मागील भाग
7-
https://manatalepanavar.blogspot.com/2019/03/blog-post_28.html?m=1
6-. https://manatalepanavar.blogspot.com/2019/03/blog-post_27.html?m=1
5-
https://manatalepanavar.blogspot.com/2019/03/blog-post_26.html?m=1
4-
https://manatalepanavar.blogspot.com/2019/03/blog-post_25.html?m=1
3-
https://manatalepanavar.blogspot.com/2019/03/blog-post_24.html?m=1
2-
https://manatalepanavar.blogspot.com/2019/03/blog-post_23.html?m=1
1-
https://manatalepanavar.blogspot.com/2019/03/blog-post.html?m=1
प्रलय-०८
रक्षक राज्याची राज्यसभा आज बर्याच दिवसांनी भरली होती . महाराज राजसिंहासनावरती आपल्या हातात सुवर्णपात्र घेऊन मदिरापान करत बसले होते . प्रधानजींना कारागृहात टाकल्यापासून प्रधान पदाचा भार सेनापतीकडे सोपवण्यात आला होता . सेनापती अंबरीश बोलत होते...
" महाराज आपल्या सैन्याची जी पहिली तुकडी आपण काळ्या भिंतीकडे पाठवली होती त्याबाबत एक बातमी आहे.....
" कोणती बातमी आहे अंबरीश....
अलीकडे महाराज थोरामोठ्यांचा मान ठेवायचा विसरत होते. ते सर्रास सर्वांना एकेरी नावाने संबोधत होते . बऱ्याच जणांची फरफट होत होती पण महाराज पुढे कोणी काही बोलत नसे . जेव्हा सेनापती अंबरीशजींना महाराजांनी अंबरीश असे संबोधले तेव्हा त्यांना राग अनावर झाला , कारण जेव्हा महाराज जन्मलेही नव्हते तेव्हापासून सेनापती अंबरीश हे रक्षक राज्याच्या सेवेत होते . त्यांना राग येणे सहाजिकच होते, पण महाराजांपुढे त्यांनी नमते घेत . पुढे बोलायला सुरुवात केली....
" महाराज आपल्या राज्यातील , सैन्यातील ती सर्वात धाडसी , पराक्रमी आणि कधीही न हरवली जाण्यासारखी तुकडी होती.....
" एवढी प्रस्तावना कशाला करताय अंबरीश ...? सरळ सांगा बातमी काय आहे....? उगाच आमच्या वेळेचा अपव्यय करू नका.....
" महाराज भिंतीकडे गेलेल्या आपल्या तुकडीतील फक्त पाच सैनिक शिल्लक आहेत . ते माघारी परतले आहेत . बाकी सर्वांना शत्रूने मृत्यूच्या दारी पोचवलं आहे....
" कोण आहे हा शत्रू ....? जो आपल्या राज्याबरोबर युद्ध करण्याच्या तयारीत आहे.....
" महाराज आपले सैनिक व त्या तुकडीचा प्रमुख अभिजीत अद्वैत जे काही सांगत होता त्यावरून हे साधंसुधं नाही . तुम्ही स्वतः ऐका ......
राज्यसभेत एका बाजूला उभा असलेल्या अद्वैतकडे सेनापतीने पाहिले . अभिजीत अद्वैत पुढे येऊन बोलू लागला....
" महाराज आम्ही काळ्या भिंतीपासून अर्ध्या कोसावर ते असू . दिवसभराच्या प्रवासानंतर सैनिक दमले होते . आम्ही त्या ठिकाणी मुक्काम करायचं ठरवलं . सर्वांनी आपापले घोडे बांधून दिले व शेकोटी पेटवून त्या ठिकाणी बसले . मी माझ्या काही मित्रांबरोबर फेरफटका मारण्यासाठी गेलो होतो . जेव्हा परत आलो तेव्हा मी जे दृश्य पाहिले ते फारच भयानक होतं..... महाराज आपले सर्व सैनिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते . शेकोटीभोवती पंधरा माणसे बसली होती . ती माणसे विचित्र आवाजात काहीतरी ओरडत होती व आपल्या सैनिकांचे मांस खात होती.....।
हे ऐकल्यानंतर महाराज विक्रम मूर्खासारखे मोठमोठ्याने हसत सुटले . त्यांच्या हसण्याच्या आवाजाने संपुर्ण राज्यसभा भरून गेली . बऱ्याच वेळ हसल्यानंतर त्यांनी अद्वैत व त्याचा साथीदार मित्रांना पकडून तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला....
