प्रेम..

Submitted by मन्या ऽ on 19 June, 2019 - 23:32

प्रेम..

प्रेम म्हणजे
अथांग सागर
प्रेम म्हणजे
वाळवंटातील मृगजळ
ज्याने तहानलेल्याची
तहान काहीकेल्या
भागत नाही

प्रेम म्हणजे
विश्वास
प्रेम म्हणजे
आपुलकी
जो वेळप्रसंगी
माणुसकीला जागलेच
असे नाही

प्रेम म्हणजे
अटी
प्रेम म्हणजे
बंधन
जे माणसाला
एक माणुस म्हणुन
वागवत नाहीत
मुक्तपणे जगु देत नाही

तरीही हे प्रेम
वाटे मजला हवेहवेसे
ते प्रेम
जे एकमेकांच्या
अबोल गोड शब्दांचे
एकमेंकाच्या साथीचे
समोरच्याच्या मंद गुढ
हास्यातले

ते प्रेम
जे आयुष्यात
देवघरातल्या
नंदादिपाप्रमाणे
अखंड तेवणारे
स्वतः जळून
काळोख मिटवणारे

(दिप्ती भगत)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेमाच्या बऱ्याच व्याख्या सुंदर रित्या मांडल्यात, कीप इट अप.
कविता सुंदर केलीये, मायबोलीवर बऱ्याच दिवसांनी काहीतरी फ्रेश आल्यासारखं वाटतंय, तुझ्या कवितांनी.

पण खरं सांगायला गेलं तर, प्रत्येकाच्या प्रेमाच्या व्याख्या वेगळ्या असतात.

प्रेम असतं अधीर
करत असतं बधिर
असतो प्रचंड वेग
नसता आवरता आवेग.

प्रेम असतं बेभान,
फक्त प्रेमाचीच तहान,
कुणी नसतं प्रेमात लहान,
लैला मजनू असो, की सीताराम,
चाळीतील गीता असो, की डबेवाला तुकाराम,
हे प्रेमच असतं महान.
सो......

कुणासाठी लिहिलंयProud

प्रेम म्हणजे
अथांग सागर
प्रेम म्हणजे
वाळवंटातील मृगजळ
ज्याने तहानलेल्याची
तहान काहीकेल्या
भागत नाही>>>>>> मस्त. खूप छान. नाहीच भागत तहान. आणि एकदा खड्ड्यात पडलो तरी next time पडायची इच्छा होतेच Wink पण प्रेम म्हणजे देणे फक्त देणे,. कसलीच अपेक्षा न ठेवता. असो. आवरते Happy .