण्याचा.
रामदासांच्या मनाच्या
रामदासांच्या मनाच्या श्लोकांमध्ये शेवटी करुणाष्टके आहेत. त्यांपैकी सदा सर्वदा हा एक श्लोक असावा.
ज्या ज्या स्थळी हे मन जाय
ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे
त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी
त्या ठिकाणी सद्गुरू तुझे पाय दोन्ही
ज्या ज्या स्थळी हे मन जाय
ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे
त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी
त्या ठिकाणी सद्गुरू तुझे पाय दोन्ही}-----तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही, असे आहे ते.
>>तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही
>>तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही, असे आहे ते.<< +१
>>सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझे करणी देह माझा पडावा
उपेक्षु नको गुणवंता अनंता
तुझे पायी मागणे हेचि आता
जय जय रघुविर समर्थ <<
तुझे पायी मागणे हेचि आता - रघुनायका, मागणे हेची आता. - असं आहे ते....
धन्यवाद राज
धन्यवाद राज
रघुनायका, मागणे हेची आता. -
रघुनायका, मागणे हेची आता. - असं आहे ते.... >>>> हो हो, असंच आहे. मीच चुकले होते. तुमच्या करेक्शन मुले अजून खूप काही आठवलं. आजीने हे पण सांगितलं होतं की रघुनायक म्हणजे राम आणि रामदास म्हणजे रामाचे भक्त इ
अवांतर - श्री. सुनील चिंचोलकर
अवांतर - श्री. सुनील चिंचोलकर यांनी भरपूर सखोल संशोधन/अभ्यास करून रामदास स्वामींवर डझनभर पुस्तके लिहलीत. त्यांचं आयुष्यच समर्थ स्वामींना वाहिलंय असं म्हटल्यास अतिशयोक्ती नाही. जिज्ञासूंनी जरूर त्या पुस्तकांचा आस्वाद घ्यावा.
आम्हाला होती ही प्रार्थना.
आम्हाला होती ही प्रार्थना. आणखी एका कडव्याची सुरुवात खालीलप्रमाणे होती.
मी ना अहंकार बुद्धी न चित्त .. . मलाही आठवत नाहीये पण पूर्ण
शाळेच्या प्रार्थना सहसा बदलत
शाळेच्या प्रार्थना सहसा बदलत नाहीत. शाळेशी संपर्क करून विचारा आणि इथेही लिहा.
योगगीत
योगगीत
कैवल्य मी सर्व मांगल्य मी कल्याणकारी चिदानंद मी ।। निराकार निर्गुण संपूर्ण ब्रह्म जग हे असे पूर्ण ब्रह्माकृती पूर्णातल्या पूर्ण तत्वांमधुनी पूर्णामध्ये जन्मली प्रकृती ॥१॥
मी ना अहंकार बुद्धी न चित्त ज्ञानेंद्रियातून माझी न वसति आकाश पृथ्वी तेजामध्येना मनी ना वसे मी न वायुगती ॥२॥
मी पाच वायूंमध्ये ना वसतो ना सप्तधातूंतूनि जन्मलेलो न मी पाच क्लेश न मी प्राण आहे षडांगामध्ये मी नसे राहिलेलो ॥ ३॥
मला रागनाही, मला द्वेषनाही असे मी सदा लोभमोहातीत असो श्रेष्ठ पुरुषार्थ चारी तरीही असे मी सर्वांतूनी वंचित ॥४।।
सुख दुःख पुण्यांमध्ये मी न रमलो मला मंत्र वा वेद ना ठाऊक तीर्थात नसतो यज्ञि न वसतो क्रिया मी नसे भोज्य वा भोक्त ।।५।।
सृष्टीमध्ये मी न जन्मासि आलो न ठावे मला पितृ-माता कसे मला बंधू वा मित्र वा शिष्य नाही भीती मला मृत्यूचीही नसे ॥६॥
मी निर्विकल्प निराकार रुप सर्वेद्रियातीतं मी सर्वव्यापी सर्वत्र माझा समभाव आहे मला बंधने ना मला मुक्ती आहे ॥७॥
कैवल्य मी सर्व मांगल्य मी
कल्याणकारी चिदानंद मी
कल्याणकारी चिदानंद मी
ही प्रार्थना कदाचित निर्वाण
ही प्रार्थना कदाचित निर्वाण षटकाचं मराठी रूपांतर असावी ..