त्यावेळी सेनापती म्हणाले " महाराज अद्वैत हा विश्वासू तुकडी प्रमुख आहे . त्याला तुरुंगात टाकण्याचे कारण मला समजले नाही.....?
" अंबरीश एवढी साधी गोष्ट कळत नाही का....? अद्वैत व त्याचे साथीदार मित्र जेव्हा बाहेर गेले तेव्हा हल्ला झाला , याचा अर्थ काय होतो....? याचा अर्थ एकच होतो अंबरिष . तो म्हणजे अद्वैत व त्याचे मित्र हे शत्रूला मिळाले आहेत . त्यांनी शत्रूला त्यांचा ठावठिकाणा दिला व वेळही दिली . जेव्हा सैनिक बेसावध होते तेव्हा त्यांनी शत्रूला आपल्या सैन्यावर आक्रमण करू दिले . व स्वतः जाऊन लपून बसले . नंतर ही बनावट कथा आपल्याला सांगत आहेत.....
" महाराज मी बनावट कथा का सांगेन ....? मी माझ्यासाठी साथीदार सैनिकांचा , मित्रांचा असा सौदा करू शकत नाही . ते माझ्या तुकडीतील सैनिक नव्हते ते माझे बंधू होते . त्यांच्या जीवाशी खेळ मी कधीच करणार नाही....
अद्वैतला तुरुंगात जातोय , याचं दुःख वाटत नव्हतं . पण जो गुन्हा त्याने केला नव्हता , जो गुन्हा त्याच्या ध्यानीमनी नव्हता , त्या गुन्ह्याचे पातक त्याच्या माथी लावले जात होते . तो रडवेला झाला होता . त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते . ज्या राज्याच्या प्रति तो इतका विश्वासू व प्रामाणिक राहिला त्याच राजाने त्याच्या माथी देशद्रोहाचे इतके मोठे पातक लावावे हे त्याला सहन झाले नाही.......
" महाराज असे करू नका असे केले तर आपल्या सैन्याचे मनोबल खच्ची होईल.........."सेनापती शेवटची विनवणी करत म्हणाले
इतर मंत्र्यांनी सेनापतीच्या बोलण्याला दुजोरा दिला तेव्हा महाराज ओरडून म्हणाले
" मी या राज्याचा राजा आहे आणि मी आदेश दिला आहे या सैनिकांना आताच्या आता तुरुंगात टाका अन्यथा त्यांच्याबरोबर तुम्हालाही तुरुंगात जावे लागेल.......
सर्व गप्प झाले अद्वैत व त्याच्या साथीदारांना पकडून तुरुंगात नेण्यात आले.....
" अंबरीश अजून काही आहे का ....? आम्हाला आमच्या कक्षात जायची घाई आहे......
" महाराज विश्वकर्मा तुरुंगातून निसटला आहे......
या वाक्यावर ती महाराज विश्व महाराज विक्रम एकदम शांत झाले . त्यांचा चेहरा क्रोधाने पूर्ण भरून गेला . डोळे इतके मोठे झाले होते की ती बाहेर पडतील की काय असे वाटत होते . त्यांनी त्यांच्या हातातील सुवर्णपात्र अंबरीश यांच्यावर फेकून मारले.....
" तुम्ही सेनापती आहात आणि प्रधानजीही.... काय करत आहात तुम्ही .....? आपल्या सैन्याची एक तुकडी होत्याची नव्हती झाली . देशद्रोही विश्वकर्मा पळून गेला आणि तुम्ही आम्हाला तोंड वर करून सांगताय......?
" महाराज काल रात्रीपासून विश्वकर्मा च्या शोधात चारी दिशांना सैनिकांच्या तुकड्या गेलेल्या आहेत.....
" झालं , झालं ना , एवढच होताना ....? का अजून काही बातमी द्यायची आहे......? " महाराज विक्रम वैतागून आणि ओरडून बोलत होते
त्यावेळी परराष्ट्र व्यवहार सांभाळणारे वृद्ध मंत्री उठून उभा राहिले. महाराजांच्या भितीमुळे ते वृद्ध मंत्री थरथरत होते . थरथरतच त्यांनी बोलायला सुरुवात केली....
