Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497
तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्स अंजू
धन्स अंजू
ते बिचकुले किती बोअर करताहेत
ते बिचकुले किती बोअर करताहेत . ते जातील पहिल्या काही आठवड्यात . कान्हेरे पण खूप शांत आहेत का ? तो शिव ठाकरे लहान मुलासारखा आहे . मला म्हणे आईने सांगितलंय . तिथे सगळया लेडीज ना ताई ताई म्हणायचं . वैशाली माडे फारच पुढे पुढे करतेय . ज्याच्या त्याच्या गळ्यात पडतेय का ? त्या शिवानी सुर्वे ला शिव ठाकरे चा एवढा का राग आला ? जिकडे तिकडे सगळ्यांना जाऊन सांगतेय ती . मेधा ने तिला हिंट दिलेली दिसते डोळ्यात भरण्यासाठी सुरवातीला जरा याच्या वर त्याच्या वर रागाव म्हणून . ती शिवानी आहे दिसायला चांगली पण स्वतःला फार काहीं तरी शहाणी समजते .
शिष्ट वाटते शिवानि मला. >>>
शिष्ट वाटते शिवानि मला. >>> मलाही आज वाटली.
US मध्ये online पाहायची काही
US मध्ये online पाहायची काही सोय आहे का? कोणाला वेबसाईट माहितीये का एपिसोडस पाहण्यासाठी?
अयो.सकाळी सकाळीपण Bigg Boss
अयो.सकाळी सकाळीपण Bigg Boss वर काथ्याकुट.
शिवानीची पिरपिरी आणि खोटारडी
शिवानीची पिरपिरी आणि खोटारडी जुई होईल असं वाटतंय.
शिव ठाकरे कोण आहे? फारच आवडतोय असं वाटलं लोकांना.
पराग, अभिजीत गरीब वाटतात स्वभावानं. कसा निभाव लागणार?
माडे कशाची बनलिये समजत नाही. जबरदस्त फायटींग स्पिरीट आहे पोरीत. पुढे पुढे करायची गरज आहे हे माहीत आहे तिला. पहिल्या दिवसापासून सुरु. आवाज मस्त आहे तिचा...काल मुलीबरोबर साधंच गायली पण काय गायली... माडे एकदम प्रमाण मराठी बोलते. . मुलगी मात्र वेगळे बोलत होती.
पराग कान्हेरे स्वभावाने
पराग कान्हेरे स्वभावाने बिलकुल गरीब नाहीये, हा माणूस भांडणही जबरदस्त करेन आणि टास्क सुद्धा त्याच इर्षेने खेळेन!
ऑनलाईन कुठे बघायला मिळेल?
ऑनलाईन कुठे बघायला मिळेल? पहिल्या सिजनला लिंक मिळालेली . पण आता विसरले.
पराग कान्हेरे स्वभावाने
पराग कान्हेरे स्वभावाने बिलकुल गरीब नाहीये, हा माणूस भांडणही जबरदस्त करेन आणि टास्क सुद्धा त्याच इर्षेने खेळेन!>>एकदम बरोबर बोललात अज्ञा...झुंज मध्ये फाइनल मध्ये होता.. जोडीने तो मुद्दे पण व्यवस्थित मांडतो.. थोडा आगावू वाटू शकतो..पण इथे तेच चालत..
झुंज मराठमोळी कधी लागायचं?
झुंज मराठमोळी कधी लागायचं? कुठल्या चॅनेलवर?
झुंज पूर्वाश्रमीच्या ETV
झुंज पूर्वाश्रमीच्या ETV मराठीवर लागायचं...
मागच्या सिजन मधील आरती, त्यागराज, पुष्कर आणि मेघा कंटेस्टंट होते.
या सिजनमधील नेहा आणि पराग होते.
गरिबांचा खतरो के खिलाडी म्हणता येईल, विक्रम गायकवाड (माझा आवडता) विनर!
पुष्कर इथेही सेकंड.
