Submitted by भागवत on 18 June, 2019 - 05:43
माझ्याच स्वप्नांना लावला मी सुरूंग
संकल्प सोडला अर्धवट पुन्हा एकदा
शर्थीचे प्रयत्न सत्यात आले नाहीत
निश्चयाचे संपले बळ पुन्हा एकदा
स्वप्नांची लचके तोडली मी स्वत:
पराभवाने दिली मात पुन्हा एकदा
कष्टाची घागर भरली पुन्हा संपूर्ण
अपयशाचे भरले रांजण पुन्हा एकदा
प्रयत्नाचा डोंगर उभारला मी स्वत:च
नियतीनेच दिला घाव पुन्हा एकदा
सुखांना जिंकण्याचा भास मला झाला
दु:खाने केले गर्वहरण पुन्हा एकदा
काळेकुट्ट ढग अन दाटलेल आभाळ
संकल्पाचा सोडला बाण पुन्हा एकदा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त. आवडली.
मस्त.
आवडली.
शेवटचा शेर! क्या बात है! वाह!
शेवटचा शेर! क्या बात है! वाह!
प्रतिसादा साठी धन्यवाद
प्रतिसादा साठी धन्यवाद 'सिद्धि' आणि मन्या ऽ!!!