" महाराज संसाधन समूहाच्या राज्यातून दूत आलेला आहे.....
पूर्वेकडे असलेली पाच राज्य ही संसाधन समुहाची राज्य म्हणून प्रसिद्ध होती .या पाच राज्यातून मिळणारी खनिज संपत्ती ही मौल्यवान होती . ती खनिज संपत्ती संपूर्ण पृथ्वीतलावर ती वापरली जात होती.....
" बोलवा त्याला पुढे , तो काय भेट घेऊन आला आहे काय आपल्यासाठी .....? महाराज म्हणाले
" नाही महाराज .....असं म्हणण्याचे त्या वृद्ध मंत्राचे धाडस झालं नाही . तो दूत एक पत्र घेऊन आला होता . महाराजांनी बोलल्यानंतर तो पत्र वाचू लागला.....
" प्रति रक्षक राज्याचे महाराज विक्रम यांस सप्रेम नमस्कार.......
महाराज संसाधन समूहाच्या पाच राज्यावर आक्रमण करून मातीतल्या लोकांनी राज्ये त्यांच्या ताब्यात घेतली आहेत . पाचही राजांना बंदी बनवून कारागृहात टाकले आहे . आम्हाला मदतीची पुकार करण्यासाठी हे पत्र लिहिण्याची संधी दिली आहे . परंपरेने चालत आलेल्या आपल्या सहयोगी राज्यांना आम्ही पत्र लिहीत आहोत . इतकी वर्षे आम्ही तुम्हाला खनिजसंपत्ती पुरवत आलो आहोत , आता आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे . ती भिंत पाडण्याची आज्ञा तुम्ही दिली आहे , भिंत पाडण्याच्या ऐवजी इकडे येऊन आमची राज्य आम्हाला प्राप्त करून द्यावीत . भिंत काय कोणीही पाडू शकतो . भिंत पाडण्यात कसले आले आहे मोठे राजेपण .... तुम्ही खरेच राजा व मर्द असाल तर संसाधन समूहातील पाचही राज्य त्या लोकांपासून सोडूवून आमच्या ताब्यात द्या......
त्या दुतांने पुढचं वाचायच्या अगोदरच महाराजांनी त्यांची तलवार घेत त्या दुताच्या जवळ जात , त्याचं मस्तक त्याच्या धडापासून वेगळे केलं . संपूर्ण राज्यसभेत रक्ताचे शिंतोडे उडाले......
आयुष्मान व भरत या दोघांना मिळून बाराशे पन्नास व चैतन्य आणि कनिष्का या दोघांना मिळून बाराशे पन्नास असे चौघांना मिळून पंचवीसशे कोसाचं अंतर पार करायचं होतं . प्रत्येक पाव कोसांवर असलेल्या खड्ड्यांमध्ये बी टाकत चौघेही निघाले होते . चैतन्य व कनिष्क दक्षिणेकडे बरेच अंतर पार करून भरपूर पुढे गेले होते , कारण दक्षिणेकडे फार काही जंगले नव्हती . रस्ते होते . फक्त प्रवास करायचा होता . मात्र उत्तरेकडे रस्ते व्यवस्थित नव्हते . बऱ्याच वेळा घोड्यावरुन उतरून पायी चालत जावं लागायचं . त्यामुळे आयुष्मान व भरत यांची चाल जरा मंद होती . त्यांनी आतापर्यंत फक्त दीडशे कोसाचं अंतर पार केलं होतं . एवढे अंतर पार केलं पण त्यांना एकही मनुष्याची वस्ती दिसले नाही , किंवा एकही जंगली प्राणी त्यांच्या वाटेत आला नाही . आकाशात उंचावर ती उडणारा एक गरुड मात्र त्यांना दिसला होता....
" आयुष्यमान तुला जर वाटत होतं , तर तू तिला बरोबर घेऊ शकला असता . तसेही सभेचा प्रमुख होता तू , तू घेतलेल्या निर्णयाला कोणी विरोध केला नसता . आपण कोणाला सांगितलंही नसतं....
जेव्हा पासून ते तिला मागे सोडून आले होते तेव्हापासून आयुष्यमान गप्प गप्पच होता . त्यामुळे भरत आयुष्यमान ला म्हणाला....
" भरत्या मी कुणाला सांगितलं नाही , पण मला ती खूप आवडते . आतापर्यंत मी इतका फिरलो. इतक्या स्त्रिया बघितल्या . तिच्या होऊनही कैक पटीने सुंदर , रूपवती पण माझं मन कधीच मोहित झालं नाही.....
