निकाल....

Submitted by खुशालराव on 17 June, 2019 - 07:25

विनिता :- काय रे महेश? काय झाल!? असा उदास का झालास? आज तर आपला रीझल्ट आहे ना, मंग असा काॅलेज च्या बाहेर का बसलायस? घेतला का रीझल्ट?

महेश :-..................

विनिता :- अरे बोल ना काहीतरी... काय झाल? एखादा विषय राहिला का? राहिला असेल तर काय होईल... पुढच्या सेम ला परत एक्झाम दे, निघेल पुढच्या वेळी.

महेश :- तुला काय गं.... तु आहेस आॅल क्लियर......

विनिता :- अरे असा का बोलतो... आपण सगळ्यांनी एकत्रच अभ्यास केला होता ना... आपल्या ग्रुप मधल्या सगळ्यांचे सब्जेक्ट निघालेत आणि तु पण तर भरपूर अभ्यास केला होतास ना... मंग काय झालं तरी काय नेमक.... रीव्हिजन सुध्दा खुप चांगली केली होतीस तु..

महेश :- तुला माहीत आहे ना माझा प्राॅब्लम... मंग का विचारतीयस....? काय होतं मला पेपर लिहीताना काय माहीत..! एखादा दुसरा प्रश्न लिहूसतर बाकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे विसरून जातो मी.... क्वशन पेपर वाचताना माहीत असत मला, की केलाय मी या प्रश्नाचा अभ्यास पण मला नाही आठवत त्या वेळी उत्तरं तर त्यात माझी काय चूक? सांग ना तूच... तू स्वतः सुध्दा कीती तरी वेळा माझा अभ्यास घेतला आहे ना.... मंग....

विनिता :- किती सब्जेक्ट गेले?

महेश :- २

विनिता :- होशिल रे पुढच्या सेम ला पास.. आणी सगळ्यांना माहीत आहे की तू अभ्यास करतो... उलट थोडाफार जास्तच करतोस तू अभ्यास पण तरी खरंच आम्हाला पण नाही कळतं की....

महेश :- साॅरी गं, मला माहीती आहे की मला चिडवण्यासाठी नाही बोलली तू पण....

विनिता :- ठीक आहे रे मी समजू शकते....

महेश :- सगळ खरं... पण मी आता घरी गेल्यावर आई वडिलांना काय सांगु..? त्यांच्या कीती अपेक्षा आहेत माझ्याकडून... आणि मी... मी हा असा.. जाउदे आता घरीच जाणार नाही मी. बघ ना आज पर्यंत एकदा सुध्दा कुठल्याच विषयात मी नापास नाही झालो पण प्रत्येक वेळी मी ईतका अभ्यास करून कधीच ५० टक्क्यांच्या पुढे कधीही नाही गेलो.

विनिता :- होतं रे असं.... मला माहित आहे की तुला किती वाईट वाटतं असेल, पण.... पण इतकं मनाला नको लावून घेऊ होशील ना पुढच्या सेमला पास, आपला आख्खा ग्रुप आहे तुझ्यासोबत

महेश :- तुला माहिती आहे विनू मी बघत असतो ना आजूबाजूला इतरांचे आई वडील त्यांच्या मुलांना ५५ ६० टक्के पडले तरी कीती ओरडतात-मारतात पण मी लहानपणापासून इतका ढ असुन सुद्धा माझे आई वडील या बाबतीत मला कधी काहि बोलले नाही तात्पुरत ओरडतात पण.. पण दरवेळी माझा आत्मविश्वास कायम रहावा म्हणुन माझी समजूत काढतात... आणि मी... जाऊ दे मला नाहि जायच घरी... कुठल्या तोंडाने घरी जाऊ मी...!
दोन तीन मिनिटे दोघेही शांतच राहिले

विनिता :- चल आम्ही सगळे येतो तुझ्या सोबत... आम्ही बोलतो तुझ्या आई वडीलांंशी.... ऐ विघ्नेश जा बरं आपल्या ग्रुप मधल्या दोन तीन जनांना बोलव....

