Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 15 May, 2019 - 11:39
दत्त चित्ताचा अंकुर
************
आला मायेला भेदून
दत्त चित्ताचा अंकुर
खोल जीवात दडली
आस प्रकाश आतूर ॥
मोक्ष वसंता चाहुल
दत्त मनाचा मोहर
भक्ती रसात ओघळे
गंध मदिर सुंदर ॥
दत्त जाणिवेचे फुल
येई हळू उमलून
माझे पणात आलेला
मज मी पणा कळून ॥
नाम गंधात भिजली
दत्त वायूची लहर
माझ्या चित्तात वसली
प्रभू प्रेमाचीच कोर ॥
तृष्णा तापल्या जीवास
दत्त मृगाचा पाऊस
तया एकरूप होता
सरे जीवनाची हौस ॥
दत्त दिसतो जनात
दत्त फिरतो वनात
दत्त कृपाळू केवळ
सदा विक्रांत मनात
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आहा हा! खुप सुरेख!
आहा हा! खुप सुरेख!
दत्त जाणिवेचे फुल
दत्त जाणिवेचे फुल
येई हळू उमलून
फोल मीपणा आघवा
जाई संपूर्ण गळून ॥
....... मी असे वाचले !
कविता सुरेखच.....
____/\____
शाली धन्यवाद
शाली धन्यवाद
शशांक हे ही फार छान वाटते
सुरेख!
सुरेख!
तुमच्या लिखाणात नेहमी ध्यानमग्नता जाणवते.
अश्विनी के. खूप धन्यवाद
अश्विनी के. खूप धन्यवाद