आभाळमाया..।
सात पावलं सोबत चालून
ती तुमची होते
तुमच्या संसार वेलीवर
फुलं फुलवीत रहांते..
एव्हढं सर्व तुम्ही
सोईस्करपणें विसरतां
सदा सर्वकाळी तिच्यावर
विनोद करत रहतां
रोज गरमागरम जेवण
तिनेच खावू घालावे
दिवसभर राबूनही पुन्हां
हसून स्वागत करावे
मोलकरीण सारखं तिने
दिवसभर खपावं
आणि तिच्या विनोदांवर
तुम्ही हसत बसांव..?
तुमच्याच मुलांचं ती
पालन पोषण करते
शिक्षण वर्तन संस्काराची
तीच शिदोरी बांधते
तुम्ही मात्र दिवसभर
चकाट्या मारत फिरता
तिच्यावरच्या विनोदाचं
चर्वण करत बसता
तुमच्या आईवडीलांची
तीच करते सेवा
आजारपणांत सर्वांना
तिनेच द्यावी दवा
सर्व तिनेच करावं
अशी तिच्याकडून अपेक्षा
टिंगलटवाळीने तिची
का करावी उपेक्षा ?
तुमच्या कार्य कर्तुत्वाचा
तिलाच असतो गर्व
तुमच्या घरअंगणांत
ती उभा करते स्वर्ग
माहीत असूनही तुम्ही
तिलाच पुन्हां हसता
तुमच्याच मी पणांला
तुम्ही गोंजारत बसता
ती नसते फक्त पत्नी
असते कुणांची ताई
मुलगी असते कुणाची
तर कुणांची आई
एव्हढ्या भुमीकेतही ती
कधीच चुकत नसते
सर्व परिवाराची ती
आभाळमाया असते
ती अाहे लक्ष्मी
तीच सरस्वती
तुमच्या संसारातील
तीच आहे बृहस्पती
एव्हढी तिची थोरवी
आता तरी जाणां
विनोद करणें सोडून
उपकार तिचे मानां..।
..... टी.जे.पाटील
सुंदर
सुंदर
Chan
Chan