विघ्नेश :- काय झाल?

विनिता :- तुला सांगितलं तेवढ कर ना.... नाहीतर थांब मीच बोलविते

महेश :- नाही... नको.., काही गरज नाही त्याची

विनिता :- मंग.... जातोय ना घरी..?

महेश :- हो...

विनिता :- नक्की....!?

महेश :- ह्म्म...

विनिता :- चल बाय.. आणि घरी पोहचला की फोन कर.....

महेश :- ह्म्म...

महेश दिवसभर इकडे तिकडे फिरत राहतो त्याला काय कराव काहीच सूचत नाही.
इकडे २ तास झाले तरी महेशने घरी पोहचलो म्हणून फोन न केल्यामुळे विनिता थोडीशी घाबरते तस तिला खात्री असते की तो स्वतः च बरेवाईट करून घेणार नाही पण तो निघून जाउ शकतो.. ती विचार करत करतच महेश ला फोन करते.. एक दोन रींग नंतर महेश फोन उचलतो...

महेश :- बोल...

विनिता :- अरे तू घरी गेल्यावर मला फोन करणार होतास ना मला, मंग..? आणखीन घरी नाहि गेला का तू?

महेश :- चाललोय घरी... (फोन कट करतो)

विनिता त्याला परत फोन करते तर त्याचा फोन बंद येतो. तीला वाटतं बॅटरी वगैरे संपली असेल.. घरी पोहोचल्यावर करेल फोन....

महेश विनिताला घरी चाललोय अस खोटच बोललेला असतो.... तो नदि च्या विरान किनारी चाललेला असतो... हो जिव देण्यासाठीच... चालता चालता त्याच्या मनात एखाद्या चित्रपटा प्रमाणे त्याला त्याचे आई, वडील, लहान बहीण स्मृती यांच्या सोबतच्या आठवणी येत असतात. तो एक दोन मिनिटे त्या आठवणीत रमतो... खरतर त्याला त्या आठवणी आणखीनच वैताग आणतात तो पुढचा मागचा विचार न करता पाण्यात उडी घेतो....

आईईईईई.....

आचाणक आलेल्या किंचाळी मुळे स्मृती डचकून जागी होते... उठून बघते तर महेश उठून घाबरलेल्या अवस्थेत बसलेला असतो.. ओरडण्याचा आवाज ऐकुन महेश चे आई आणि वडील पळतच या दोघांच्या खोलीत येतात... तर महेश अजुनही घाबरलेलाच असतो... स्मृती तेवढ्यात कीचन मधुन पाणी घेउन येते...

स्मृती :- दादा., घे पाणी पी....
पण महेश अजूनही तसाच धक्यातच असतो
आई :- स्मृतीच्या हातातून ग्लास घेते हे तिघेही महेशच्या आजूबाजूला बसतात..... अर्धा एक मिनट कोणीच काहि बोलत नाही... आपण आत्ता स्वप्न बघितले हे लक्षात आल्यावर महेश आईच्या हातातून पाण्याचा ग्लास घेऊन घटा घट पितो....

आई :- अरे जरा हळु.. महेशच पाणी पिऊन झाल्यावर त्याच डोक्यावरून हात फिरवत विचारते... काय झालं बाळा? वाईट स्वप्न बघितल का एखाद?
(खर तर तिघेही थोडेसे हैरान झाले होते. कारण महेशला जरी कधी वाईट स्वप्न पडले तरी तो कधी असा घाबरून उठला नव्हता उलट दुसर्‍या दिवशी स्वतःच स्मृतीला त्या स्वप्नाची आणि स्वतःची सुध्दा थट्टा उडवून सांगत असतो.)

महेश फक्त होकारार्थी मान हलवतो..

आई :- काय पाहिल स्वप्नात?.

महेश :- मी आत्महत्या केली....

