Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497
तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला सगळ्यत फेक वाटतं ते यांचं
मला सगळ्यत फेक वाटतं ते यांचं फेक फेमिनिझम !
आजच्या प्रोमो मधे रुपाली आणि नेहा बिचुकलेच्या तोंडाजवळ जाऊन किंचाळत होत्या त्याच्यावर, हेच त्यानी केलं असतं तर लग्गेच #मिटु आणलं असतं भंपक बायकांनी.
शिवानीबद्दल तर बोलायलाच नको, बिचुकले तिला अगदीच कॅज्युअली समोर बस म्हंटला त्याचाही इश्यु करत होती बया, हिच्यापेक्षा रेशम जुई सौम्य वाटायला लागल्यायेत.
बिचुकलेला चु... , मा.... वगैरे शिव्या देणारा माधव त्यांना शिकवतो बायकांशी कसं बोलावं !
बिचुकलेला आधी मी थत्ते +दीपक म्हंटलं होतं पण खरं तर त्याचा श्रीसन्त झालाय , श्री पेक्षा अगदीच वेगळा असला तरी कन्टेन्ट -फुटेज मशिन आहे तो, इतरांनाही फुटेज हवं असेल तर त्याच्याशी भिडल्याखेरीज मिळत नाही !
शिवानीची सुरभि राणा झाली आहे.
आता हुकुमशाह टास्क लवकर होऊ देत आणि बिचुकल्याला करु देत स्कोअर सेट्ल् !
Btw त्या शिवानीचा सतत सलवार/लेगिंग्ज वर करण्याच्या सवयीचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय ट्विटरवर , जाम फनी.. शिवाय अभिजितच्या फेक रडण्याचा, बघा ट्विटरवर असाल तर.
बिचुकलेला आज रडवलेले आहे
बिचुकलेला आज रडवलेले आहे वाटते. एका प्रोमो व्हिडिओत दिसले. बिचारा.
नेहा आधी किंचाळली वगैरे आणि मग नंतर त्याला म्हणत होती तुम्ही असे वागू नका , लोकांना सहन होत नाहीय तुमचे वागणे. बिचुकले म्हणे मी कुठे काही अपशब्द वगैरे वापरले. तर ती म्हणे अहो पण तुमच्यामुळे आमच्या तोंडून येतायत ना शिव्या आणि अपशब्द!! पुढे काय झाले माहित नाही पण हा यांचा स्वतः चा प्रॉब्लेम नाही का ! बिचुकले ला कसले ब्लेम करतात त्याबद्दल ! दॅट्स द होल पॉइन्ट! स्वतः न चिडता दुसर्याला खाली उतरायला, शिव्या द्यायला लावणे हाही गेम आहे.
तेच तर, म्हणूनच बिचुकले,
तेच तर, म्हणूनच बिचुकले, किशोरी, बाप्पा , पराग शिव्यागाळ न करता बेटर प्लेयर्स वाटत आहेत.
मागे दीपक - रोमिल मेघाला मुद्दाम उचकवत राहिले अगदी शेवटपर्यन्त तेंव्हा शिल्पा शिन्देनी हेच म्हंटलं होतं कि त्यांचं कामच आहे तुमचा टेंपर हाय करणे, जर मेघा चिडतेय याचा अर्थ दीपक बेटर प्लेयर आहे आणि त्यांचा प्लॅन यशस्वी होतोय , मेघा मात्रं विकनेस दाखवत आहे असं शिन्देबाई म्हणाल्या होत्या.
नेहा आणी शिवानी ने पहिल्या
नेहा आणी शिवानी ने पहिल्या आठवड्यातच आपला पराभव ओढवुन घेतला आहे. कोण आहेत या ? बाहेर कोण विचरतो का यांना ? फार आगाउपणा चालला आहे.
तेच तर, म्हणूनच बिचुकले,
तेच तर, म्हणूनच बिचुकले, किशोरी, बाप्पा , पराग शिव्यागाळ न करता बेटर प्लेयर्स वाटत आहेत.>>> अगदी अगदी!
