सॅनिटरी नॅपकिन चॅलेंज

Submitted by रंगराव on 27 May, 2019 - 15:13

दहा पंधरा वर्षा अगोदरच्या सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती आठवतायेत का? काचेच्या बरणीतल्या निळ्या शाईत खडू बुडवताना दाखवायचे. . केवळ सुचकतेने मांडणी करुन निम्या लोकसंख्येच्या अपरिहार्य बाबी बद्दल अजुनही म्हणावं त्या खुलेपणानं बोलणं,वागणं होत नाही.

आपल्याकडे तर मासिक पाळी सारख्या किरकोळ शारिरीक घटनेला धार्मिक कोंदण जोडलय. इतरांचं तर दूर राहील, आम्हा डॉक्टरांमध्ये देखिल असलेला हा बडगा पदोपदी जाणवलाय! व्यक्तिगत बाब म्हणुन दुर्लक्षित केलं तरी जेव्हा आपणचं अजुनही मासिक पाळी दरम्यानच्या शिवाशिवीबद्दल ठाम भुमिका घेणार नसू तर समोर येणार्‍या रुग्णास काय समुपदेशन करु शकणार आहोत? अज्ञान, गैरसमज आरोग्यशिक्षणाने दूर होतिलही पण हा अंधश्रद्धांचा अन् चालिरितींचा पडदादेखिल फाडावाच लागणार आहे.

मागे आदिवासी आश्रमशाळातील शिक्षकांकरीता प्रशिक्षकांचे प्रशिक्षण घेत असताना एका सत्रादरम्यान मासिक पाळीविषयी बोलताना, पुरुष प्रशिक्षकांना सहज विचारलं की "तुमची आई, बहीण, पत्नी वापरत असलेल्या सॅनिटरी नॅपकिनचा ब्रांड कोणता आहे?" वर्गभर सन्नाटा छा गया. शेजारच्या टेबलवरचं डेमो करिता आणलेला सॅनिटरी नॅपकिनचा पुडा हाताळायला त्यांच्याकडे सरकवला. ४०प्रशिक्षकांकडुन फिरुन जसाच्या तसा पुडा परत आला. एकानेही पुडा फोडुन नॅपकिन हाताळायची हिम्मत दाखवली नाही. .

२८ मे 'वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजिन डे'
सर्व पुरुष मित्रांनो! माझं चॅलेंज स्विकारालं?
मागच्याच महिन्यात बोटं काळं केलेला जसा एक सेल्फी अपलोडवला तसाच आजही सोशल मिडियावर तुमचा एक सेल्फी सॅनिटरी नॅपकिन, सॅनिटरी कप सोबतचा . . .

चला मासिक पाळी बद्दलची अळीमिळी गुपचिळी मोडुयात .

(सॅनिटरी नॅपकिन हा काही एकमेव व सर्वोत्तम पर्याय नाही. निसर्गपुरक सस्टेनेबल मेन्स्ट्रुएशन बद्दल सविस्तर बोलायचंच आहे, पण पुन्हा कधीतरी )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असलेल्या सॅनिटरी नॅपकिनचा ब्रांड कोणता आहे?" ही आणि सेल्फी वगैरे बाब मलाही पटली नव्हती.ती बाब वगळता लेख चांगला आहे.

ubmitted by आ.रा.रा. on 29 May, 2019 - 23:06>>>>>> फार धक्कादायक आहे हे.

आ.रा.रा., माझ्याही मनात पहिल्यांदा कष्टकरी वर्गातल्या बायकाच आल्या. पण आकडेवारी माहीत नाही म्हणून काही लिहिलं नाही.>>>> मुख्यत: शेतमजुर
स्वतः शिवाशिव, देवाला विटाळ ह्या गोष्टी मानत नाही आणि मुलीलाही तसंच सांगितलंय.
घरीही तशी काही बंधनं नाहीयेत. पण हे माझ्या घरचं आहे. >>>>>> माझ्याही
अशी अनेक घरं/कुटुंब असतील जिथे बाईला बाजुला बसावं लागतं. सॅपॅ परवडत नाही किंवा गरजेचं वाटत नाही.
वरदाच्या पोस्टला +१