महेशची आई काही बोलणार तेवढ्यात तीला महेशचे वडिल थांबवतात व स्वतःच विचारतात

वडील :- का?

महेश :- कारण मी नापास झालो....

वडील :- एक विचारू? प्रामाणिकपणे उत्तर दे... तु या वर्षी अभ्यास केला होता का?

स्मृती :- हो, दादा रोज
वडील शांतपणे तिच्याकडे बघतात...

महेश :- हो, केला होता... ते सुध्दा मन लावून.... मलाच या वेळी ५० च्या वर टक्के पाडायचे आहेत.
....
त्याचे वडील त्याच्या मनाची स्थिति ओळखुण बोलतात...

तुला माहिती आहे महेश मी आमच्या कंपनीत माझी १२ वी नापास झाल्यावर एक साधा कामगार म्हणून लागलो होतो आणि आज २२ वर्षानंतर भी तीथे सिनियर मॅनेजर म्हणून मी पाहतो...

आता यांच्या या स्टोरीचा आणि महेशच्या स्वप्नाचा काय संबंध? असा विचार करतच महेशची आई बाकीच्या तिघांना बघते...

महेशचे वडील दोन क्षण थांबतात आणि परत बोलु लागतात.. तुला माहीत आहे महेश माझ्या आजपर्यंतचा यशाच रहस्य काय आहे ते?

आता महेशही त्याच्याकडे थोडासा वैतागूनच बघतो, पण त्याच्या वडलांना बढाया मारण्याची सवय नसल्याने तो काहीतरी असेल असा विचार करून शांतपणे ऐकत राहतो..

वडील :- मी ना ज्यावेळी १२ नापास झालो त्या वेळी स्वतःच नोकरी शोधली तुझे आजोबा म्हणत होते की कर तुझ शिक्षण पुर्ण.., कमीत कमी १२ वी तरी पुर्ण कर... पण नाही, कोणी सांगितल म्हणुन ऐकेल तर तो मी कुठला.. मी सांगितल की मला बोलावलय ४ दिवसाने कामावर रुजू व्हायला आणि मला सुध्दा जायचय तेव्हा माझ्या वडीलांनी परवानगी तर दीली पण एक दोन दिवस काही बोलले नाही माझ्याबरोबर.. पण नंतर सगळ काही ठीक झाल. मी कामावर तर व्यवस्थित जात होतो पण प्राॅब्लम असा होता की १ / २ महीने झाले तरी माझ मन काही लागत नव्हतं सहाजिकच आहे त्यामुळे माझ काम सुध्दा काही खास होत नव्हते. प्रयत्न खुप करत होतो पण.... कुठेतरी वाटत होते की काय मिळणार आहे हे काम करून जाऊदे... शेवटी वैतागून मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला..

घेतलेला निर्णय कामावर सांगण्या आगोदर घरच्यांच्या भितीने घरी सांगितला. तर घरी सगळे विचारत होते सल्ले देत होते की कशाला काम सोडतोय, आणखी काही दिवस काढुन बघ वगैरे वगैरे.. पण तुमचे आजोबा मात्र शांत होते... ते बघून मला आनंद आणि भिती एकत्रच वाटुन गेली. आनंद वडील काही बोलले नाही याचा तर भिती... अं... काय म्हणता तुम्ही त्याला?! हा.... तुफान के पेहले वाली शांती.. तस तर काही नाही ना याची... झाली एकदाची कशीतरी रात्र.. रात्री जेवण झाल्यावर बाबांनी मला त्यांच्यासोबत येण्यासाठी खुणावले तशी शतपावली करणे ही त्यांची रोजची सवय, पण कधी खचितच कोणाला घेऊन जात असत.. मी त्यांच्या मागे मागे चाललो होतो खरंं, पण पुढे काय होणार या भितीने धड धड व्हायला झालं होतं.. त्यांनी मला हळूच सोबत घेऊन माझ्या खांद्यावर हात ठेवून चालवल.. खांद्यावर हात ठेवल्यावर मी फक्त आता तोच हात माझ्या कानावर कधी पडतो याचीच वाट बघत होतो.. पण झालं काहितरी वेगळेच आम्ही दोघ एका कठड्यावर बसलो....