बाकिचे सगळे पॉपकॉर्न प्लेयर वाटतायत जरा काही झाले की झालि तडतड सुरु, बिचुकलेना कनविन्स करताना शिवानी म्हणते मला तुम्हाला घराबाहेर काढायचय अशावेळीस कशाला कोण सेफ करेल? मला तरी वाटत बिचकुलेना उगाच कॉर्नर करतायत, मला हिन्दीचा गौतम गुलाटिवाला सिझन आठवतोय तिथे पण सेम त्याला कॉर्नर केल होत सगळ्या घरच्यानी पण तो सगळ्याना पुरुन उरला फक्त गौतम किलर हॅन्डसम होता आणि लॉजिकल मुद्दे मान्डायचा, बिचकुले जरा गावठि आहेत एवढच काय ते ( यावरुन स्क्रिप्टेड आहे का सिझन असही वाटुन गेल)
शिवानी:-- महाफेक -१, डोक्यात जाते
अभिजितः-महाफेक-२
वैशाली:- फेक कन्फ्युज
माधवः-फेक
रुपाली:- अजुन कळत नाही
मैथिली,दिगबर,शिवः- घरात आहेत का?
विणा:- कळपु प्लेअयर स्वतःच मत नाही
सुरेखा:- बॅल्न्सड पण बीबॉच गेम पॉलिटिक्स पासुन शेक्डो मैल दुर
बप्पा:- अजुन अन्दाज यायचाय
किशोरी:- डिग्नीफाइड प्लेयर
बिच्कुले:- गॅन्ग ला झेलु आणी घुमवु शकले तर हिरो नबर १ ठरतिल
परागः- हुशार आणी डिग्नीफाइड प्लेयर लन्बी रेस का घोडा फायनिलिस्ट व्हायच्या लायकिचा, किती ताणायच हे बरोबर समजत.
बाकी काही असो, यावेळेसचा सिझन
बाकी काही असो, यावेळेसचा सिझन जबरदस्त एंटरटेनिंग आहे. सगळेच लोक धमाल करताहेत. सुरेखाबाई, बाप्पा, किशोरी हे तिघे ज्या ग्रेसफुली वावरताहेत ते फार आवडलं.
नेहा मला आस्तादसारखी बरीचशी वाटतेय. भडकू, भाषेवर पकड, वाचन बऱ्यापैकी. ती आवडू लागलीये.
वैशाली आवडली नाही पण गायिका म्हणून काय कमाल आहे राव! केवळ अप्रतीम.
आवडले नाही म्हटले तर फक्त शिवानी, माधव, केळकर, आणि पराग.
भांडण पे भांडण,भांडण पे भांडण
भांडण पे भांडण,भांडण पे भांडण,भांडण पे भांडण हो रहा है बिगबॉस
लेकिन नतीजा कुछ कभी नही.
कब तक चलेगा ऐसे.
१. रूपाली: - शिल्पा शिंदे
१. रूपाली: - शिल्पा शिंदे
२. नेहा शितोळे: - संभाव्य विजेती
३. शिव: - हा सर्वांचा अंदाज घेतोय
४. शिवानी: - हिना खान
५. पराग: - विकास गुप्ता.
मी काल पाऊण तास बघितलं फक्त,
मी काल पाऊण तास बघितलं फक्त, voot वर बघेन नंतर. Voting सुरू झालं का, कारण एक दिवस तर आहे आता, जनरली मंगळवारपर्यंत किंवा जास्तीत जास्त बुधवारपर्यंत नॉमिनेशनस समजून, voting सुरू होतं ना.
बिचुकले म्हणजे मला हिंदीतला
बिचुकले म्हणजे मला हिंदीतला दीपक सारखे वाटताहेत. पहिले दोन आठवडे तिथे दीपक ची खूप हवा झाली होती . तोच जिंकणार असं तमाम पब्लिक ला वाटत होत . तसच . कदाचित जातील शेवटच्या पाच पर्यंत पण जिंकणार नाहीत आणि काल वीणा म्हणाली तस " गोडीगुलाबीने शांत आणि व्यवस्थित अवकातीत राहिले असते तर गेम संपल्यानंतर इंडस्ट्रीतल्या लोकांकडून फायदा तरी झाला असता. आता मात्र कोणाकडून काही फायदा होणार नाही कारण उतरलेत ते कलाकार लोकांच्या डोक्यातून " त्यामुळे राहतील काही आठवडे आणि गेम संपला कि जातील परत स्वतःच्या गावाला राष्ट्रपती पदासाठी आयुष्यभर अर्ज करत .