श्रेयस तळपदे होस्ट!
झुंज चे भाग वूट वर आहेत..
झुंज चे भाग वूट वर आहेत.. विक्रम गायकवाड..खरच खूप मस्त होता..एकदम balanced
पराग कान्हेरे स्वभावाने
पराग कान्हेरे स्वभावाने बिलकुल गरीब नाहीये, हा माणूस भांडणही जबरदस्त करेन आणि टास्क सुद्धा त्याच इर्षेने खेळेन.>>>>>> येस +१११११
सुरेखा पुणेकर, बिचुकले,
सुरेखा पुणेकर, बिचुकले, वैशाली असा ग्रुप बनू शकेल का..? अर्थात टिकले तर..पुणेकर राहतील असं वाटतंय. बिचुकलेँँना ठेवणार महिनाभरतरी.. काल आल्या आल्या शिवानी चालूच झाली लगेच..
बाकी पुरुषांमध्ये सगळा
बाकी पुरुषांमध्ये सगळा आनंदीआनंद आहे, पराग कान्हेरे सोडला तर..हाहा...!
कालच सुरु झाला त्यामुळे
कालच सुरु झाला त्यामुळे पहिल्याच दिवशी इतकं अनुमान बांधण आणि तो ही बरोबर निघणं हे शक्य नाहीये तरीही आपण अंदाज बांधत असतोच . नंतर नंतर दिवस जसे जसे जातात तस तस खरं काय ते समजत जात . तर असे अंदाज - सात पुरुष आणि आठ बायका आहेत . त्यातल्या तीन बायका मिडल एज किशोरी शहाणे , मैथिली जावकर आणि सुरेखा पुणेकर एकमेकींना धरून राहतील असं वाटतंय . उरलेल्यांमध्ये वीणा जगताप आणि शिवानीची मैत्री जुळेल . नेहा शितोळे थोडी त्या दोघींमध्ये वेगळी पडेल पण तिला अभिजित केळकर नोटीस करेल आणि तिच्याशी मैत्री करायला बघेल . वैशालीशी शिव ठाकरे जमवून घेईल आणि रुपाली भोसले आणि तो देवचक्के हे येतानाच जोडीने आले आहे . मांजरकरांनी त्या दोघांना सई- पुष्कर म्हटलं आहे त्यामुळे ते दोघं एकमेकांशी जुळवून राहतील . राहता राहिले दिगंबर नाईक, विधाधर पाठारे आणि पराग हे तिघे एकत्र राहतील आणि बिचकुले मात्र एकटे पडतील
पहिलं कोण बाहेर जाईल? काही
पहिलं कोण बाहेर जाईल? काही गेस ?
मला वाटत की मैथिली जावकर जाईल
मला वाटत की मैथिली जावकर जाईल.
पण या वेळी एक गोष्ट सतत वाटत आहे की स्पर्धा जिंकण्याचा जोष जसा आधीच्या मेघा,सई,पुष्कर, मध्ये दिसत होता तसा काल दिसला नाही.काहीसा परागमध्ये दिसला,बाकी ट्राय अँड एरर बेस वर आल्यासारखे वाटले.
जमल तर जमल नाहीतर जाऊ बाहेर,अस वाटल.
बघू ,टास्क सुरु झाल्यावर खर्या स्पर्धेचा जोष येतो का
अरे काय हा बिबॉ फनी सिझन
अरे काय हा बिबॉ फनी सिझन आहेका ? बिच्कुले फुल फुटेज
बिच्कुले = थत्ते + दीपक ठाकुर
नंतर तो शिव, रोडीज प्रॉडक्ट असून जोकरच !
शिवानी सुर्वे नक्कीच लांबपर्यन्त जाणार, ऑलरेडी अ सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन , बोल्ड , प्रचंड व्होकल आणि मेघाची मैत्रीण आहेच पण निगेटिव होऊ शकते पुढे जाऊन !
