Submitted by हिज हायनेस on 16 April, 2019 - 06:48
घसरुन पाय पडलास जरी उताणा
म्हणशी तरी पाय आहेत वरी पहाना.
आहेस कसा नि किती तू निलाजरा
ठेवतोस कसा बनेल चेहरा तू हासरा
लागता आच थोडी उडाला सोनेरी मुलामा
पडले उघडे पितळ खोटे भंगली लालिमा
आणून आव खोटा सावरु पाही प्रतिमा
हरलास तू पसरली प्रतिमेवर तव काळिमा
हद्द ही निर्लज्जपणाची हे का कुणा कळेना
मिळण्या सहानुभूती जनांची कशास करीसी वल्गना
सत्य असत्य तुझे तुजपाशी आहे तुज सारी कल्पना
होऊनही मुखभंग तरी ठेविशी चेहरा तो हासरा
मानलं तुला खरोखरी दिसला तुझा खरा तो चेहरा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वास्तववादी जबरदस्त कविता..!
वास्तववादी जबरदस्त कविता..! आयुष्यात अशी अनेक माणसे भेटली...
धन्यवाद रत्न.
धन्यवाद रत्न.
अप्रतिम कविता. पु ढील
अप्रतिम कविता. पु ढील कवितेच्या प्रतीक्षेत.
धन्यवाद अमा.
धन्यवाद अमा.
फार छान
फार छान
धन्यवाद रोहिणी. तुम्हाला खरेच
धन्यवाद रोहिणी. तुम्हाला खरेच पटली का माझी कविता. मला अजून कविता करता येत नाही. उगाच जोडजाड करतो शब्दांची.
प्रतिसाद देण्यासाठी सर्वांचे
प्रतिसाद देण्यासाठी सर्वांचे आभार. कविता करणं खूप कठीण काम आहे. हे लक्षात आले आहे.
आजारी मित्राला समर्पित कविता
आजारी मित्राला समर्पित कविता आहे ही. मित्रा गेट वेल सून. तूझी खत वाटली. म्हणून लिहिली आहे. घरच्यांना व बाकी लोकांना माझा नमस्कार आवर्जून कळव.
जमलीये कविता.
जमलीये कविता.
आजारी मित्राला समर्पित कविता आहे ही.> >>>>> आजारी मित्राला उताणा पडलास तरी पाय वर आहेत असं म्हणतोस .. असं का लिहिलं असेल?
मला वाटलं मोदींबद्दल लिहिलंय
पडल्यानं मुका मार लागला आहे,
पडल्यानं मुका मार लागला आहे, उपचार घेत आहे. देवाचे नाव घेतोय बिचारा.
मोदी फोबिया तुम्हाला झालाय
मोदी फोबिया तुम्हाला झालाय वाटतं.
ती विबासं ची चोवीस प्रकर्णे
ती विबासं ची चोवीस प्रकर्णे बेफींनी लिहिलीत ती सापडली का?
जबरदस्त एक नंबर...
जबरदस्त एक नंबर...
धन्यवाद बोकलत दादा. अमा२ धागा
धन्यवाद बोकलत दादा. अमा२ धागा बंद पडायलाय तुमच्या विना.
थुंकून चाटणाऱ्या लोकांची आठवण
थुंकून चाटणाऱ्या लोकांची आठवण आली वाचताना.
कोणत्याही अज्ञात मित्राला
कोणत्याही अज्ञात मित्राला लागू पडणारा आशय दडलाय कवितेत.
हिज हायनेस, राजे १०७ हे माझेच
हिज हायनेस, राजे १०७ हे माझेच आयडी होते.
छान. मला तर दुसऱ्या एखाद्या
छान. मला तर दुसऱ्या एखाद्या डु. आय.डी. ला उद्देशून केलेली कविता वाटली.
मित्राला उद्देशून केलेली ही कविता वाचून Bob Dylan चे Positivly 4th Street हे गाणे आठवले.
पडले उघडे पितळ खोटे भंगली
पडले उघडे पितळ खोटे भंगली लालिमा
आणून आव खोटा सावरु पाही प्रतिमा>> +७८६
यकदम कडडक आणि सत्य कविता
धन्यवाद उबो. धन्यवाद भिकाजी.
धन्यवाद उबो. धन्यवाद भिकाजी.
नाही जमली , प्रत्येक ओळीत
नाही जमली , प्रत्येक ओळीत यमकच पाहिजे हा हट्ट सोडा , थोड अर्थपुर्ण आणि तरल होऊ द्या ( स्पष्ट मत देतो आहे , कृपया हलके घ्या )