वोटिंग लाईन्स बंद आहेत या
वोटिंग लाईन्स बंद आहेत या आठवड्यात कोणी बाहेर पडणार नाही
अच्छा, थँक्स सुजा.
अच्छा, थँक्स सुजा.
चांगलं केलं, अजून एक आठवडा संधी दिली. शिवानी जावी लवकर असं वाटतंय पण जाणार नाही ती.
२. नेहा शितोळे: - संभाव्य
२. नेहा शितोळे: - संभाव्य विजेती.>>>> +1111
वीणाचा किवा जनरल पॉपकॉर्न
वीणाचा किवा जनरल पॉपकॉर्न कन्पुचा सुर असा आहे की आम्हि फेमस म्हणजे सुपेरियर आणी बिचुकले गावठी आहेत, त्यानी एवढ्या सगळ्या स्टार्सला जरा महत्व द्यायला हव, अरे बीबॉ मधे सगळे एकाच लेवलला तुम्ही तिथे काय करता यावरच पब्लिक तुम्हाला उचलुन धरते नाहितर मेघा धाडेच नाव सुद्ध किती लोकाना माहित असेल त्याउलट रेशम एवढी पॉप्युलर असुन काय झाल?
बिचुकलेचा अॅप्रोच जरा चुकतोय पण त्यामानाने आत सगळे गॅन्ग अप मात्र जास्तच करतायत, एक बोलला की आले सगळे धावुन!
नेहा, शिवानी, आणि रुपाली मला
नेहा, शिवानी, आणि रुपाली मला egoistic वाटल्या. त्यातल्या त्यात शिवानी आणि रुपाली. किशोरी शहाणे एकदम ग्रेसफुल. जर शेवटच्या ७-८ मध्ये टिकल्या तर अगदी लास्ट ३ पर्यंत सुद्धा जाऊ शकतात.
माधव या सर्वांच्यात तिऱ्हाईत वाटतो. सारखा मध्ये मध्ये पडायचा प्रयत्न करतो पण ठसा उमटवण्यात अजूनपर्यंत अपयशी. वीणा ने शेवटी तिच्या २-३ तरुण स्त्री कम्पुप्रमाणं FOMO च्या भीतीपोटी स्वतःपण आवाज चढवला आज. पण तरी ती आज सेन्सिबल वाटली.
बिचुकले हा नक्कीच मागच्या जन्मात योगी असणार. एका वेळी २-३ जण अंगावर आले तरीही थोडाही आवाज चढवला नाही त्याने. खूप जास्त पेशन्स आहे माणसामध्ये. फक्त त्याने विचारांची जुळवाजुळव व्यवस्थित करावी आणि कंफ्यूस न होता योग्य माणसासमोर तोंड उघडावे...मग हा शेवटच्या ५ मध्ये सुद्धा जाऊ शकेल.
लोकसभा निवडणुकीत जिंकले नाहीत
लोकसभा निवडणूक सपशेल हरले म्हणून काय झाले (तसे पहिले आलेत ते...फक्त शेवटून) बिग बॉस मधून बाहेर पडून आमचे बिचकुले साहेब विधानसभा निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार!
बोला एकच वादा.....बिचुकले दादा..!!
अ बि ला जे हवंय तेच घडतंय,
अ बि ला जे हवंय तेच घडतंय, मस्त चर्चेत राहतोय. सर्व तुटून पडल्यावर अजून सहानुभूती मिळणार. तो चांगला गेम player दिसतोय. बाकीच्यांना उल्लू बनवतोय आणि नाचवतोय. बाकीचे स्वतःला अतिशहाणे समजतात.