वीणा जगताप फेस ऑफ कलर्स असल्यानी ती सुध्दा जाणारच फिनालेला, ते २ जोकर्स बिचुकले आणि शिव कन्टेन्ट देणारे म्हणून रहाणार.
वैशाली मधे पोटेन्शिअल आहे, सिंगल मॉम, विदर्भातल्या शेतकर्यांच्या घरातली कन्या , स्ट्रगल करून आलेली , बरेच रिअॅलिटी शोज ऑलरेडी जिंकलेली पण फुटेज-ड्रामा पोटेन्शिअल हवं इथे टिकायला!
सुरेखाबाईंना फिनालेला घालायचच सांगितलच जणु ममांनी, त्यांची बहुदा उषा नाडकर्णी होणार !
अभिजित केळकर चांगला हाउसमेट असेल असं वाटतय, मागच्या सिझनला डिक्टेटरशिप टास्क नंतर त्यानी चांगल रिअॅक्ट केलं होतं निषेध करताना.
विद्याधर जोशी हुषार वाटले, शेफ पराग कान्हेरे सुध्दा डिसेन्ट वाटले पण म्हणूनच बिबॉ मटेरिअल आहेत कि नाही माहित नाही.
टु अर्ली टु पिक फेवरेट , पण या सिझनला जरा वेगवेगळ्या प्रोफेशन्स मधले लोक घेतलेत, बघुया काय होतय पण ते २ जोकर सोडून सगळे इमेज जपत होते आज तरी!
नेहा शितोळे, किशोरी शहाणे नाही आवडल्या, ती कोण रुपाली ती पण नाही आवडली.
रोडीजचा अनुभव असल्याने शिव
रोडीजचा अनुभव असल्याने शिव ठाकरे टास्क चांगले परफॉर्म करेल, त्यामुळे तो शेवटपर्यंत जाऊ शकतो.
१. जर कुणाला संग्राम सिंग
१. जर कुणाला संग्राम सिंग माहिती असेल, अरमान कोहलीच्या सिजन मधला, तर शिव ठाकरे तसच गेम खेळेल, आणि फायनलला जाईल.
एक ग्रामीण मटेरियल + टास्कमास्टर म्हणून तो फायनल गाठू शकतो, जिंकणार नाही.
२.बीचकुले - जोकर, म्हणून टिकवतील थोडे दिवस.
३.शिवानी - सुंदर आहे, ऑलरेडी खेळायला सुरुवात केलीये, निगेटिव्ह होईल, ग्रुपमध्ये खेळेल, पण टिकून राहील.
४.विणा जगताप - टिकली तर फक्त कलर्सच्या पुण्याईवर टिकेन... नो फेस, नो व्हॉइस, नो नोईस, नो entertainment फॅक्टर!
५.वैशाली - जबरदस्त वोकल, आणि आल्या आल्या गेमही सुरू केलाय. कॅमेरा समोर राहण्याची जबरदस्त धडपड!!! शी कॅन प्ले एनी कार्ड टू विन. निगेटिव्ह होईल, पण फायनल मटेरियल.
६. सुरेखाबाई - ही बाई अख्या बिग बॉसच्या घराला तालावर नाचवेन, आणि भांडणात तर त्यांचा हात कुणीही धरू शकणार नाही... (फायनलला पोहोचल्या नाहीत तर EVM घोटाळा आहे असं समजावं.) नाही जाणार फायनलला, चॅनेलची गणिते वेगळी असतात...
७. अभिजित केळकर - टिकणार नाही असं वाटतंय
८. माधव देवचक्के - टिकणार नाही असं वाटतंय
९. रुपाली भोसले - स्ट्रेट फॉरवर्ड, जबरदस्त गेम प्लेयर, खेळली तर फायनलला पोहोचेन आणि सगळ्यांची आवडती देखील होईन.
