पाऊस.. पाऊस.. पाऊस शब्दच किती गोड आहे ना.. ऐकायला सुद्धा आणि बोलायला सुद्धा... पाऊस म्हटल की आठवतो तो वार्यासह जोरात कोसळणारा मुसळधार पाऊस.. तर कधी कधी अगदीच रिपरिप.. पण तो जेव्हाही येतो इतकी refreshment देऊन जातो की बस अस वाटत की आयुष्यातली ही भावना, हा क्षण इथेच थांबावा.. काळाने पुढे सरकूच नये कधी.. असा हा पाऊस...
त्याचा थंड स्पर्श.. चेहर्यावर, गालांवर, ओठांवर, हातावर ओघळणारे पावसाचे ते थंड पारदर्शक मोहक थेंब... Actually ते पावसाचे थेंब थंड नसतातच कधी... वातावरणाला गारवा ते थेंब थंड करतो...
पावसासोबत वाहणारा तो गार वारा... आहाहा त्याबाबतीत तर शब्दच नाहीत इतकी अप्रतिम अक्षरश अप्रतिम ती feeling जेव्हा तो गार वारा अंगाला स्पर्शून पुढे निघून जातो... अंगावर रोमांच उभे होते. पावसात वाजणारी थंडीचा तर काही तोडच नाही.
ह्या अश्या पावसात ना मस्त गरमागरम काॅफीचा मग घेऊन गॅलरी किंवा टेरेस, खिडकी कुठेही ऊभे राहून पावसाला न्याहाळताना इतक भारी वाटत ना..just awesome
मस्तच..... की.. पावसाच्या
मस्तच..... की.. पावसाच्या पहिल्या सरीनंतर मातीचा जो सुगंध दरवळत राहतो तो न विसर्ण्याजोगा असतो.
Thanks पोर्गेला
Thanks पोर्गेला