" मग काय आता पुढचा वारसदार निवडून संसार थाटायचा विचार दिसतोय.....?
" नाही भरत्या , अरे हा काळ फार विचित्र आहे . महाराज विक्रमने भिंत पाडण्याचे आज्ञा दिली आहे . त्याबरोबर सर्वत्र कोलाहल माजलेला आहे . भिंत पडल्यानंतर काय होईल काही सांगता येत नाही . आणखी बऱ्याच गोष्टी आहेत . त्यामुळे याच वेळेला जर मी वारसदारांच्या सभेचा त्याग केला तर ते योग्य ठरणार नाही.....
" तेही आहेच म्हणा आणि अचानक ओरडला
" अरे तो बघ ....केवढा मोठा रेडा आहे तो..... " भरत एका मोठ्या रेड्या कडे बोट करत म्हणाला . तो खरच खूप मोठा , काळा रेडा होता . साधारणपणे अडीच तीन हात लांब आणि तेवढ्याच उंच . वजनात कमीत कमी पाच ते सहा मणाचा (१मण=१६०किलो)तर नक्की असेल.....
" अरे भरत्या त्यावरती कुणीतरी बसल्यासारखं वाटतंय बघ......
रेडा संथ गतीने चालला होता त्या . रेड्या वरती टाकलेल्या कापडाच्या झोळीत एक लहान मुल , व रेड्यावरती एक माणूस बेशुद्ध पडल्यासारखा वाटत होता . दोघांनी आपल्या घोड्याची गती वाढवली . रेड्याच्या बाजूला गेले . त्यांनी त्याला थांबवलं . वरती बसलेल्या माणसाला त्यांनी खाली उतरवले . ते त्या झोळीतील मुलाला उतरून काढणार होते पण जंगलातून सिंहाची गर्जना ऐकू आली .गर्जना ऐकल्यानंतर तो रेडा जरा हालचाल करू लागला . भरताने त्याची येसन (येसन म्हणजे रेड्याच्या नाकातून आरपार काढलेले दावे ) धरत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला , पण आता सिंहाची गर्जना फार जवळून येत होती. तो रेडा भारताच्या हातून सुटून पळाला. तो रेडा वेड्यावाकड्या उड्या मारत फिरत होता . त्याच्यावरच असलेली झोळीही हलत होती . ती झोळी कोणत्याही क्षणी खाली पडू शकत होती व त्यातील मुलाला मार बसून ते मुल दगावण्याची होण्याची शक्यता होती . इकडे सिंह गर्जना करत आयुष्यमान च्या अंगावर धावून येत होता . " भरत्या तु जा आणि त्या झोळीतील मुलाला कसेही करून वाचवा , मी या माणसाकडे बघतो ...........
त्याच वेळी रेड्याने उंच उडी मारली , त्याच्यावर असलेली झोळी उंच उडाली आणि खाली दगडावर आपटणारच होती तेव्हाच इकडे सिंहाने आयुष्यमान वरती धाव घेतली........
पुन्हा एकदा तो सिंह आणि रेडा जागीच स्तब्ध झाले . उंच उडालेली झोळी गरुडाने त्याच्या चोचीत पकडून व्यवस्थितपणे खाली ठेवली .........
जलधि राज्याच्या युद्ध कक्षात भरलेल्या तात्काळ बैठकीचा निर्णय झाला होता . बाटी जमातीच्या लोकांना जलधी राज्यात आश्रय दिला जाणार होता . त्या लोकांनी सैनिकांना फक्त त्या विशिष्ट प्रकारच्या बासर्या कशा बनवायच्या व ती धून कशी वाजवायची हे शिकवायचे होते . त्याचबरोबर कसेही करून महाराज विक्रमांना ती भिंत पाडण्यापासून थांबवायचे असाही निर्णय झाला होता . बैठक संपल्याची घोषणा झाली होती पण हेर पथकाचा प्रमुख कौशिक म्हणाला.....
" महाराज अजून एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणुन देऊ इच्छितो , ती म्हणजे काल आपल्या संशोधन शाळेत झालेला हल्ला मारुत राजाच्या आज्ञेवरून झाला होता .....