१०. विद्याधर जोशी - जबरदस्त डोक्यालिटी असलेला माणूस वाटतोय, ग्रुप मध्ये राहीन, मास्टर माईंड होऊ शकतो.
११ दिगंबर नाईक - प्रॉपर कोकणी माणूस, घरात सुखेनैव राहीन, पण तसाच भांडणही करेन.
१२. पराग कान्हेरे - मी वर लिहिलंय तेच माझं अंतिम मत. हा फायनलला गेला नाही, तर आश्चर्य वाटेन. विनिंग मटेरियल.
१३. किशोरी बाई - इमेज जपता जपता कशा बाहेर फेकल्या जातील त्यांनाच कळणार नाही...
१४. नेहा शितोळे - भांडकुदळ आणि फेक... अनप्रेडिक्टेबल
१५. मैथिली - कंट्रोवरसी आहे नावावर, जास्त टिकेन असं वाटत नाही.
सुरेखा पुणेकर आणि बिग बॉस -
सुरेखा पुणेकर आणि बिग बॉस -
या सिजन मधील बिग बॉसच सगळ्यात मोठं मास्टर कार्ड असेल, तर ते म्हणजे सुरेखा पुणेकर.
या एका मास्टर स्ट्रोकमुळे बिग बॉसची व्युवरशिप २० टक्याने वाढू शकते. कारण बिग बॉस फक्त शहरी महिला आणि तरुणाई आवडीने बघते असा सार्वत्रिक समज आहे. या समजाला छेद देऊन ४०शी ओलांडले पुरुष आणि ग्रामीण भाग फक्त सुरेखा पुणेकरांसाठी बिग बॉसशी जोडला जाऊ शकतो.
कधीही बिग बॉस न बघणारे माझे बाबा, काल सुरेखा पुणेकरांच्या इन्ट्रीपासून तर ११.३० पर्यंत बिग बॉस बघत होते, त्यावरून हा अंदाज...
वैशाली मधे पोटेन्शिअल आहे,
वैशाली मधे पोटेन्शिअल आहे, सिंगल मॉम, विदर्भातल्या शेतकर्यांच्या घरातली कन्या , स्ट्रगल करून आलेली , बरेच रिअॅलिटी शोज ऑलरेडी जिंकलेली पण फुटेज-ड्रामा पोटेन्शिअल हवं इथे टिकायला! >>> वैशाली खरच छान आहे, पण सिंगल मॉम का लिहीले??? पुर्वी एका शो मध्ये तिचा नवरा आला होता न, रादर त्यानेच तर घडविले आहे तीला असे बोलली होती ती.
Contestants चि नावं वरती अॅड
Contestants चि नावं वरती अॅड करा ना, वाचायला बर पडेल.
सुरेखा पुणेकर टॉप 5 पर्यंत
सुरेखा पुणेकर टॉप 5 पर्यंत नक्कीच जातील. वचक आणि वजन दोन्हीही आहे. माणसं सांभाळण्याचा अनुभव साथ देईल त्यांना. किचन पॉलिटिक्स कसं खेळतो पराग कान्हेरे हेही महत्वाचं आहे. राहील तोही..!
वैशालीच सांगता येत नाही.मागे
वैशालीच सांगता येत नाही.मागे सूर नवा मधून आधीच एक्झिट घेतली होती,शो लांबला आणि ठरलेल्यि कमिटमेंट पूर्ण करायच्या आहेत म्हणून.
अर्थात हे किरण इथे चालणार नाही किरण फिनँलेची डेट ठरलेली असते आणि एकंदरीतच अनोळखी चेहरे,सुरु होणारा वर्ल्ड कप यामुळे जर शो आपटला तर वेळेच्या आधीही संपवतील.
त्यामुळे वैशालीच मला अनप्रेडिक्टिबल वाटत.
तसच अजून वाईल्ड कार्ड यायचे आहेत.मागच्या वेळेस अगदी मेघाच्या क्रुपेने का होईना पण शर्मिष्ठा वाईल्ड कार्ड येऊन फायनल 6 मध्ये गेली.अगदी नंदकिशोर ही होते.तसे .