इथे भारतीय प्रदूषण नियंत्रण समितीने तयार केलेले सॅनिटरी कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे तपशीलवार नियम, गाईडलाईन्स व धोरणे आहेत. कुठल्या फंड्समधून कायकाय करता येईल इत्यादिही लिहिलेलं दिसलं. मी अजून वरवर चाळलं आहे. पण एकूणच सरकारी पातळीवर निदान धोरणाच्या दृष्टीने तरी दखल घेतलेली दिसत आहे हे अभिनंदनीय आहे. आधीच्या सरकारी धोरणांमध्येही असेल कदाचित मला माहित नाहीये तेव्हा राजकारणी फाटे फोडायचे नाहीयेत. प्रश्न नेहेमीप्रमाणेच अंमलबजावणीचा आहे. अर्थातच ज्यांच्यासाठी आखलेली आहेत त्यांच्यापर्यंत ही धोरणे बहुतांशी पोचायचे मार्ग नसणारच. प्रत्येक पंचायतीत, गावात - चावडीवर, शाळेत याचे स्थानिक भाषेत भाषांतर करून नियम लावले तर थोडाफार तरी उपयोग व्हावा वाटते आहे.
तसेच या पॅड्स आणि डायपरच्या उत्पादकांवर याच्या विल्हेवाटीची जबाबदारी घेण्याचा सिंहाचा वाटा आहे असेही प्रथमदर्शेनी दिसतेय. या सगळ्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी दबावगटांची नितांत गरज आहे. आणि त्यात आपण बव्हंशी पिरॅमिडच्या वरच्या स्तरातील लोकांनीही भाग घेतला पाहिजे. पॅड्सवरचा टॅक्स काढून टाका म्हणून खूप ओरडून झालं (हा टॅक्स कायमच होता पण सोशल मीडियाला अचानक दोनेक वर्षांपूर्वी जाग आली) पण कागदोपत्री असलेल्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी फारसं कुणी काही करताना ऐकिवात आलेलं नाही. यावर कुठल्या एनजीओज काम करत असतील तर माहित नाही (माबुदोस)
http://cpcb.nic.in/uploads/plasticwaste/Final_Sanitary_Waste_Guidelines_...

हो, धागा वाहता झालेला दिसतो आहे. कदाचित त्यामुळे कुणाला सेल्फी टाकणे जरा कंफर्टेबल वाटेल.
सेल्फीने काहीही फरक पडत नसता तर काय हरकत आहे एखादी सेल्फी टाकायला? सेल्फी आंतर्जालावर टाकणे धोक्याचे वाटत असेल तर किमान विषयानुरूप एखादा फोटो. पण एकूणच ह्या विषयावर बोलणे/फोटो घेणे यात एक प्रकारचे अवघडलेपण आहे. ते दूर होणे असा धाग्याचा (मला समजलेला) मूळ उद्देश. धागा वाहता केला ते योग्यच वाटते.

मुळात कापडामुळे होणारे त्रास हे सॅप पेक्षा खूप जास्त आहेत. खेड्यांमध्ये च नाही पण शहरात सुध्दा अजूनही मुली / बायका स्वतः मेडिकल मध्ये जाऊन sanitary napkin मागायला लाजतात. आणि जिथे स्त्रिया स्वतः लाजताय तिथे पुरुष लोकांबद्दल बोलायलाच नको. मुळात हा अतिशय नाजूक विषय आहे. प्रबोधनाची प्रचंड गरज असलेला.
अगदी शाळेत मुलींना वेगळं नेऊन सांगितलं जातं आणि इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गात "ते" धडे मुद्दाम वागळे जातात (बऱ्याचदा शाळा फक्त मुलींची असली तरी देखील)
आता येऊयात लेखा कडे, सेल्फी टाकून काही होणार जरी नसले तरी कमीत कमी जी "लाज" सर्वांना वाटते ह्या विषयावर बोलायची ती जरा जाईल

वरचे प्रतिसाद कु णाला उ द्देशून आहेत माहित नाही. त्या आधीचे सगळे प्रतिसाद वाहून गेलेले दिसता त.
मला असतील तर मी जे स्वतः साठी आणि माझ्या बाळासाठी क रणार आहे (रियुजेबल पॅड स आणि डायपरस) तेच लिहिले आहे आणि पर्यावरण आणि नॉट वॉटिंग टॉक्सिसिटी ओवर कन्विनियन्स ही त्याची प्रामाणिक कारण आहेत. हे बर्‍याच गोष्टींमधे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाच पाहि जे असं माझं मत आहे आ णि माझ्या रोजच्या जगण्यात मी ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करते.
हे वर लिहिलेले मला उद्देशून नसेल असे मी गृहीत धरले तरी दुसर्‍या साईडनेही माण से जजमेंटल होतायतच आणि त्यांना आपण जजमेंटल झालेले दिसत नाहिये ह्याचे आश्चर्य वाटतेय. Happy

