दारू का प्यावी?

Submitted by हिज हायनेस on 18 April, 2019 - 04:49

मित्रांनो माझं आवडीचं पेय दारू हे आहे. मला दारुची आवड का लागली हे नक्की माहित नाही. पण तिच्या वाचून करमतही नाही. तर मला सांगा दारू का प्यावी. नक्की कारण काय असावे दारू प्यावीशी वाटण्याचे?
आता जे घेत नाहीत व ज्यांना दारु आवडत नाही त्यांनी इकडे नाही आलं तरी चालेल पण दारु वाईट आहे हे सांगून पिडू नका प्लीझ...

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पण तिच्या वाचून करमतही नाही. तर मला सांगा दारू का प्यावी. नक्की कारण काय असावे दारू प्यावीशी वाटण्याचे?>>

आदल्या दिवशी पिलेल्या दारूचे withdrawal symptoms थांबवण्याचे दोन उपाय आहेत.
१. withdrawal symptoms काही दिवस सहन करणे - साधारणपणे ५- ६ दिवस. मग ते कायमचे बंद होतात.

२. आज पिऊन withdrawal symptoms तात्पुरते थांबवणे, आणि उद्यावर ढकलणे.

यातील दुसरा मार्ग सोपा आहे. कालच्या दारूमुळे निर्माण झालेली withdrawal symptoms ची उद्विग्नता (तात्पुरती) थांबवण्यासाठी आपल्याला आज दारू प्यावीशी वाटते आणि आपण पितो.

अर्थात या स्टेजला आपण हळूहळू पोचतो.

पटलं मानव भाऊ. पण दारुमुळे विमान ☁️ ☁️ गेल्यावर जाम भारी वाटतं.‌ कुणाला तिरकस, लागंल असे बोललं तरी धकून जाते पण लय काय भी नाय बोलायचं नही तर विमानाचं क्रॅश लॅंडिंग होईल.

चार पाचशे खर्च करायला काय हरकत आहे. ऐंशी पंच्यांशी हजार पगार मिळतो तो कशासाठी आहे. अमेरीकन लोक कमावलेल्या पैशापैकी साठ सत्तर टक्के स्वत:वर खर्च करतात. बायको वर नाही.

मटण, मटण बिर्याणी, चिकन बिर्याणी पचवायची म्हणजे रम, व्हिस्की हवीच. एकेकाळी ओसी, एफसी शिवाय बाकी काही चालायचं नाही.

नाही
तीची चव कशी असते हे देखिल माहीत नाही.

चांगली असते राव! आरोग्यासाठी थोडी घ्यावी, असे ऐकले आहे..!
प्रत्येक प्रकार चाखून बघावा
पण बेवडे होऊ नये
गटारात लोळू नये

पण कोण पिऊनच देत नाही..!

पण कोण पिऊनच देत नाही..!
> लांबून लाळ कशाला गाळायची. बिनधास्त घ्यायची. डेरिंग असणारा माणूस सुंदर मुलीशी लग्न करतो. बाकी राहतात झुरत.

पण कोण पिऊनच देत नाही..!
>>> फुकट प्यायला कोण देतंय याची वाट बघताय का?
स्वतः घ्यायची आणि प्यायची, कोणाला सांगायचे, विचारायचे कशाला.
स्कॉच घेऊन बघा, अप्रतिम आनंद देते.

पण स्कॉच फार महाग असते ना. मागे दारू कशी प्यावी हे वाचलेले आठवलं. तिकडे सांगितलेलं की महागाची दारु हा भ्रम आहे. दारू ही दारू असते. कमी जास्त डायल्युट केलेली.

पिऊन बघायची आहे हो.
पण पिऊन झाल्यावर मी काय करणार काय बोलणार याचीच जास्त भिती वाटते.

मला तर वेगळाच प्रश्न पडतो ज्या गोष्टी मानवाला खूप आवडतात नेमक्या त्याच आरोग्यास हानिकारक का असतात

एक इंजेक्शन आणायचं त्यात दारू भरायची आणि कोलंबी, चिकन मटण फ्राय करायच्या आधी त्यात दारू इंजेक्त करायची, एक नंबर चव लागते.

बोकलत,Gordon Ramsay नी अशाच प्रकारची रेसिपी केली होती बहुतेक.एकदा tvवर पाहिली होती.

फारेनची लोकं वरुन दारू ओततात शिजवताना, असा मोठा जाळ होतो. दारू जळून वाया घालवतात लेकाचे. पण तिकडे दारू पाण्यासारखी वहात असते म्हणा.

मला तर वेगळाच प्रश्न पडतो ज्या गोष्टी मानवाला खूप आवडतात नेमक्या त्याच आरोग्यास हानिकारक का असतात
>> राजेश तुम्ही दारु का पिता.

Pages