Submitted by हिज हायनेस on 18 April, 2019 - 04:49
मित्रांनो माझं आवडीचं पेय दारू हे आहे. मला दारुची आवड का लागली हे नक्की माहित नाही. पण तिच्या वाचून करमतही नाही. तर मला सांगा दारू का प्यावी. नक्की कारण काय असावे दारू प्यावीशी वाटण्याचे?
आता जे घेत नाहीत व ज्यांना दारु आवडत नाही त्यांनी इकडे नाही आलं तरी चालेल पण दारु वाईट आहे हे सांगून पिडू नका प्लीझ...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दारू प्यायची relax होण्यासाठी
दारू प्यायची relax होण्यासाठी
काही वेळ सर्व चिंता दूर होतात
>> ज्या गोष्टी मानवाला खूप
>> ज्या गोष्टी मानवाला खूप आवडतात नेमक्या त्याच आरोग्यास हानिकारक का असतात
अशा गोष्टी बहुतांशी मानव निर्मित असतात, आवडण्यासाठीच बनवलेल्या (लोकांनी खरेदी करावी म्हणून). अन्यथा नैसर्गिक फळे/भाज्या ज्या धोकादायक आहेत त्यांची चव निसर्गतःच रिजेक्ट केली जाते. आपण ते खातही नाही. (हे कुठेतरी वाचलेले पटकन आठवले ते लिहिले. डीबेटेबल असू शकते)
बरोबर अतुल जी. दारू इतिहास
बरोबर अतुल जी. दारू इतिहास काळापासून आहे. किती व कधी प्यावी हे न कळल्यामुळे काही लोकांनी तिला बदनाम केले आहे. दारू= गटारात लोळणारे लोक. असा समज झालेला आहे. अर्थात काही तामसी पदार्थ आरोग्यास अपायकारक आहेत, पण सर्व मानव जातीला ते आवडत नाहीत. अशा गोष्टींचा एक खास चाहतावर्ग आहे. मात्र ड्रग्ज खरोखरच वैयक्तिक, सामाजिक आरोग्याला हानिकारक आहे.
दारू पिऊन राजकारणावर फार छान
दारू पिऊन राजकारणावर फार छान चर्चा करता येते. सोबत चकना भरपूर हवा मात्र.
दारू पिल्यामुळं मला
दारू पिल्यामुळं मला हायपोक्राइट का हिपोक्राइट माणसं लगेच ओळखू येतात. त्यांना वाटतं मी नशेत आहे, पण ते इकडे काय बोलतात व तिकडे काय वागतात हे माझ्या लक्षात लगेच येतं. मग म्हणतात दारू पिऊन मेंदू विकृत झालाय याचा.
"दारू का प्यावी? मित्रांनो
"दारू का प्यावी? मित्रांनो माझं आवडीचं पेय दारू हे आहे. मला दारुची आवड का लागली हे नक्की माहित नाही. पण तिच्या वाचून करमतही नाही. "
=> अहो तुमच्या प्रश्नाचे तुम्हीच उत्तर दिले आहे. आवडते म्हणून प्यावी. का आवड लागली हे पण सांगितले आहे तुम्ही (नक्की माहित नाही. आणि ते तसेच असते बहुतंशी). ज्यांना आवडत नाहीत ते पीत नाहीत. आता काय चर्चा करणार अजून?
लै गोलमाल करुन रायलेय तूमी तं
लै गोलमाल करुन रायलेय तूमी तं. का आवडते हे नक्की माहित नाही मनलंय म्या राव.
अच्छा म्हणजे का आवडते याच्या
अच्छा म्हणजे का आवडते याच्या शोधात आहात तर.
लोक कोजागिरीला दुध का पितात? सुट्टी असली कि सहकुटुंब सहलीला का जातात? कारण तेवढाच आनंद मिळतो. नेहमीच्या जीवनात चार सुखाचे क्षण. मद्याचे पण तसेच आहे. पाश्चात्य देशात रोज घेतात. पण आपल्याकडे काही कमकुवत मनाच्या लोकांना सहन न झाल्याने ते गटारात लोळले व दारू नाहक बदनाम झाली. दारू हे पेय कमकुवत मनाच्या लोकांसाठी नाही. आवडले तरी त्यांनी ते पिऊ नये. पचनसंस्था दुबळी असेल तर कोजागिरीला आटवलेले दुध पिऊ नये (उगाच दुधाला बदनाम करण्यात काय हशील?) तद्वत:च मन दुबळे असेल तर दारू पिऊ नये. पचली नाही तर भेलकांडत शिव्या घालणे गटारात लोळणे म्हणजे मन दुबळे असणे. दारूला बदनाम कशाला करता. दारू शरीरापेक्षा मनात जास्त उतरते. मनाला पचली तर मस्त आनंद मिळतो. साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
सत्यनारायण पुजा सांगायला या.
सत्यनारायण पुजा सांगायला या. पण न पिता बरंका. दक्षिणा म्हणून भारीतली दारू देईन. कृहघ्या.
Answer: At first its dopamine
Answer: At first its dopamine rush and then its learned memory of associated pleasure.
Though brain soon adjust dopamine release and controls it but memories stay forever. So you keep drinking for no reason.
Answer: At first its dopamine
Answer: At first its dopamine rush and then its learned memory of associated pleasure.
Though brain soon adjust dopamine release and controls it but memories stay forever. So you keep drinking for no reason
कृपया मराठीत सोरी मायबोलीत इस्कटून सांगता का.
Pages