Submitted by mi manasi on 8 June, 2019 - 02:17
"देवा"
देवा तुझे जरी सुंदर आकाश
मी तुझा प्रकाश
अंधारी का------------------ll १ ll
सुंदर वेलींना सुंदर हि फुले
माझीच का मुळे
खुडलेली -------------------ll २ ll
साखरेचे खाई त्याला तूच देशी
मी का रे उपाशी
तुझ्या घरी ------------------ll ३ ll
भिकारी तुही तुझ्या आईविना
माझ्या का वेदना
जाणेनाशी ------------------ll ४ ll
काठीला तुझ्या आवाजच नाही
तरी त्राही त्राही
करावे मी- -----------------ll ५ ll
जगवीशी असा मला कशासाठी
रोज गाठीभेटी
मरणाच्या- ----------------ll ६ ll
कोणाचा मी कोण मला ना ठाउकें
सारे जग मुके
बोलेचिना -----------------ll ७ ll
आवडतो तुज जो आवडे सर्वांना
मी कुठे उणा
सांग बाप्पा ---------------ll ८ ll
किती देवराया पाहशील अंत
मी हा गुणवंत
झाकोळलो ---------------ll ९ ll
..... मी मानसी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह! अप्रतिम! अगदी आवडली.
वाह! अप्रतिम! अगदी आवडली!
सुंदर..खुप आवडली.
सुंदर..खुप आवडली.
शाली, मन्या ..धन्यवाद. ..लो.
शाली, मन्या ..धन्यवाद. ..लो. अ .
शाली.. बरोबर
खुप खुप सुरेख कविता!
खुप खुप सुरेख कविता!
मनापासून भावलेली.
मीझ्य
माझ्या category चूरून.
माझ्या category चूरून.
निव्वळ अप्रतिम !
निव्वळ अप्रतिम !
Sorry mansi defaulted mgs
Sorry mansi defaulted mgs send
Very nice poem
like MY Category
दुख भरी as well as आशावादी
आवडली कविता!
आवडली कविता!
प्रांजली, विक्ष्य ,
प्रांजली, विक्ष्य , अज्ञातवासी .... धन्यवाद.
खरंच प्रेरणादायी आहेत हे प्रतिसाद.
असाच लोभ असावा.
सुंदर लिहिली आहेस...
सुंदर लिहिली आहेस...
महाश्वेता , धन्यवाद.. लोभ
महाश्वेता , धन्यवाद.. लोभ असावा .
तो तर आहेच ग!
तो तर आहेच ग!
(कुणी लोभ असावा असं म्हटलं ना, मी हमखास असं बोलते. समोरच्याला इतकं आपलंसं वाटत ना! कधीच चान्स मिळत नव्हता, आज चान्स दिलास. थँक्स)
महाश्वेता, आवडलं... म्हणून
महाश्वेता, आवडलं... म्हणून झिरपलं मनांत.