Submitted by मेधा on 1 April, 2019 - 12:56
कागदोपत्री इथला स्प्रिंग सुरु झाला म्हणे. गार्डन सेंटर्स मधे बियांची पाकिटे, अंगणातल्या गवतासाठी वीड & फीड ची पोती , माती, कॉम्पोस्ट , सीड स्टार्टिंग मिक्स यांच्या बॅगा दिसायला लागल्या. फोर्सिथिया, मॅग्नोलिया, चेरी ब्लॉसम यांच्या फांद्या टपोर्या कळ्यांनी डवरल्या आहेत. क्रोकस , हायासिंथ, डॅफोडिल्स बहरले आहेत. बर्फाच्छादित रस्ते आणि अंगण काही काळा करता विसरायला हरकत नाही ( बहुतेक) .
इथल्या मंडळींचे बागकामाचे काय बेत यावर्षी ? विंटर सोइंग केलं का कोणी ? अर्ली स्प्रिंग व्हरायटीज काय काय लावणार ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आम्ही पामर भारताच्या खेड्यात
आम्ही पामर भारताच्या खेड्यात राहतो . दारापुढे झेंडू, गुलाब, सदाफुली परसात अळू, एखादे केळीचं झाड, कडीपत्ता येवढीच अस्त्यात इकडं.
पण तुम्ही छान भाज्या फुलझाडे लावा. चांगली बहरली की फोटो टाका नावासकट. खूप खूप शुभेच्छा.
दारापुढे झेंडू, गुलाब,
दारापुढे झेंडू, गुलाब, सदाफुली परसात अळू, एखादे केळीचं झाड, कडीपत्ता येवढीच अस्त्यात इकडं. >> आम्हाला कढीपत्त्याचं रोप मिळवणे आणि इथल्या थंडीत ते जगवणे या करता किती दिव्य करावं लागतं त्या साठी याच भागातला धागा वाचा
अंबाडी, मायाळू, दोडका, दुधी, कारली, टॉमेटो, वांगी, भेंडी यांच्या बिया पेरल्यात शनवारी. काल नॅस्टर्शियम, आणि पॉपी .
मागच्या आठवड्यात साल्विया, कॉस्मॉस, झेंडू आणि थाय बेसिल या बिया ओल्या पेपर टॉवेल मधे ठेवल्या होत्या. पैकी साल्विया आणी कॉस्मॉस ला मस्त दोन दोन पानं फुटली आहेत. ते सर्व आता सीड स्टार्टिंग मिक्स मधे लावले आहे.
धन्यवाद. तिकडे रेडिमेड
धन्यवाद. तिकडे रेडिमेड रोपांची नर्सरी नसते का . इकडे आता नर्सरी मधून रोपे आणणं कॉमन झालंय.
भाज्यांच्या बिया बाहेरच
भाज्यांच्या बिया बाहेरच लावल्या की स्टार्टर किट?
सिंडे , सगळ्या बिया घरातच
सिंडे , सगळ्या बिया घरातच अजून तरी. रोपं तयार झाली मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात बाहेर लावेन.
शशिराम - भरपूर नर्सरीज आहेत. मोठाल्या हार्डवेअर दुकानांमधून झाडं , रोपं विकायला असतात. ग्रोसरी स्टोअरमधे झाडं विकतात. ऑनलाइन मागवता येतात. पण स्वत: बियांपासून सुरु करुन रोपं वाढवायची हौस. वर लिहिलेले सर्व प्रकार इथे अॅन्युअल्स प्रकारात येतात. दर वर्षी बिया / छोटी रोपे आणून लावावी लागतात.
धन्यवाद.
धन्यवाद.
माझे कुंडीत लावलेले
माझे कुंडीत लावलेले ट्युलीप्स बाहेर काढलेत मी मागच्या आठवड्यात आणि ते हिरव्याचे गुलाबी झालेत एका दिवसात. कॉस्टकोतून आण्लेत कंद मागच्या फॉल मध्ये आणि त्यांनी दिलेल्या सगळ्या सुचना पाळल्यात. मी ते सगळे लगेच घरात आण्लेत आणि ते नीट वाढतात आहेत आता. पण पुन्हा बाहेर केव्हा न्यायचे ते कळत नाही आहे. कोणाला काही कल्पना आहे का?
मी झोन ६अ मध्ये आहे.
ट्युलिप्स आणि डॅफोडिल्सना
ट्युलिप्स आणि डॅफोडिल्सना फुलायला थंडी लागते. कंद सप्टेंबर अखेरीस , ओ़क्टॉबरच्या सुरुवातीला जमिनीत पुरावेत. कुंडीत असले तर कुंडी देखील अनहीटेड जागी ठेवावी. गराजमधे ठेवली तर माती पूर्ण सुकु देऊ नये.
