तळ्यावरचे पक्षी-१

Submitted by वावे on 4 June, 2019 - 08:24

पुढचा भाग https://www.maayboli.com/node/70187

विस्तीर्ण उद्यानं हे जसं बंगळूर शहराचं वैशिष्ट्य आहे, त्याचप्रमाणे शहरात असलेले अनेक लहानमोठे तलाव हेही या शहराचं एक वैशिष्ट्य आहे. पाणीपुरवठ्याच्या मूळ उद्देशाने बांधल्या गेलेल्या या तलावांपैकी अनेक तलावांची वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाढलेल्या प्रदूषणामुळे अतिशय वाईट अवस्था झाली आहे. तरी उल्सूर लेक, सँकी टँक, नागवारा लेक, माडीवाला लेक असे काही चांगले तलाव अजूनही शिल्लक आहेत. प्रदूषित झालेल्या काही तळ्यांचं पुनरुज्जीवन करण्याचं कामही चालू असतं. आमच्या घरापासून दोनअडीच किलोमीटरवर असलेल्या एका तळ्याच्या स्वच्छतेचं आणि सुशोभिकरणाचं काम गेल्या वर्षी पूर्ण झालं. घराच्या अगदी जवळ, पाच मिनिटांवर असलेल्या तळ्याचंही काम सुरू आहे. या दोन ठिकाणी फिरायला गेल्यावर अनेक पक्षी दिसतात. स्वाभाविकपणे फोटोही काढले जातात. Happy त्यापैकी निवडक फोटो खाली देत आहे.

चित्रबलाक ( painted stork)
paited_2_0.jpg

paited_1.jpg

painted_3_0.jpg

शेलाट्या ( Black-winged stilt)
stilt_3_0.jpg


हा पक्षी घरट्यावर अंडी उबवत बसलेला असणार असा माझा अंदाज आहे. कारण तो बराच वेळ तिथेच बसून होता. मधूनमधून उठून परत तिथेच येऊन बसत होता. त्याचा जोडीदारही कायम आसपासच होता.

stilt_1.jpg

stilt_2_0.jpg

शराटी किंवा कुदळ्या ( Ibis)

ibis_2_0.jpg

ibis_1_0.jpg
2

ibis_3_0.jpg

3 ( काळा शराटी)

पाणकावळा ( Cormorant)
cormorant_1_0.jpg

हा पक्षी पाण्यात चांगला पोहतो आणि आकाशात उंच उडतोही. या दोन्ही क्रियांसाठी लागणारे अनुक्रमे पसरट पाय आणि मजबूत पंख त्याला असतात. या प्रकाशचित्रात त्याची ही दोन्ही वैशिष्ट्ये दिसत आहेत.

cormorant_3_0_1.jpg


कपडे वाळत घालावेत तसे पंख वाळत घालून हा पक्षी खूप वेळा असा बसलेला दिसतो Happy

cormorant_2.JPG

खंड्या ( Kingfisher)
kingfisher_1_0.jpg

देवा, प्लीज, एक तरी मासा मिळू दे ! Happy

पक्ष्यांची मराठी आणि इंग्रजी नावे किरण पुरंदरे यांच्या '' पक्षी पाणथळीतले'' या पुस्तकातून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे सगळेच प्रचि सुंदर ! उडणारा पाणकावळ्याची पोझ लँडिंग साठी रेडी असलेल्या विमानासारखी ..पाय खाली करून लँड होणार तो आता Happy
आणि शेवटचा खंड्या पाणकावळ्याची नक्कल करतोय .. मी पण पंख वाळवणार !! Lol मस्तच क्लिक !!

सुंदर...

किल्ली, शाली, हर्पेन, दत्तात्रय साळुंके, किट्टू, अंजली, ॲमी, मनःपूर्वक धन्यवाद!!

मस्त फोटो वावे. तो चित्रबलाक दोन नंबरच्या फोटोत अगदी विचारशील दिसतो आहे. आणि पाणकावळा उडताना अगदी छान फोटो आलाय. उडत्या पाखरांची पिसं मोजणाऱ्या लोकांमध्ये आता तुमचा समावेश करायला हरकत नाही. :डोळे मिचकावणारी बाहुली.

उडत्या पाखरांची पिसं मोजणाऱ्या लोकांमध्ये आता तुमचा समावेश करायला हरकत नाही. Lol Lol
साक्षी, जाई, माधव, उर्मिला, रॉनी, मनापासून धन्यवाद!!