मारूत राजाचे नाव ऐकल्यानंतर कैरव महाराजांच्या कपाळावर आठ्या पडल्या ....
" इतक्या वर्षात मारूत राजांची खबरबात नव्हती अचानक हे कसे उद्भवले .......
" ज्या व्यक्तीने हल्ला केला होता , तो मनुष्य अजूनही फरार आहे . त्याला शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत . तू सापडल्यानंतर आपल्याला याबाबत अजून माहिती कळू शकेल . पण आता अशाप्रकारचे हल्ले होणार नाहीत असं आपण म्हणू शकत नाही , आपल्याला आपली सुरक्षा वाढवावी लागेल..........
" व्यतयाबद्दल क्षमस्व , पण रक्षक राज्याचे प्रधान विश्वकर्मा , राजकुमारी अन्वी आणि राजकुमार देवव्रत जलधि राज्याच्या सीमेत आलेले आहेत..... पुढच्या काही तासाच ते राजमहली असतील.....
कौशिका चा विश्वासू हेर भार्गव आत येत बोलला....।.
तुम्ही जर पूर्ण कथा वाचली असेल तर मोकळ्या मनाने प्रतिक्रिया द्यायला विसरू नका . काहीही सांगायचं असेल तर बिनधास्त सांगा
छान चालु आहे
छान चालु आहे
कथानकाचा वेग आवडला
रोज पोस्ट करता ते बरं आहे
फक्त ते मिस्सिन्ग पीसेस चं काय ते बघा बुआ, संगती लागत नाही कधी कधी!
किल्लि++
किल्लि++
भरत व कनिष्क दक्षिणेकडे बरेच
भरत व कनिष्क दक्षिणेकडे बरेच अंतर पार करून भरपूर पुढे गेले होते>>> येथे चैतन्य व कनिष्क हवंय!
कथा छान सुरू आहे...
एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणचे प्रसंग लिहिण्याची पद्धत मस्त आहे.......
छान ,कथा आवडलि. एखाद्या
छान ,कथा आवडलि. एखाद्या सिनेमा प्रमाने वाटते.
टॉल्कीन च्या lord of the rings सारख राजा-राणी, दुसर जग ,black magic, secrets वेगरे अस खुप काहि तरि वेगळ आहे या कथे मध्ये.
मी पण पहिल्या भागापासुन वाचत
मी पण पहिल्या भागापासुन वाचत आहे. नक्कीच कौतुकास्पद प्रयत्न करत आहात. रोज नवीन भाग येत आहेत त्या साठी विशेष कौतुक...
मशीन पिसेस म्हणाल तर तुम्ही
मिसिंग पिसेस म्हणाल तर तुम्ही नक्की कथानकाच्या बाबतीतलं म्हणताय की पात्रांच्या बाबतीतले म्हणताय...... .......
उदा . सहाव्या भागात देवव्रत अनवी आणि विश्वकर्मा जलधि राज्याकडे निघालेले आहेत , ते डायरेक्ट आठव्या भागात त्या ठिकाणी पोहोचले याचा उल्लेख आहे....
किंवा....
आयुष्यमान चौथ्या भागात तयारी करून निघूया म्हणतो तो सरळ पाचव्या भागात पुढे गेल्याचा उल्लेख आहे
यासारखे मिसिंग पीसेस की......
या भागात मारुत राजा , मातीतले लोक , संसाधन राज्ये ही नवीन पात्रे आलेली आहेत। याबाबत जास्त इंट्रोडक्शन दिलेली नाही ....
किंवा ती रेड्याची घटना......
यासारखे मिसिंग पीसेस....
कथानकातील मिसिंग पॅसेस याठिकाणी फारसं काही लिहिण्यासारखं असल्यामुळे आहेत . तर पात्र च्या बाबतीचे ठेवलेले मिसिंग पीसेस कथा पुढे जाईल तसे उलगडतील...।।
तुम्ही नक्की कोणत्या प्रकारचे मिसिंग पिसेस म्हणताय
एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणचे
एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणचे प्रसंग लिहिण्याची पद्धत मस्त आहे.......
छान ,कथा आवडलि. एखाद्या सिनेमा प्रमाने वाटते.
टॉल्कीन च्या lord of the rings सारख राजा-राणी, दुसर जग ,black magic, secrets वेगरे अस खुप काहि तरि वेगळ आहे या कथे मध्ये.