आमच्या इथले लोक म्हणतात की कुंडी सुद्धा अंगणात मातीत अर्धी पुरावी. बर्फ / पाउस याचे पाणी मिळत रहाते. नुसती कुंडी अंगणात जमिनीवर ठेवली तर शून्याखाली टेम्परेचर फार गेले तर कंद पूर्ण गोठून जातील. मार्चच्या पहिल्या आठवड्यात कुंडी बालकनीत , पॅटिओवर ठेवायला हरकत नाही.
यावर्षी हे नविन घर आहे
हे मागविल. ह्यात हर्ब्ज लावलेत. जॅस्मिन , गुलाब गराजच्या कोपर्यावर पाईप्स आहेत तिथे लावेन. झेंडू सीड्स ऑफ इंडीया वरून परत बीया मागवेन. आणि तुळस लावेन.
ही खालची सिस्टीम ,मागवायचा विचार होता. पण प्रचंड महाग आहे. पण काम्पोस्टींग , सेल्फ फीडींग सीस्टीम आहे. त्यामुळ प्राईस योग्य असावी.
मेधा... अंबाडी च्या बिया
मेधा... अंबाडी च्या बिया कुठुन मिळवतेस? साल्विया चा हर्ब म्हणुन वापर केला जातो का?
सीमा मीपण हे 5-Tier Stackable Planter बघितलेय. पण मागच्या बाजुच्या झाडांना ऊन मिळणार नाही/उन्हासाठी गोल फिरवावे लागेल असे वाटल्याने घेतले नाही.
केशर , सीड्स ऑफ इंडिया
केशर , सीड्स ऑफ इंडिया नावाची साइट आहे. तिथे अंबाडी, मायाळू , दुधी, वगैरेच्या बिया मिळतात.
साल्विया फुलांसाठी आणि मधमाशा व इतर परागीभवन करणार्या कीटकांसाठी
सीमा , स्टॅकिंग प्लांटर कसं काय वाटलं ते लिहिशीलच - कुठले कुठले हर्ब्ज लावलेस ?
माझ्या कडे सीमाने दाखवले आहे
माझ्या कडे सीमाने दाखवले आहे तसे ३ थराचे प्लांटर आहे. मी त्यात गेल्यावर्षी चार्ड लावला होता.
मंडळी,
मंडळी,
मोनार्क जॉइंट वेंचरतर्फे २०१९ साठीचा कॉनझर्वेशन इंप्लीमेंटेशन प्लॅन जाहीर झाला आहे. खाली दिलेल्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येइल.
https://monarchjointventure.org/news-events/news/mjv-releases-the-2019-m...
त्यांच्याच संकेतस्थळावर शैक्षणिक वापरासाठी मोफत इतर हँडआउट्सही उपलब्ध आहेत. मोनार्क संवर्धनात सहभागी होणार असल्यास किंवा बटरफ्लाय/पॉलिनेटर बाग करणार असल्यास जरुर लाभ घ्यावा.
https://www.amazon.com
https://www.amazon.com/Sustainable-Seed-Company-Variety-Variety-100/dp/B...
हर्ब चा हा पॅक लावला आहे.
धन्यवाद मेधा ! साल्विया
धन्यवाद मेधा ! साल्विया फुलांसाठी आणि मधमाशा व इतर परागीभवन करणार्या कीटकांसाठी >>
छानच. मला ही साईट खुप आवडलेली.
स्वाती२ .... गेल्यावर्षी भारतात एका फुलपाखराचे बाळंतपण (कडीपत्त्याच्या झाडावर)करायला मिळाले होते. यावर्षी बटरफ्लाय/पॉलिनेटर बाग करायची आहे. हा व्हिडीओ बघुन खुप शिकायला मिळाले.
छान. धागा बहरतोय.
छान. धागा बहरतोय.
या घरात राह्यला आल्यापासून
या घरात राह्यला आल्यापासून भाज्या लावण्याआधी कुंपण बनवून घ्यायचे होते. ते काम मागच्या वीकेंडला झाले एकदाचे. वाटाणे , मुळा, चार्ड, अरुगुला आणि बीटरूट च्या बिया लावल्या आहेत . लास्ट फ्रॉस्ट डेट ( मे १५ ) झाली की बाकीच्या बिया लावणार.
टॉमेटो, वांगी, काकडी यांच्या बियांना बारके बारके कोंब दिसायला लागले आहेत.
आम्ही पामर भारताच्या खेड्यात
आम्ही पामर भारताच्या खेड्यात राहतो . दारापुढे झेंडू, गुलाब, सदाफुली परसात अळू, एखादे केळीचं झाड, कडीपत्ता येवढीच अस्त्यात इकडं.
<<
घ्या, इतकी समृध्द बाग आहे तुमची आणि ‘एवढीच’ म्हणता
मेधा,
ते ५ टायर प्लांटर मस्तय, अर्ब्ज साठी आहे का स्पेशल? बियां ऐवजी रेडीमेड रोपटी चालतील का त्यात ?