कोणाला ते बिचुकले काय म्हणतात
कोणाला ते बिचुकले काय म्हणतात ते समजतं का? कि माझ्या बुद्धीचा दोष आहे , मला काय कशाबद्दल बोलतात काहीच समजत नाही. नॉमिनेशनचा काय प्लॅन सांगत होते? भांडताना काय बोलत होते? काहीही झेपलं नाही. तो पराग त्यांना सांगतोय बाहेरच्यांसाठी खेळ, तर म्हणे बाहेरचे कोण ? बाकी पोरी फार आरडाओरडा करतायेत . घसाफोड आरडाओरड नुसती . शिवानी कोणत्या तोर्यात असते आणि का काही कळत नाही. रुपाली बरी वाटत होती, पण काल बघवली नाही. किश , बाप्पा, सुपू, शिव , पराग थोडे सेन्सिबल कॅटॅगरीमध्ये येतात.
आक्खा एपिसोड बिचूकलेंभोवती फिरतो पण. अगदी ते फ्रेम मध्ये नसले तरी चर्चा त्यांचीच चालू असते.
अ बि ला जे हवंय तेच घडतंय,
अ बि ला जे हवंय तेच घडतंय, मस्त चर्चेत राहतोय. सर्व तुटून पडल्यावर अजून सहानुभूती मिळणार. तो चांगला गेम player दिसतोय. बाकीच्यांना उल्लू बनवतोय आणि नाचवतोय. बाकीचे स्वतःला अतिशहाणे समजतात. >>>> अगदी अगदी.
वीणाचा किवा जनरल पॉपकॉर्न
वीणाचा किवा जनरल पॉपकॉर्न कन्पुचा सुर असा आहे की आम्हि फेमस म्हणजे सुपेरियर आणी बिचुकले गावठी आहेत >> हाच सूर मेघा ने पण हिंदीत पकडला होताच कि . मी मराठीची विनर /मी मराठीची विनर . हा दीपक कोण ? एक कॉमनर. तो खरंच कॉमनर होता आणि सगळ्या सेलिब्रिटींना भारी पडत होता म्हणून ती पण त्याच्या वर तुटून पडलीच ना . शिव्या काय दिल्या . थुंकली काय ? का ? कारण तिला पण भीती वाटतच होती दीपक स्ट्रॉंग कॉम्पिटिटर असण्याची . परत त्यांनी हिला मराठीची विनर म्हणून ओळखावं हि पण इच्छा होतीच . तिच स्थिती या कलाकार लोकांची त्यांना भीती वाटतेय बिचुकले आपल्यापेक्षा जास्त भाव खातात कि काय ? मग तुटून पडा त्याच्यावर . थोडा मानसिक त्रास द्या त्याला. तेच चाललंय जे मेघा हिंदीत दीपक बाबतीत करत होती . मेघा काही वेगळी नाही . सगळे एकाच माळेचे माज असणारे
आता मात्र कोणाकडून काही फायदा
आता मात्र कोणाकडून काही फायदा होणार नाही कारण उतरलेत ते कलाकार लोकांच्या डोक्यातून >>> पहिल्या आठवड्यातच बिचुकलेनी आपले करिअर बनवले आहे. आणी यातील कोण मोठे कलाकार आहेत जे त्याला फयदा करुन देतील ? यांची स्वतःची करिअर धड चालत नाहित म्हणुन बिग बौस मध्ये आले आहेत काहितरी फायदा व्हावा म्हणुन. जो माणुस उदयन राजें विरोधात कोर्टात जातो तो त्याला हि लोक काय मदत करणार!
वैशाली माडे डिक्शनरी!
वैशाली माडे डिक्शनरी!
तू असा 'डीफरन्ट' का करतो?
