गाडीत बसल्या बसल्या अर्ध्या तासात प्रसवलेली पहिलीच काहीच्या काही गझल माबोकरांच्या समोर सादर करत आहे.
ता.क.:- गझलेच्या नियमांत बसो व न बसो मी याला गझल म्हणूनच सादर करत आहे.
काय सांगू मित्रहो माझी व्यथा, आज काल मी पित नाही,
हरेक सांज बुडवायचो प्याल्यात मी , आता घशाखाली उतरत नाही.
पुसती सर्व मित्रगण, येत नाहीस पारावर पुर्वीसारखा,
संसाराने केलेली माझी दुरावस्था, त्यांना स्वःमुखे सांगवत नाही.
प्यायचो आधी बसून दुरवर, यायचो बेफाम वेगात घरी,
आता लावले जिथे तिथे नाके, मामा पाचशे घेतल्याशिवाय सोडत नाही
वैतागून केली सुरुवात घरीच प्यावया, प्यायची सवय जात नाही,
पण नंतर घडले असे किस्से, की आता तेही करायला धजावत नाही.
होते एकदा कोकरु झोपलेले, भार्या वदली 'घेता घेता' झुलवा झोळी
बाळ ऊठलेले न कळले हेडफोनमुळे, झालेला अपमान विसरवत नाही.
एकदा पत्नी म्हणाली करते कोशिंबीर, दे चिरुन काकडी जराशी,
दारुपेक्षा गोड ती कडू काकडी, कोशिंबीरीची चव बायको विसरू देत नाही.
सांगता जुने किस्से बायकोला, म्हणते काय ते कौतुक ईतक्याश्या पिण्याचे,
खंबा उभा रचवूनही माझ्या माहेरी, कुणी असे हालत डुलत चालत नाही,
घेता मोजून एक क्वार्टर आधी, लागयची स्वर्गीय ब्रम्हानंदी टाळी,
आता या कुलदिपकांच्या कोलाहामधे, जरा डोळासुद्धा लागत नाही.
आठवूनी जुने दिवस ते सोनेरी, वारंवार ढाळतो अश्रु मनोमनी
सभ्य संसारी सुशिक्षित या मला, अतरंगी मी क्षणभरही गवसत नाही.
बरेच दिवसांनी गझलेचं शीर्षक
बरेच दिवसांनी गझलेचं शीर्षक आवडले.
गझल ठीकठाक.
आजकाल मी पित नाही, पुर्वी
आजकाल मी पित नाही, पुर्वी सारखी चढत नाही. का खिशाला परवडत नाही?
आजकाल मी पित नाही, कुठेही लोळत नाही. मित्रांना आजकाल भेटत नाही.
खरं तर गझलेतील काही कळत नाही. पण छान म्हटल्याशिवाय राहवत नाही.
भारीये
भारीये
(No subject)