डीजे असल्या प्लांटरमधे
डीजे असल्या प्लांटरमधे रेडीमेड रोपटीच मस्त फिट होतील. तू जर ट्राय करणार असशील तर थाइम , मिंट , ओरेगानो, मार्जोरम आणि टॅरेगॉन लावू शकतेस. पार्सली, बेसिल किंवा सेज यांना मोठी कुंडी बेस्ट.
लेट्युसचे वेगवेगळे प्रकार , किंवा वॉटर क्रेस,, अरुगुला हे पण लावू शकतेस. मुळ्याचा पाला आवडत असेल तर बार्के मुळे पण लावू शकतेस.
शनिवारी आमच्या भागातल्या एका
शनिवारी आमच्या भागातल्या एका मोठ्या ग्रीनहाउस मधे गेलो होतो वार्षिक रोपं खरेदीसाठी. मागच्यावर्षी तिथे पाचूचं रोप मिळालं होतं. या वर्षी तिथे दवण्याचं रोप पण मिळालंय. पाचू, मरवा आणि दवणा - चेक ! मोगर्याची . अबोलीची आणि शेवंतीची डझनावारी रोपे मिळाली की वेण्या आणि गजरे बनवायचा बिन्नेस सुरुच
दवणा - Artemisia pallens
पाचू - Pogostemon
मरवा - मार्जोरम
बर्याच वर्षांपूर्वी
बर्याच वर्षांपूर्वी मोठ्या कुंड्यांमधे अळू उगवण्याचा प्रयत्न केला होता. ७-८ इंच लांबीची पानं मिळाली होती साधारण दोन जुड्या होतील एवढी.
त्यानंतर आता मागच्या आठवड्यात बागेत ८-९ अळकुड्या पेरल्या आहेत. इथे कोणी अंगणात अळू उगवला आहे का ? काही स्पेशल ट्रिक्स आहेत का ?
सीमा, हर्ब्ज किती / कुठले उगवले ?
मी लावला होता - उगवतो, पण
मी लावला होता - उगवतो, पण महाखाजरा असतो. चिंचेत घोळला, आमसुलात लोळला तरी खाववत नाही. शोभेसाठी लावला आहे असं समजायचं.
शोभेला खाजरा अळू देता होय!
शोभेला खाजरा अळू देता होय!
इथे कोणी अंगणात अळू उगवला आहे
इथे कोणी अंगणात अळू उगवला आहे का ? काही स्पेशल ट्रिक्स आहेत का ? >> काहीही विशेष न करता raised bed मधे आरामात लावलेले आले.
मी लावला होता - उगवतो, पण
मी लावला होता - उगवतो, पण महाखाजरा असतो. चिंचेत घोळला, आमसुलात लोळला तरी खाववत नाही. शोभेसाठी लावला आहे असं समजायचं.>>> अगदी हेच . बाई म्हणतात तस शोभेलाच फक्त.
अळु आरामात येतो . ग्रोसरी मधला अर्वी आणुन लावली. मस्त पैकी अळु वडी पण केली. इतकी महाभयानक खाजरी झालेली. ( सासुबाईंना करुन सुद्धा )
हर्ब्ज : बेझील दिसतोय. कोथिंबीर आली आहे. बाकी काही नाही.
यावर्षी हे नविन घर आहे. रेझ्ड बेड्स वगैरे काही नाहीत. करणार पण नाही या घरी. लोकांना भाज्या वाटुन कंटाळा आला. जे काही लावेन ते कुंडीतच.
अबोलीची आणि शेवंतीची डझनावारी
अबोलीची आणि शेवंतीची डझनावारी रोपे मिळाली की वेण्या आणि गजरे बनवायचा बिन्नेस सुरुच Happy>>
इथे एक दुकान आहे , तिथे ताजे मोगर्याचे गजरे, शेवंतीचे गजरे वगैरे मिळतात. डायरेक्ट इंडियातून येतात. इथल्या फुलांना वापरून पण अत्यंत सुंदर हार तयार करतात. साई मंदिरात गेलं कि ते हार घातलेले साई बाबा इतके हँडसम दिसतात कि बसं. मी काय काय सगळ्या रिक्वेस्टस त्याम्च्याकडे घेवून गेलेले असते ते विसरते.(थोड्याच वेळाकरता. )
यावर्षी हे नविन घर आहे. >>
यावर्षी हे नविन घर आहे. >> अभिनंदन !
रेझ्ड बेड्स वगैरे काही नाहीत. करणार पण नाही या घरी.>> बघू किती दिवस निर्धार टिकतो ते
नाही म्हणता म्हणता बेसील,
नाही म्हणता म्हणता बेसील, झेंडू आणला आहे. शोभेची एक दोन झाडं. एवढंच. यावर्षी फार गार्डनिंगमध्ये पडायचं नाही.
मी काय काय सगळ्या रिक्वेस्टस
मी काय काय सगळ्या रिक्वेस्टस त्याम्च्याकडे घेवून गेलेले असते ते विसरते.(थोड्याच वेळाकरता. >>
शोभेला खाजरा अळू देता होय! >>
.
Pages