विद्याधर जोशी तर मला कीर्तनकाराने आयत्यावेळी नाही सांगितल्यावर त्यांच्याजागी आलेले वाटत आहेत. यांच नाव संभाव्यय यादीतसुध्दा कुठेही नव्हत. वीणा नेही आताआतापर्यंत इन्स्टावरून आपण जाणार नसल्याच सांगितल होत.म्हणजे हे कलर्सवाल्यांनी अगदी लास्ट मोमेंटला आणलेले आहेत.
त्यामुळे निदान काही दिवस राहतील.बाकीच्यांच माहित नाही.
किशोरी शहाणे किती म्हटले तरी
काल फा. फॉ. करतच पाहिले. किशोरी शहाणे किती म्हटले तरी काल क्वीन बी वाटत होती. बरेच अटेन्शन मिळत होते. सुरेखा पुणेकर पण जबरदस्त पोटेन्शियल. त्या म्हटल्या तसं चांगल्याशी चांगल्या पण त्या ज्याला नडल्या त्याचे खरे नाही!
वीणा, रुपाली ची फार छाप पडली नाही पहिल्या दिवशी तरी. ती शिवानी सुर्वे निगेटिव कॅटेगरी दिवा. उगीच ओवर रिएक्ट करून फोकस घेणार असे वाटले. मैथिलीचे पण काही कळले नाही अजून. वैशाली माडे कृत्रिम वाटत होती. उगीच स्टाइल मारत आणि इन्ग्रजी फाडत होती. आय लव स्विमिंग वगैरे काय! ती ना धड यंग दिवा ना सिनियर अशी मधे असल्यामुळे एकटी पडू शकते. पण बहुतेक टास्क चांगले करेल.
शिव अटेन्शन घेईल आणि टास्क पर्फॉर्मन्स मुळे टिकेल असे वाटते. देवचके चे कळले नाही काल काही. तो तोंड उघडून काही बोलल्याचेच आठवत नाही. पराग कान्हेरे लाइकेबल पर्सनॅलिटी आहे.
नेहा शितोळे मधे मला पोटेन्शियल वाटले. पण टू मेनी यंग प्रिटी फेसेस! त्यामुळे कॅट फाइट्स होऊ शकतात घरात
पुरुषां मधे बिचुकले नी टिकावे असे वाटले. फुल्ल एंटरटेनमेन्ट अहेत. पण सग़ळ्याच बाया टार्गेट करतायत पहिल्या दिवसापासून त्याला. त्याला टार्गेट करणे इज टू इझी! तो जर एखादे टास्क मस्त खेळला तर चित्र इंतरेस्टिंग होऊ शकते. बाप्पा जोशी इंटरेस्टिंग कॅरेक्टर वाटले. घरात लोकप्रिय पण दिसतायत ते. तो अभिजीत केळकर कोण आहे ते माहित नाही पण दिसायला आणि पर्सनॅलिटी टिपिकल स्वजो, सचिन टाइप आहे
पण एकूण लोक मागच्या सीझन च्या सो कॉल्ड सिनियर्स सारखे क्लूलेस नाही वाटले. त्यामुळे स्पर्धा टफ होऊ शकते.
जोशी यांनी आॅफिसातून सुट्टी
जोशी यांनी आॅफिसातून सुट्टी घेतली आहे तर ते लवकर जातील का. वैशालीचा पहिल्या सारेगमनंतर लगेच घटस्फोट झाला. मला तर बहुतेक सगळे जिंकण्यासाठीच आलेले वाटले, बोलून दाखवलं नाही ईतकंच. ही पेड वेकेशन नाही हे मागच्या सीझनमुळे सगळ्यांना माहित असणार. पराग आला आणि नंतर गायब झाला, नंतर आलेल्यांचं स्वागत करायला तो नव्हता.