स्वच्छता कामगारांच्या बरोबर त्यांना येणारे पॅडस आणि डायपर चे अनुभव ह्या विषयावरही बोलून बघा.
बायकांना सोपे झाले अ‍ॅट द कॉ स्ट ऑफ हूम ऑल?
सफाई कामगार, नि सर्ग आणि आपल्याच मुलाबाळांचे भविष्य!

जर डिस्पोजल आणि सफाई कामगाराना होणारा त्रास हा एड्युकेशन अँड ट्रेनिंग चा भाग वाटत असे ल तर कापडी पॅडस ची स्वच्छ ता हा ही एड्युकेशन अँड ट्रेनिंगचाच भाग आहे.

जर डिस्पोजल आणि सफाई कामगाराना होणारा त्रास हा एड्युकेशन अँड ट्रेनिंग चा भाग वाटत असे ल >> असं कोण म्हणलं? माझा कुठला प्रतिसाद नजरेतून सुटला का वाचायचा? Uhoh

फरक आहे, पण कुणाला वाटत असेल/ आहे असं मला कुणाच्या प्रतिसादावरूनही वाटलं नाही म्हणून विचारलं.
आणि सॅपॅची योग्य विल्हेवाट लावण्याची उपाययोजना तातडीने करायला हवी आहे हे मान्यच आहे. सफाईकामगारांनी ते चिवडावे असं कुणालाच वाटणार नाही.
सॅपॅसाठी ची विशिष्ट डिस्पोजल बिन्स काही कंपन्या भारतात विकतात, दर महिन्याला मेन्टेन करतात. उदा: पीसीआय. दुर्दैवाने अशा व्यवस्थांचा सर्वदूर स्वीकार/प्रचार होत नाही. निदान ज्यांना परवडते त्यांनी आपापल्या गृहनिर्माण संस्था, ऑफिसेस इथे लावायला हरकत नाही. शेअर्ड कॉस्ट्स परवडण्यासारख्या असणार. मी माझ्या आधीच्या वर्कप्लेसमध्ये हा प्रयत्न केला होता पण सरकारी प्रोसेसमध्ये फारसं काही निष्पन्न झालं नाही.

सफाई कामगारांना सफाई करायला त्रास होतो म्हणून सॅपॅ आणि डायपर वापरू नका असं म्हणताय का? >> Happy जास्त खुलासे विचाराल तर ४-५ भांडे पाणी, वृक्ष विथ अ डहाळी, आणि त्यावर वेताळासारखा लटकलेला सफाई कामगार अशा कल्पनांचा बोजा समस्त महिलावर्गावर पडेल. सबब सबुरीची विनंती... Happy

मूळ विषय सॅनॅ संबंधित अज्ञान/ अवघडलेपण इ बद्दल अजून मते कळून घ्यायला आवडेल.

सफाई कामगारांना सफाई करायला त्रास होतो म्हणून सॅपॅ आणि डायपर वापरू नका असं म्हणताय का?>> सफाई कामगारांचे हाल आणि त्यांना सहन करावी लागणारी कुचंबणा हा एक मोठा विषय आहेच.
ज्या प्रमाणात आपल्याकडे डिस्पोजेबल वस्तूंचा वापर वाढला त्या प्रमाणात सफाई यंत्रणा निर्माण झाली नाही हे खरं आहे

सफाई कामारांच्या मनाचा आणि शरीराचा विचार ही एक प्रचंड वेगळी समस्या आहे... आणि sanitary napkin हे त्यात भर पडतात हे मान्यच .. पण disposal of sanitary napkin and diaper ह्यात अजून एक मुद्दा म्हणजे इतर काही जनावर, जे उकिरड्यावर जाऊन ह्या वस्तू उचाकटतात... आणि बरेच प्राणी तर त्यातल्या आतून काही खाण्याचा देखील प्रयत्न करतात... त्यांचा विचार करणं हे काम कोणाचं??
मुळात मार्केट मध्ये बरेच इतर पर्याय उलब्ध आहेत पण योग्य अश्या माहितीची गरज आहे