आता मात्र कोणाकडून काही फायदा
आता मात्र कोणाकडून काही फायदा होणार नाही कारण उतरलेत ते कलाकार लोकांच्या डोक्यातून >> त्या लोकांना माहिती नाही ना बिचकुले कोण आहे तो . अगदी आम्हाला सुद्धा माहिती नाही . तो फक्त त्याच्या एरिया पुरता फेमस असेल पण हि लोक ( आणि क्रिकेटियर्स ) अख्या जगाला माहिती असतात. हा फरक आहे
पहिल्या आठवड्यातच बिचुकलेनी आपले करिअर बनवले आहे. >> गुड चांगलं आहे ना. पण आणखीन जर त्याला काही वेळाने कोणाची मदत झाली असती तर ती होणार नाही इतकच . बर त्याची तरी स्वतःची करियर धड चालली आहे का ?
बर त्याची तरी स्वतःची करियर
बर त्याची तरी स्वतःची करियर धड चालली आहे का ? >>> नाहि. पण आतली जी लोक आहेत ती स्वतःला अती समजत आहेत असे मला म्हणयचे होते. मागच्या बिग बोस मध्ये बरेच माहित असलेले कलाकार होते पण यात किशोरी ( आणी पुणेकर काहि प्रमाणात) सोडले तर बाकिच्यांना काहि मराठी इंडस्ट्री व्हाल्यु तरी आहे का ! त्यांच्यात आणी बिचुकलेत काहि फरक नाहि स्टार म्हणुन.
बिचुकले चं एक आहे. तो मुद्दाम
बिचुकले चं एक आहे. तो मुद्दाम लोकांना त्रास द्यायला जात नाही. तो जेन्युईनलीच असा आहे की लोकांच्या डोक्यात जाईल.
पण बिबी मधे राहाण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी त्याला त्याच्या स्वभावाची अपोआप मदत होते आहे.
बाकी काल नेहा ने उगीच्च्या उगीच विषय काढुन भांडण काढलं. तिचं न रुपाली च ठरलं असेल असं वाटलं की बिचुकले सोबत भांडायचं म्हणुन. रुपाली च बेकार रुप दिसलं पण काल. किती तो आक्रस्ताळेपणा.
पराग ने येउन इंटर्फिअर केलं ते बरं वाटलं मला. एखाद्या माणसाला किती टार्गेट करायचं. त्याची भाषा अशीच आहे हे ४ दिवस झाले तरी लक्षात कसं येत नाही कोणाच्या. उचीच त्याच्या फालतु वाक्याना वेगळंच स्वरुप देउन भांडण काढताय्त. आणि तो फुकट सहानुभुती मिळवतोय.
बिचुकले मुळात पूर्णपणे गेम
बिचुकले मुळात पूर्णपणे गेम शिकून आल्यासारखा वाटत आहे.
बाप्पा आणि काल वीणा जे बोलली ते पटल.
शिवानी,नेहा ,रुपाली यांचा विक पॉईंट बिचुकलेला कळला आहे की यांना फोकस हवा आहे,तो यांना द्यायचा की या रुद्रावतार धारण करणार,आणि ते एकदा झाल की आपण साहजिकच लाईमलाईटमध्ये येणार.पहुंचा हुआ खिलाडी है, बिचुकले,एकीकडे कंटेंट पण देत आहे,शिव्या पण खात आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे संभाव्य विजेते ठरू शकणार्यांना त्यांच्या नकळत निगेटिव्हही बनवत आहे आणि अर्थात लोकांची सिंपथीही मिळवत आहे.
हा राहणार शेवटपर्यंत,अर्थात चँनेलवरपण अवलंबून आहे.
बिचुकलेचा खरा गेम बाप्पांना,थोडाबहुत वीणा आणि केळकरला कळला आहे.
डोक शांत ठेवल, तर हे तिघेही डार्क हॉर्स ठरू शकतात.
