"देवा"

Submitted by mi manasi on 8 June, 2019 - 02:17

"देवा"

देवा तुझे जरी सुंदर आकाश
मी तुझा प्रकाश
अंधारी का------------------ll १ ll

सुंदर वेलींना सुंदर हि फुले
माझीच का मुळे
खुडलेली -------------------ll २ ll

साखरेचे खाई त्याला तूच देशी
मी का रे उपाशी
तुझ्या घरी ------------------ll ३ ll

भिकारी तुही तुझ्या आईविना
माझ्या का वेदना
जाणेनाशी ------------------ll ४ ll

काठीला तुझ्या आवाजच नाही
तरी त्राही त्राही
करावे मी- -----------------ll ५ ll

जगवीशी असा मला कशासाठी
रोज गाठीभेटी
मरणाच्या- ----------------ll ६ ll

कोणाचा मी कोण मला ना ठाउकें
सारे जग मुके
बोलेचिना -----------------ll ७ ll

आवडतो तुज जो आवडे सर्वांना
मी कुठे उणा
सांग बाप्पा ---------------ll ८ ll

किती देवराया पाहशील अंत
मी हा गुणवंत
झाकोळलो ---------------ll ९ ll
..... मी मानसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sorry mansi defaulted mgs send

Very nice poem
like MY Category
दुख भरी as well as आशावादी

प्रांजली, विक्ष्य , अज्ञातवासी .... धन्यवाद.
खरंच प्रेरणादायी आहेत हे प्रतिसाद.
असाच लोभ असावा.

तो तर आहेच ग!
(कुणी लोभ असावा असं म्हटलं ना, मी हमखास असं बोलते. समोरच्याला इतकं आपलंसं वाटत ना! कधीच चान्स मिळत नव्हता, आज चान्स दिलास. थँक्स)
Happy