वावे.... मस्त फोटो!

पक्ष्यांचे फोटो काढणे सर्वात अवघड असते हे मी माझ्या काही फसलेल्या अनुभवांवरून ठामपणे सांगू शकतो.

पाणकावळा ( Cormorant) हां असाच एक पक्षी एका वीडियोमध्ये पाहिला होता जो जवळ जवळ फुटभर लांब मासा (ज्याला तोंडाकडे मिश्या होत्या लांब धाग्यासारख्या) आरामात गिळून हजम करतो. मला असे विचारायचे आहे की हे असे खरेच घडू शकते का ? कारण मासा जवळपास २ किलोचा वाटला जाडी वरुन आणि त्या पाण कावळ्याचा घसा मस्त सुजल्या सारखा दिसू लागला तो मासा गिळून झाल्यावर... करकोचा असे करताना पाहिले आहे पण ते शक्य सुद्धा वाटते कारण करकोचा आकाराने बराच मोठाही असतो. पण त्या वीडियो मधले दृश्य काही मनाला पटले नाही. काहीतरी ट्रिक फोटोग्राफी वाटली. त्या पक्ष्याच्या अश्या अजब करामतीबाबत काही माहिती असेल तर ऐकायला आवडेल.

स्वरूप, धन्यवाद Happy अवघड असते हे मीही अनेक फसलेल्या फोटोंच्या साक्षीने सांगू शकते.
वीक्ष्य, तुम्ही म्हणताय तो व्हिडिओ मी पाहिलेला नाही. पण पाणकावळ्यांबद्दल अत्यंत रोचक माहिती किरण पुरंदरेंच्या पुस्तकात आहे. ती अशी, की चीन आणि जपानमध्ये शेकडो वर्षांपासून कोंबड्या किंवा बदकांसारखे पाणकावळे पाळले जातात. कशासाठी, तर मासेमारीसाठी. पाणकावळ्यांचे पाय बांधून ठेवतात. गळ्याला सैलसर फास बांधतात आणि त्यांना पाण्यात सोडतात. पाणकावळे मासे पकडतात पण फास बांधल्यामुळे गिळू शकत नाहीत. असे भरपूर मासे गळ्यात साठले की मग त्यांना होडीत घेऊन मासे काढून घेतात आणि फास सैल करून 'बक्षीस'म्हणून थोडे मासे खाऊ घालतात.

स्वतः किरण पुरंदरेंनी असा एक माणूस पाहिला होता की जो संध्याकाळच्या वेळी झाडावर परतणाऱ्या पाणकावळ्यांच्या पोटावर बेचकीने दगड मारत असे. पोटावर दगड बसल्यावर पाणकावळे पोटातले मासे ओकून बाहेर काढत असत. असे बाहेर पडलेले मासे तो माणूस पिशवीत भरून घरी नेत असे.

असो. ऐकावं ते नवलच Happy

पाणकावळे पाळले जातात. कशासाठी, तर मासेमारीसाठी>>>>
मी असाच कोणत्यातरी आग्नेय आशियाई देशातील विडिओ बघितला. त्यात एक माकड झाडावरचे नारळ काढून द्यायला ट्रेन केलं होत. यासाठी लहानपणापासून बऱ्याच माकडांना शिकवायला सुरु करतात पण ज्या चारदोन जणांकडे जन्मजात हे कौशल्य दिसतं त्यांनाच पुढे अजून प्रशिक्षण दिल जात.याआधी या पिलांच्या पालकांना मारलं जात आधी बऱ्याचदा . पुढे माकडं त्यात थोडीजरी चुकली तरी त्यांना शिक्षा दिली जाते. मला आधी नवल वाटलं पण नंतर वाईट वाटलं त्या माकडाच. मुक्या जीवांचा असा तळतळाट घेऊन हे लोक नरकात(याच्या अस्तित्वाबद्दल माझी पूर्ण खात्री आहे) जाओ हीच परमेश्वरचरणी प्रार्थना
https://www.youtube.com/watch?v=XmBfK9XxboY

painted stork १,२
Kingfishe अप्रतिम़
खुप सुंदर प्रचि.

धन्यवाद Happy

जिद्दु, माणसासारखा क्रूर प्राणी दुसरा नाही हेच खरं Sad