मी पण पहिल्या भागापासुन वाचत आहे. नक्कीच कौतुकास्पद प्रयत्न करत आहात. रोज नवीन भाग येत आहेत त्या साठी विशेष कौतुक...
असं काही ऐकलं की लिहायचा उत्साह द्विगुणित होतो . तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद. काही उणिवा दाखवायच्या असतील तर त्याही मोकळेपणाने दाखवा.....
मी पण पहील्या भागापासुन वाचत
मी पण पहील्या भागापासुन वाचत आहे. कथा खुप छान आहे. वेग देखील छान पकडलात. फक्त एकच विनंती कथा पुर्ण करूनच थांबा, अर्धवट सोडून देऊ नका. अशा कथा अर्धवट राहील्यावर फार मनस्ताप होतो हो.
मी पण पहील्या भागापासुन वाचत
मी पण पहील्या भागापासुन वाचत आहे. कथा खुप छान आहे. वेग देखील छान पकडलात. फक्त एकच विनंती कथा पुर्ण करूनच थांबा, अर्धवट सोडून देऊ नका. अशा कथा अर्धवट राहील्यावर फार मनस्ताप होतो हो.
नक्कीच , वाचणारे असतील तर
नक्कीच , वाचणारे असतील तर लिहिणाऱ्याला ही उत्साह येतो ............
कथा पूर्ण करूनच थांबायचे
मस्त चल्लिये कथा
मस्त चल्लिये कथा
Chan chaliiy Katha. Roj bhag
Chan chaliiy Katha. Roj bhag yetoy he khup kotukaspad aahe , tyamule continuity rahate Chan.
CHHAN AHE KATHA... ROJ
CHHAN AHE KATHA... ROJ VACHTIYE.
तुमच्या सर्वांच्या
तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद.......
नेहमी प्रमाणे हाही भाग मस्तच.
नेहमी प्रमाणे हाही भाग मस्तच...कथा वेगवान झालीय आणि आता वाचतानाही कोण कुणाचे कोण असा गोंधळ उडत नाहीय... रोजच भाग टाकत आहात त्यामुळे खूप बरे वाटत आहे वाचताना लिंक तुटत नाही..
राजकुमारी नी म्हटल्याप्रमाणे कथा पूर्ण करूनच थांबा...अशा कथा अर्धवट राहिल्या की हुरहूर लागते
नक्कीच तुमच्या सारखे वाचक
नक्कीच तुमच्या सारखे वाचक असले की कथा पुढे जाणारच थांबणार नाही......
तो खरच खूप मोठा , काळा रेडा
तो खरच खूप मोठा , काळा रेडा होता . साधारणपणे अडीच तीन हात लांब आणि तेवढ्याच उंच . वजनात कमीत कमी पाच ते सहा मणाचा (१मण=१६०किलो)तर नक्की असेल.....
>>> १ हात म्हणजे आपल्या हाताचे कोपरपासुन बोटे हे अंतर (साधारण दीड फुट) म्हणजे हां महाकाय रेडा अवघा साडेचार फुट होता असे झाले !
रेग्युलर बायसनपेक्षा किमान दुप्पट माप लिहिले तर बाहुबली मधला रेडा डोळ्यासमोर येईल
Mala watala ek haat mhanaje
Mala watala ek haat mhanaje khandyapasun bota paryant.............
Ek waav mhanala tr hoil .....
Hatachya jagi waav mhanala tr hoil ...... Bahutek
वाव जनरली खोली (depth)
वाव जनरली खोली (depth) मोजायला वापरतात.
एकदा गुगळून जुनी परिमाणे वाचून घेतली तर पुढे सुद्धा कथानकात नक्की उपयोग होईल.
जसे की सैन्य संख्या संबधी...
१ पत्ति = १ गज, १ रथी, ३ अश्व, ५ पदाति(पायी सैनिक)
३ पत्ति = १ सेनामुख
३ सेनामुख = १ गुल्म
३ गुल्म = १ गण
३ गण = १ वाहिनी
३ वाहिनी = १ पृतना
३ पृतना = १ चमू
३ चमू = १ अनीकिनी
१० अनीकिनी = १ अक्षौहिणी
किंवा अंतर दर्शवण्यास.... कोस, योजने वगैरे
Dhanyawad
Dhanyawad
Interesting hot jatey story..
Interesting hot jatey story..
पोचले इथेपर्यंत.
पोचले इथेपर्यंत.