बर त्याची तरी स्वतःची करियर
बर त्याची तरी स्वतःची करियर धड चालली आहे का ? >>> नाहि >> नाही ना . हेच तर म्हणायचं आहे . जर नीट वागला असता तर कलाकार लोकांमुळे किव्वा त्यांच्या आणखीन कोणाशी कोणाशी असलेल्या ओळखीच्या लोकांमुळे त्याला जो काही फायदा झाला असता तो हि होणार नाही एवढच म्हणायचं आहे . कलाकार लोकांमध्ये किशोरी / पुणेकर/ बाप्पा/ अभिजित केळकर/ वैशाली माडे / वीणा जगताप/ नेहा शितोळे/दिगंबर नाईक अगदी तो माधव देवचक्के सुद्धा मला तरी माहिती होते . मैथिलीला सुद्धा कधीतरी बघितली होतीच आणि रुपाली सुद्धा माहिती आहे . हिंदीत सुमित राघवन बरोबर तिची एक मालिका आली होती . अगदीच माहित नाही मध्ये बिचुकले, शिव, शिवानी आणि पराग मोडतात निदान माझ्या बाबतीत
पण हे सर्वच स्ट्रगलर आहेत
पण हे सर्वच स्ट्रगलर आहेत स्वतःच. तरी त्यांना वाटते की आपण खुप मोठे स्टार आहोत त्यामुळे हे काहि मदत करणार नाहित. आणी बाहेरचे टीआरपी साठी त्याला घेतील. अगदी बाप्पा जोशी देखील ज्या पध्हतीने महेश बरोबर बोलत होते एंट्रीला ते पाहुन वाइट वाटले. महेश हा सुद्धा त्यांच्या साठी खुप मोठी कलाकार आहे.
दुसरे बिचुकले काहि मराठी इंडस्ट्रीत करियर बनवायला आलेला नाहि. तो फक्त स्वतःची ओल़ह पसरवयला आलेला आहे असे वाटते. त्यामुळे त्याला यांच्या ओळखिचा फायदा होउल वगैरे जे वीणा म्हणत होती ते हास्यास्पदच आहे.
गोडीगुलाबीने शांत आणि
गोडीगुलाबीने शांत आणि व्यवस्थित अवकातीत राहिले असते तर गेम संपल्यानंतर इंडस्ट्रीतल्या लोकांकडून फायदा तरी झाला असता. आता मात्र कोणाकडून काही फायदा होणार नाही कारण उतरलेत ते कलाकार लोकांच्या डोक्यातून " त्यामुळे राहतील काही आठवडे आणि गेम संपला कि जातील परत स्वतःच्या गावाला राष्ट्रपती पदासाठी आयुष्यभर अर्ज करत .

<<
रिअली?
वीणा काय किंवा त्या घरातले सो कॉल्ड सेलेब्ज कोणी खरच इतके पॉवरफुल आहेत का ज्यामुळे बिचुकलेला कसलाही कणभरही बेनिफिट होईल!
उलट जे चालु आहे त्याच्यामुळे स्टँडाउट होतोय तो आणि मिळतोय फायदा
या शो मधे ऑडीयन्स सोडून कोणीच नाही करु शकत बिचुकलेचा फायदा .
का गोडीगुलाबीने रहायचे , का मर्जी राखायची नवख्या ठोकळेबाज बायकांची ?
मराठी इंडस्ट्रीत करियर
मराठी इंडस्ट्रीत करियर बनवायला आलेला नाहि. तो फक्त स्वतःची ओल़ह पसरवयला आलेला आहे असे वाटते. त्यामुळे त्याला यांच्या ओळखिचा फायदा होउल वगैरे जे वीणा म्हणत होती ते हास्यास्पदच आहे.>> मराठी इंडस्ट्रीतल्या करियर साठी फायदा नाही हो. आणखीन कुठला तरी फायदा . एकच फायदा असतो का ?
रिअली? येस . डेफिनेटली . बाकीचे सगळे कमी प्रसिद्ध असतीलही पण बिचकुले पेक्षा जास्त लोंकाना माहिती असलेले आहेत
का गोडीगुलाबीने रहायचे , का मर्जी राखायची नवख्या ठोकळेबाज बायकांची ? >> नको ना मर्जी राखायला . कशाला राखायची ? त्या बायकांचीही तशी अपेक्षा नाहीये . फक्त पाठी मागे बोलू नये . जे काही बोलायचं ते तोंडावर बोलावं असं वाटतंय त्यांना . इकडे वेगळं बोलायचं तिकडे वेगळं बोलायचं हे नकोय त्यांना . सुरेखा ताईंनी पण तेच समजावलं त्या बिचकुलेला
Pages