पाहिला बिबॉ
पाहिला बिबॉ
शिवानीने आल्या आल्याच राडा केला. ( बिबॉच्या इतिहासात अस पहिल्यान्दा घडल असेल की ग्रॅन्ड प्रिमिअरलाच खटके उडाले.
किशोरी शहाणे आलेल्या प्रत्येकाला दरवेळी ' मी किशोरी शहाणे' अशी ओळख करुन देत होती. त्याची काय गरज होती? सगळयान्ना माहीत आहे हे.
किशोरीने आल्या आल्या किचनचा ताबा घेतला.
बिच्कुले = थत्ते + दीपक ठाकुर
नंतर तो शिव, रोडीज प्रॉडक्ट असून जोकरच ! >>>>>>>>>> ++++++++१११११११११११ शिव मला लहान मुलासारखा वाटतो. ह्याचा शिवान्शीष मिश्रा होऊ नये म्हणजे मिळवल. बाकी जिन्कण्याचे पोटेन्शिअल आहे पोरात.
ती नेहा किती हसत होती! इरटेटिन्ग!
रुपालीच सुद्दा पुढे जाऊन बिचकुले शी वाजू शकत. काल तो टेडी बिअरवरुन काही तरी म्हणाला तेव्हा ती, " तुमच्या कामानेच तुम्हाला नाव कमवायच असत.' अस काहीतरी म्हणाली.
आल्या आल्या एक ग्रुप ऑलरेडी झालाय. दिगन्बर नाईक, बाप्पा जोशी आणि शिवानी.
हे फायनलला जाऊ शकतीलः
सुरेखा पुणेकर
अभिजित बिचकुले
शिव ठाकरे
किशोरी शहाणे
शिवानी सुर्वे
रुपाली भोसले
नेहा शितोळे
दिगन्बर नाईक
वैशाली माडे
बाप्पा जोशी
पहिल्या आठवडयात पराग, मैथिली किव्वा वीणा ( पण कलर्सची फेस असल्यामुळे मेबी दोन तीन आठवडे तरी ठेवतील.) बाहेर पडू शकतात. सेम अबाउट माधवआणि अभिजीत केळकर.
वैशाली माडे कृत्रिम वाटत होती. उगीच स्टाइल मारत आणि इन्ग्रजी फाडत होती. >>>>>>>>> +++++++++११११११११११
ह्यावेळच्या पाटयान्चे स्क्रुज गन्डलेले होते. एकाचीही पाटी धड नीट लागत नव्हती. बाप्पा जोशीची पाटी शेवटी शेवटी तर कलण्डली. बिचकुलेची पाटी पडली ते 'एपिक' होत.
मागच्या सीझनला जेल नव्हत. ह्यावेळी आहे. स्मोकिन्ग रुम गायब!?
तो अभिजीत केळकर कोण आहे ते माहित नाही >>>>>>> मैत्रेयी, अभिजीत के़ळकर ' मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' मध्ये सचिन खेडेकरचा मुलगा झाला होता.
वैशालीचा पहिल्या सारेगमनंतर लगेच घटस्फोट झाला. >>>>>>>> आ? अस कस? पण तिने हिन्दि सारेगममध्ये सलमान खानला नवर्याची ओळख करुन दिली होती ना?
अरे कोणी मला सान्गाल का, धागा अपडेट कसा करायचा ते?
धाग्यावर टिचकी मारलीस कि वर
धाग्यावर टिचकी मारलीस कि वर संपादन असं दिसेल .. पण धागा काढून १ महिना उलटून गेला असेल तर नाही दिसणार एक महिनाच मुदत असते संपादित करायला ..
.. त्यामुळे मला फक्त मम म्हणायचं काम राहील ..
मी अजून कालचा भाग नाही पहिला.. आणि इथे इतक्या पोष्टी पडताहेत कि मी काही लिहीपर्यंत १० लोकांनी तेच गोष्ट मांडून झालेली असेल..
Pages