बाबा :- मंग विनोबा, काय अडचण आहे न्हाई म्हणल कळू तरी द्या बापाला...

मी भीतीमुळे गप्पच.. माझी अशी अवस्था बघुन बाबांचा आवाज थोडा नरम झाला.

बाबा :- काय झालं विनोबा? कामावर कुणी काई बोल्ल का?

मी:- नाही.

बाबा :- मंग, पगार कमी हाय?

मी :- नाही.

बाबा :- कोणी काही तरास देतय का?

मी :- नाही..

बाबा :- सांग की लेका... का काम सोडायलास...?

मी :- जे होईल ते बघून घेऊ असा विचार करून मी उरला सुरला सगळा धीर एकवटून सांगितल..
अण्णा मी खरच खूप प्रयत्न करतोय मन लावून काम करण्याचा पण राहुन राहुन एकच विचार मनात येतो की होणार काय आहे हे काम करून.. माझ काम सुध्दा मला थोडफार आवडत पण पुढे काय? या विचाराने मला अक्षरशः नको नकोस केलय.. त्यामुळे माझ कामात मन नाही लागत. म्हणून माझ काम सुध्दा मझ्या मनाला समाधान मिळेल अस नाही होत.. तुम्हीच सांगा आता मी काय करू?
दोन क्षण थांबून
बाबा :- तुला तुझ काम आवडत?

मी :- हो...

बाबा :- मंग तुझ पुढ काय व्हईल की हीच चिंता हाय न्हवं?.

मी :- मानेनेच होकार दिला.

बाबा :- हे बघ पोरा आयुष्यामंदी कदिबी ध्यानात ठिव... आपल्याला लई जागा बघायच्या असत्यात, लई सपन असत्यात, जी आपल्याला पुर्ण करायची असत्यात... आपल्याला जस एखाद्या नवीन ठिकाणी पोचण्यास कुणीतरी रस्ता दावणारं एखाद येळी सुरवातीला सोबत करणार पाहिजे असतय पण तिथवर आपल्यालाच जाव लागतय, तसच आपली सपन पुरी करायला, काम व्यवस्थित करायला पण कुणीतरी गुरू लागतुया पण तिथपण काम आपल आपल्यालाच कराव लागत. गुरू फकस्त रस्ता दाखवतो आपण तो रस्ता ध्यानात ठेऊन फकस्त पुढच्या पावलावर लक्ष ठीवायच तवाच आपण आपल्या जागेच्या एक एक पाऊल जवळ जातोत.. एकदा कुठ जायच ते ठरिवल त्याचा रस्ता माहीती पडला की कुठ जायचय याचा विचार करण्यापेक्षा आत्ता पुढच पाऊल कुठलया बाजुला टायचय आण त्यात एखादी आडचण आली की ती कशी बाजुला सारायची एवढच बघायचं. तसच कामात बी हाय लेकरा. आपुण काय काम करायच हे ठरवल्यावर ते कस करायच आणि त्यात अडचणी आल्यावर काय करायच एवढच बघाव.. येळ आलीच तर एखाद्यायेळी रस्ता थोडा बदलायला हरकत नाही पण आपण कुठ जायला निघालो हे ध्यानात घेवुनच.. हे बघ पोरा तुझी नौकरी सोडायची का करायची हे तुझ तू ठरीव, मी मदी आडकाठी नाय आणणार. पण जे बी काम करशील ते व्यवस्थित कर..

मी :- तर हेच आहे माझ्या यशाच सीक्रेट.. कळल का?

स्मृती :- हो कळल बाबा, पण बाबा एवढ सगळ आमच्या कधी पर्यंत लक्षात राहणार याला सम अप करा ना प्लीज...

मी :- बघ बाळा आपण एकदा ठरवलं ना की आपल्याला काय मिळवायच आहे कि मंग त्यासाठी एक प्लॅन बनवायचा आणि लगेच कामाला लागायच.. चुकलो तर हरकत नाही चुक दुरूस्त करून पुन्हा प्रयत्न करायचा.. प्लॅन मध्ये बदल करावा लागला तर चालेल पण ध्येय नाही बदलायचं... ओके?

महेश :- पण बाबा याचा माझ्या स्वप्नाशी काय संबंध?

आता महेशच्या वडीलांनी डोक्यावर हात मारून घ्यायचेच तेवढ बाकी राहिल... पण त्यांनी तस न करता शांत पणे सांगितले.

वडील :- हे बग महेश तु रस्ता तर व्यवस्थित तर चाललास ना! म्हणजे अभ्यास तर मनापासून आणि व्यवस्थित केलास ना मंग पास होशील का नापास याची काळजी करू नकोस.. एखाद्या विषयात नापास झाला तर परत परीक्षा दे.. ठीक आहे?

महेश :- थोड्याशा खुशीतच,

आई : तुला एक सांगु ? जगाचा एवढा विचार नको करुस मला मान्य आहे कि या जागात स्पर्धेला खुप महत्व दील जातं आणि ते एका मर्यादेत बरोबर देखिल आहे. पणं मला सांग महेश जर एखाद्या माशाला सांगितले की तू मला झाडावर चढून दाखव आणि एखाद्या आणि माकडाला सांगितले पोहून दाखव म्हणून तर विचार करुन बघ त्या दोघांची सुध्दा काय अवस्था होइल ते ? तसंच असेतं, तु तुझ शिक्षण पुर्ण करणं ही एक प्रकारे काळाची गरज आहे. पण तुला एक सांगते.. या शाळेतल्या परीक्षा देणं आयुष्याच्या परीक्षेच्या तुलनेत खुप सोपं आहे रे, तु जर इथेच हार स्विकार केलिस तर कसं होईल तुझ? तु खरोखरे अगदी मनापासून प्रयत्न केला होतास का?

महेश : (खाली मान घालूनच उत्तर देतो) हो..

आई : झाले तर मग हे बघ माणुस तेवढेच खाऊ शकतो जेवढी त्याला भूक आहे, मग इतकि काळजी करु नकोस परीक्षेच, मला पुर्ण विश्वास आहे माझ्या मुलावर, तू आणखिन एकदा प्रयत्न कर आनि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आयुष्यात येनारे कोणतेही संकट माणसाच्या जिवनापेक्षा जास्त महत्वाचं नकत रे. उलट हि संकटे जर आपल्या जिवनात आलिच नाहीत तर माणसाचे जिवन अगदी निरस होऊन जाईल माहीती आहे..!

वडील :-आणि जस एडीसन म्हनाला आहे single sheet of paper can't decide my future त्यामुळे जास्त विचार करत बसू नकोस, अभ्यासासोबतचं असं काहि तरी काम कर जे तुला अगदी मनापासुन आवडते. समजले?

महेश : (मानातले सगळे निराशा जनक विचार दूर झाल्यामुळे खुश होउनचं प्रतिसाद देतो.) हो..

वडील : (महेशला हळूवार टपली मारतच बोलतात) चला झोपा आता.. रात्रीचे तीन वाजलेत.. आणि हो.. चुकल्यावर पुन्हा प्रयत्न कर याचा अर्थ चुक होण्याची वाट बघ असा होत नाही बरं.. प्रत्येकवेळी आयुष्य दुसरी संधी देईल असे काही नाही... चला झोपा.

महेशला घरच्यांनी समजून घेतल्यामुळे आणि योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळे त्याच्या मनातले नैराश्यपुर्ण विचार गेले आणि शांतपणे झोपी गेला.

कृपया आपल्याला ही कथा कशी वाटली हे कळविण्यास विसरू नका..!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults